Breaking News
Home / बॉलीवुड / टाटा अंबानींपेक्षा पण मोठा ह्या अभिनेत्रींचा थाट, स्वतःच्या खाजगी विमानातून करतात प्रवास

टाटा अंबानींपेक्षा पण मोठा ह्या अभिनेत्रींचा थाट, स्वतःच्या खाजगी विमानातून करतात प्रवास

ग्लॅमर इंडस्ट्री एक अशी इंडस्ट्री आहे जिथे आपली ओळख बनवण्यासाठी लोकांना खूप मेहनत करावी लागते. बॉलीवूड मध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी खूप संघर्ष करून स्वतःची एक वेगळी ओळख बनवली आहे. आज त्यांच्याकडे नाव आणि संपत्ती ची कमी नाही आहे. त्या एवढ्या श्रीमंत आहेत कि, त्यांच्याकडे स्वतःचे खाजगी विमान आहेत. आजच्या बातमीत आम्ही तुम्हाला बॉलीवूड मधल्या काही अभिनेत्री विषयी सांगणार आहोत ज्या खाजगी विमानाच्या मालकीण आहेत आणि त्यांना स्वतःच्या विमानातूनच प्रवास करायला आवडते.

माधुरी दीक्षित


माधुरी दीक्षित बॉलीवूड मधील एक अशी अभिनेत्री आहे, जी आपल्या केवळ एका हास्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. पूर्ण जगात लाखो असे फॅन्स आहेत जे माधुरीच्या हास्यावर घायाळ होतात. जगात लोक त्यांना वेगवेगळ्या नावांनी ओळखतात. कोण त्यांना ‘धक -धक’ गर्ल च्या नावानी ओळखतो तर काही त्यांना ‘मोहिनी’ बोलतात. माधुरी सिनेमा क्षेत्रात खूप वर्षांपासून आहे आणि या वेळेत त्यांनी खूप नाव कमावले आहे. याचाच परिणाम हा आहे कि त्यांच्याकडे स्वतःचे खाजगी विमान आहे आणि त्यांना त्यातून च प्रवास करायला आवडते. या विमानाची किंमत ३८ करोड आहे.

शिल्पा शेट्टी कुंद्रा

शिल्पा शेट्टी कुंद्रा बॉलीवूड मधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. शिल्पा शेट्टी ने २००९ मध्ये प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा सोबत लग्न केले. राज कुंद्रा एक यशस्वी आणि श्रीमंत उद्योगपती आहेत. राज लंडन मधील भारतीय मूळ चे प्रमुख व्यापारी आहेत. राज कुंद्रा सोबत लग्न केल्यानंतर शिल्पा बॉलीवूड मधील सगळ्यात श्रीमंत अभिनेत्री झाली. आज त्यांच्याकडे कशाचीही कमी नाही. त्या एका खाजगी विमानाची मालकीण आहेत, ज्याची किंमत ४५ करोड आहे.

प्रियंका चोप्रा


प्रियंका चोप्रा बॉलीवूड मधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. फक्त बॉलीवूड मध्येच नाही प्रियंका चे नाव आता हॉलिवूड मध्येही गाजले आहे. प्रियंका मुळे बॉलिवूडचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर गेले आहे. ती आज ज्या ठिकाणी आहे तिथे पोहचायला तिने खूप मेहनत घेतली आहे. प्रियंकाने मागच्या वर्षी अमेरिकेतील प्रसिद्ध गायक निक जोन्स सोबत लग्न केले. अलीकडेच त्यांनी आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला आहे. असे सांगण्यात येते कि, प्रियंका कडेही स्वतःचे खाजगी विमान आहे, ज्याची किंमत ५३ करोड आहे.

सनी लिओनी


आज सनी लिओनी ने आपल्या आयुष्यात सर्वकाही मिळवले. सनी तिचे पती डेनियल वेबर आणि मुलांसोबत आनंदी जीवन जगते आहे. तुम्ही आश्चर्यचकित व्हाल कि, आजच्या काळात सनी ४०० कोटींची मालकीण आहे. तिच्याकडे स्वतःचे एक खाजगी विमान आहे, ज्याची किंमत ३२ करोड आहे. यासाठीच सनी चे नाव बॉलीवूड मधील सगळ्यात श्रीमंत व्यक्तींमध्ये घेतले जाते.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *