प्रवास करण्यासाठी देशात विविध प्रकारचे साधन उपलब्ध आहेत, परंतु ट्रेन मधून प्रवास करण्याची एक वेगळीच मजा आहे. ट्रेन मधून प्रवास करताना रस्त्यात वेगवेगळ्या गोष्टी दिसतात ज्या पाहून मनात खूप सारे प्रश्न येतात. त्यातीलच एक आहे ट्रेनच्या रुळालगत असणारा एल्युमिनिम चा बॉक्स. हा बॉक्स आपल्याला प्रत्येक प्रवासात दिसतो. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल कि, रुळालगत हे बॉक्स का लावले जातात? ह्याचे काम काय असते? खरंतर हा बॉक्स च प्रवाशांचे प्राण वाचवण्याचे काम करतो . तुम्हाला आज सांगणार आहेत कि, कसे रुळालगत असणारे हे बॉक्स प्रवाशांना सुरक्षित ठेवते. चला तर जाणून घेऊया.
ट्रेनची चाके मोजतात हे बॉक्स
रेल्वे रुळालगत असणाऱ्या बॉक्स ला एक्सेल काउंटर बॉक्स बोलतात. ते प्रत्येकी ३ ते ५ किलोमीटरच्या मध्ये लावले जातात. या बॉक्सच्या आत एक स्टोरेज डिवाइस असते, जे थेट ट्रेन च्या रुळाला जोडले जाते. याचे मुख्य काम असते ते म्हणजे ट्रेन च्या दोन चाकांना एकत्र जोडणारे एक्सेल मोजणे. याने प्रत्येकी ५ किलोमीटर वर ट्रेन चे एक्सल मोजले जातात. या मोजणीवरून असे आढळते कि ट्रेन जेवढ्या चाकांबरोबर स्टेशन मधून बाहेर पडली पुढे जाऊन पण ट्रेनला तेवढीच चाके आहेत कि नाही. याने ट्रेन अपघात वाचविण्यासाठी खुप मदत होते. जर ट्रेन च्या प्रवासात कोणताही अपघात झाला किंवा दोन डब्बे वेगळे झाले तर एक्सेल बॉक्स मोजणी करून सांगतो कि, जी ट्रेन गेली आहे त्यात किती चाके कमी आहेत. तिथेच रेल्वेला हि माहिती मिळते कि ट्रेन चे डब्बे कोणत्या जागी वेगळे झाले आहेत. रेल्वे अपघातानंतर कारवाई करण्यात यामुळे मदत होते.
अशाप्रकारे वाचवतो प्रवाशांचे प्राण
खरंतर ट्रेन च्या रुळांलगत असणारा एक्सेल काउंटर बॉक्स ट्रेन जाताना तिच्या एक्सेल ची मोजणी करून घेतो. त्यानंतर हि माहिती लगेच पुढच्या बॉक्स ला पाठवतो. तुम्ही बघितलं असेल कि एक्सेल बॉक्स कमी अंतरावर लावले असतात. त्यांच्या कमीतकमी ५ किलोमीटर चे अंतर असते. जर एक्सेल ची संख्या मागच्या एक्सेल काउंटर बॉक्सशी जुळत नसेल तर पुढचा एक्सेल काउंटर बॉक्स ट्रेन च्या सिग्नलला लाल कंदील देतो. जर एक्सेलची संख्या कमी असेल तर ट्रेनचा कोणतातरी डब्बा ट्रेन पासून वेगळा होतो. अशातच अपघातापासून वाचण्यासाठी ट्रेनला वेळ असल्यास थांबायला मदत होते. याशिवाय एक्सेल बॉक्स ट्रेन चा वेग आणि दिशा हि सांगतो. अशाप्रकारे विचित्र दिसणारा हा बॉक्स प्रवासा दरम्यान आपले प्राण वाचवण्याचे काम करतो.