भारतीय रेल्वेला देशाची हृदयरेषा सुद्धा म्हटलं जाते. हि जगातील सर्वात मोठी रेल्वे नेटवर्क सुद्धा आहे. ह्यात बसून रोज लाखों प्रवाशी प्रवास करतात. अशामध्ये इथे रोज काही ना काही अजब घटना घडतच असतात. आता दिल्ली वरून बिहारला जाणारी स्वतंत्रता संग्राम सेनानी स्पेशिअल ट्रेनची हि घटनाच पहा ना. येथे अधिकाऱ्यांना एक निनावी बॅग मिळाली. जेव्हा ह्या बॅगेला खोललं गेलं तेव्हा सर्वांचेच होश उडाले.
सुरुवातीला पैश्यांची संख्या गुप्त ठेवली गेली होती. अगोदर हे पै’से मोजले गेले. मंगळवारी रात्रीपर्यंत अधिकारी पै’श्यांची मोजणी करत राहिले. ह्यानंतर बॅगमध्ये १.४ कोटी रु’पये असल्याची गोष्ट समोर आली. अधिकाऱ्यांनी नंतर इ’नकम टॅ’क्स डिपार्टमेंटला सुद्धा ह्याची सूचना दिली.
रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार हि बॅग कोणाची आहे, ह्या गोष्टीची माहिती अजूनपर्यंत मिळू शकलेली नाही. आश्चर्याची गोष्ट अशी कि आतापर्यंत कोणत्याही व्यक्तीने स्वतः येऊन ह्या बॅगेवर स्वतःची दावेदारी सांगितलेली नाही आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले कि, ट्रेन जेव्हा पुढे गेली तेव्हा मार्गातील कोणत्याच स्टेशनवर कोणती बॅग हरवल्याची तक्रार देखील नव्हती.
स्वतंत्रता संग्राम सेनानी को’विड स्पेशल ट्रेन नवी दिल्ली तुन सोमवारी रात्री ९.१५ वाजता रवाना झाली होती. हि रात्री उशिरापर्यंत २.५१ वाजता कानपुर सेंट्रलवर आली होती. इथे पॅन्ट्री कारच्या कर्मचाऱ्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना रेल्वेत लाल रंगाची बॅग मिळाल्याची माहिती दिली. हि बॅग खूप वेळापासून पडून होती.
अगोदर मंगळवारी हि बातमी समोर येऊ दिली नाही, परंतु रात्री जवळपास ८ वाजता रेल्वे अधिकाऱ्यांनी ह्याची माहिती दिली तेव्हा अर्धी घटना समोर आली. जीआरपी आणि आरपीएफ टीम ने अगोदर तिथे पोहोचल्यानंतर बॅग ची स्कॅनिंग केली, कारण ह्या बॅगमध्ये कोणता बॉ’म्ब वैगेरे तर नाही ना ह्याचा तपास घेतला गेला. ह्यानंतर त्यांनी ह्या बॅगला आपल्या ताब्यात घेतले. हा घटनाक्रम झाल्यानंतर १९ मिनिटानंतर रात्री ३.१० वाजता ट्रेनला जयनगर साठी रवाना केले गेले. बॅगच्या स्कॅनिंग दरम्यान नो’टा बॅगमध्ये असण्याची माहिती जीआरपी आणि आरपीएफला मिळाली होती. परंतु संध्याकाळपर्यंत नोटांनी भरलेली बॅगबद्दल बातमी गुप्तच ठेवली गेली. बॅगमधून इतक्या जास्त प्रमाणात पै’से मिळाल्याच्या बातमीने स्वतः रेल्वे अधिकारी सुद्धा थक्क झाले आहेत. हे पै’से कुणाचे आहेत ह्याचा शोध घेतला जात आहे.