Breaking News
Home / मनोरंजन / डान्स असावा तर असा, बघा ह्या दोघांनी गावात सर्वांसमोर केलेला अप्रतिम डान्स

डान्स असावा तर असा, बघा ह्या दोघांनी गावात सर्वांसमोर केलेला अप्रतिम डान्स

आपली टीम उदयोन्मुख कलाकार आणि वायरल व्हिडियोज यांविषयी सातत्याने लिहीत असतेच. काही वेळेस या उदयोन्मुख कलाकारांचेच अनेक परफॉर्मन्स हे वायरल व्हिडियो म्हणून समोर येत असतात. त्या त्या वेळी आपल्या लेखांतून या दोहींविषयी माहिती देण्याचं काम आपली टीम करत असते. आजही असाच काहीसा एक व्हिडियो आपल्या टीमने पाहिला. असाच काहीसा म्हणण्याचं कारण हा कलाकारांच्या परफॉर्मन्सचा थेट व्हिडियो नसून त्यामागील शूटिंग चा व्हिडियो आहे. म्हणजे बिहाइंड द सीन्स व्हिडियो म्हणा ना. याचा मूळ परफॉर्मन्सचा व्हिडियो तर गाजला आहेच. सोबतच हा बिहाइंड द सीन्स व्हिडियो सुदधा कित्येक लाख लोकांनी पहिला आहे. यावरून या परफॉर्मन्सची लोकप्रियता लक्षात यावी. तेव्हा आम्ही विचार केला की आपल्या वाचकांना या सगळ्याविषयी थोडक्यात माहिती देऊयात. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊयात या व्हिडियो विषयी.

हा बिहाइंड द सीन्स व्हिडियो म्हणजे एका सुपरहिट गाण्यावरिल डान्स परफॉर्मन्सशी निगडित आहे. हे प्रसिद्ध गाणं म्हणजे घुंगरू पैंजणाचं पायात वाजलं, तुझं नी माझं लफडं गावात गाजलं. होय आपल्याला काही काळापासून अगदी दिवानं केलेलं हे गाणं. या गाण्यावरच्या मूळ परफॉर्मन्स व्हिडियोला जवळपास दोन कोटी लोकांनी पाहिलं आहे. या गाण्यात प्रफुल्ल मनवर आणि अश्विनी जोशी या कलाकार जोडीने डान्स परफॉर्मन्स दिलेला आहे. या बिहाइंड द सीन्स व्हिडियोत ही या दोघांचा धमाल डान्स पाहता येतो. त्यात या व्हिडियोचं वैशिष्ठ्य असं की हा व्हिडियो बऱ्याच उंचावरून घेतलेला आहे. त्यामुळे खुद्द नायक आणि नायिका, सोबतचे इतर डान्सर्स सुदधा आपल्याला यात एकत्र पाहता येतात. त्यात कॅमेरामन दादांची दोनदा तीनदा गेस्ट एन्ट्री ही बघायला मिळते. पण नायक नायिकाच इतके जबरदस्त नाचत असतात की आपलं लक्ष इतर कुठेही जात नाही. हा धमाल व्हिडियो सुरू होतो तेव्हा, एव्हाना गाणं वाजणं सुरू झालेलं असतं. नायक आणि नायिका ही एकदम जोशात डान्स करत असतात.

मूळ परफॉर्मन्स मध्येही त्यांची केमिस्ट्री ही कौतुकास्पद वाटली होतीच. त्याचाच अनुभव पुन्हा इथे घेता येतो. दोघेही या गाण्याची मजा घेत डान्स करत असतात. त्यामुळे त्यांच्या डान्स स्टेप्स अगदी मस्त होतात. त्या दोघांनी लगावलेले ठुमके तर लाजवाब. त्यात एक कौतुकाची बाब म्हणजे हे शुटींग होत असताना थोडंसं नाचले आणि थांबले अस होत नाही. सलग दोन मिनिटं ही जोडी नाचत राहते. गाणं आणि डान्स यांची मनापासून आवड असल्याशिवाय हे शक्यच नाही. अजून एक कौतुकास्पद गोष्ट अशी की इथे जे शूटिंग झालेलं आपण बघतो, त्यातील काहीच भाग मूळ व्हिडियोत आपल्याला दिसून येतो. कारण मूळ गाण्याच्या व्हिडियोचं शूटिंग विविध स्थळांवर झालेलं आहे. पण यावरून कल्पना यावी की त्या काही क्षणांसाठी दोन मिनिटांचा अख्खा डान्सचं येथे करावा लागतो. म्हणजे प्रत्येक शूटिंगच्या स्थळावर अशाच प्रकारे कमी जास्त प्रमाणात होत असावं असा अंदाज बांधायला हरकत नाही. यावरून या व्हिडियोच्या तयारीसाठी या गाण्याच्या टीमने जी मेहनत केली आहे त्याचा ढोबळमानाने अंदाज येतो. नकळतपणे त्यांच्या या मेहनतीला आपण सलाम करतो.

हे गाणं कृष्णा वैभव यांनी लिहिलं आहे आणि त्यास बापू ननावरे यांचं म्युझिक लाभलं आहे. तर उमेश गवळी यांनी हे धमाल गाणं गायलं आहे. तसेच या गाण्यावरील डान्सची कोरिओग्राफी अक्षय राऊत यांनी केल्याचं कळतं. तर चेतन सागळे यांनी एडिटिंग ची आणि कृष्णा राऊत यांनी डी. ओ. पी. म्हणून धुरा सांभाळली होती असे कळतं. या लेखाच्या निमित्ताने या साऱ्यांचं कौतुक आहे. या सगळ्यांना आमच्या टीमकडून पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. यापुढेही आपल्या सगळ्यांकडुन उत्तमोत्तम आणि लोकप्रिय कलाकृती घडत राहोत ही सदिच्छा.

मंडळी आपण हा व्हिडियो पाहिला असल्यास आपल्यालाही आवडला असेलच. नसेल पाहिलात तर जरूर पहा. तसेच आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला कसा वाटला हे कळवायला विसरू नका. कारण आपल्या प्रतिक्रिया या आम्हाला प्रोत्साहन देऊन जातात. अजून उत्तमोत्तम लेख लिहिण्याची उर्मी यातून आम्हाला मिळते. तेव्हा नेहमीप्रमाणे आपलं प्रोत्साहन आम्हाला मिळत राहू दे ही सदिच्छा. लवकरच नवीन विषयासह भेटूच. तोपर्यंत हा आणि आपल्या टीमचे बाकीचे लेखही मोठ्या प्रमाणात वाचा, शेअर करा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.