Breaking News
Home / मनोरंजन / ट्रेनमध्ये गर्दी कमी झाल्याचे परिणाम, हा अतरंगी व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

ट्रेनमध्ये गर्दी कमी झाल्याचे परिणाम, हा अतरंगी व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

हा लेख लिहित असताना सध्या लग्नाचे आणि सुट्यांचे वारे वाहू लागले आहेत. प्रत्येक जण एकतर लग्नकार्यात व्यस्त आहेत किंवा सुट्यांची मजा घेत आहेत. अर्थात ही सुट्टी, त्यातील मजा ही बाकीच्या पूर्ण वर्षभर अगदी हवीहवीशी वाटत असते. कारण त्यावेळी मात्र आपल्याला उसंत अशी नसते. सकाळी उठल्यापासून ते अगदी झोपायला जाईपर्यंत आपण सतत कामात व्यस्तच असतो.

काही वेळा तर आपण एवढं काम करतो की अक्षरशः रात्रीचा दिवस करतो. मग काय, जे व्हायचं तेच होतं. आपल्या झोपेचं खोबरं होतं आणि डोक्याची भाजी. मग डोक्यात सगळीकडे रागराग असतो. कधी कधी मग तो आजूबाजूच्यांवर निघतो. काही जण त्यावर नियंत्रण ही मिळवतात. पण एवढं असलं तरी झोपेवर नियंत्रण मिळवता थोडी येतं होय. ती येतेच. आपण कितीही म्हणू , ‘बुलाती हैं, मगर जाने का नहीं’, पण झोप एकदा अनावर झाली की आपोआप आपलं लक्ष तिच्याकडे जातं. आणि आपण अलगद कधी निद्रादेवीच्या अधीन होतो कळत नाही.

अहो आपल्या टीमचंच उदाहरण घ्या. आपल्या वाचकांसाठी लेख तयार करायचा असताना अनेकवेळा आमची मंडळी काळ वेळ बघत नाहीत. त्यात कधी व्हिडियोज बघताना तर कधी लेख लिहिताना उशीर होतो. मग आपोआप जी झोप येते ती काही तरी किस्सा करूनच जाते. बरं हे आमच्याच बाबतीत होतं असं नाही. आपणही याचा अनुभव घेतला असेलच. पण आपल्या झोपेचे किस्से आपल्या पुरते राहतात. पण सोशल मीडियाच्या या काळात काही किस्से मात्र वायरल होतात. बरं किस्से म्हंटले की ते अगदी काही क्षणांत ही घडू शकतात. याचंच उदाहरण म्हणजे आज आपल्या टीमने पाहिलेला व्हिडियो होय. या व्हिडियोत आपल्याला ट्रेनचा एक डब्बा दिसत असतो. बऱ्यापैकी गर्दी असते. तेवढयात आपलं लक्ष जातं तर एक दादा झोपलेले असतात. आता ट्रेन म्हंटलं की कोणी तरी झोपलेलं असतं. बरं आपल्याला ही बाब काही नवीन नाही त्यामुळे आपण फारसं लक्ष देत नसतो. पण हा व्हिडियो ज्यांनी चित्रित केला आहे त्यांनी मात्र या दादांकडे विशेष लक्ष दिलेलं दिसून येतं.

कदाचित व्हिडियो चित्रित करायला घेतल्यापासून पुढे काय होईल याची त्यांना कल्पना आली असावी. आणि बहुधा ती कल्पना येतेच. खासकरून माणूस डुलक्या घेत असेल तर पुढे काय होऊ शकतं याची आपण कल्पना करू शकतो. पण या व्हिडियोत ते ज्या स्टाईलने होतं ते मात्र या व्हिडियोला वेगळेपण देऊन जातं. बरं या दादांच्या बाबतीत ही बाब ट्रेन मध्ये झाली आणि आपल्या बाबतीत अनेक वेळेस हे आपल्या घरी होतं हे ही नाकारता येत नाही. पण शेवटी काय, तर झोप अनावर होऊन निद्रादेवीच्या एकदा का अधीन झालं आणि ते ही झोपू नये अशा जागी, मग किस्से तर घडतातच. असो.

आमच्या टीमने हा व्हिडियो पाहिला आणि त्यातील गंमतीचा भाग आमच्या बाबतीत ही झालेला आढळला. आपल्या वाचकांच्या बाबतीत ही असं काही झालं असावं असं वाटून गेलं. म्हंटलं आपल्याला त्याविषयी वाचायला आणि हा व्हिडियो बघायला आवडेल. त्यातूनच हा लेख लिहिला गेला. आपल्याला हा लेख आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम सातत्याने विविध विषयांवर लिहीत असते आणि लिहीत राहील. आपलं वाचकप्रेम ही आम्हाला आता आणि यापुढे ही मिळत राहू दे ही सदिच्छा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवीन लेख जरूर वाचा. त्यांचा आनंद घ्या. प्रत्येक लेख आठवणीने शेअर करा आणि हा आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *