Breaking News
Home / जरा हटके / डेटच्या बहाण्याने मुलांना फसवणाऱ्या तरुणीला तिच्या बॉयफ्रेंडने शिकवला चांगलाच धडा, बघा नेमकं काय घडलं ते

डेटच्या बहाण्याने मुलांना फसवणाऱ्या तरुणीला तिच्या बॉयफ्रेंडने शिकवला चांगलाच धडा, बघा नेमकं काय घडलं ते

मराठी गप्पाच्या टीमने आजवर अनेक वायरल व्हिडीओज विषयी लेख लिहिले आहेत. आज मात्र एका वायरल पोस्ट विषयी आमची टीम तुम्हाला माहिती देणार आहे. आपल्याला तर माहिती आहेच, की गेला काही काळ डेटिंग ऍप्स चा वापर तरुणाई मध्ये किती वाढतो आहे ते. डेटिंगचं प्रमाणही त्यामुळे वाढलं आहे. पण प्रत्येक वेळी हे डेटिंग पुढे प्रेमात वा लग्नात परावर्तित होतंच, असं नाही. पण यात अनेक वेळेस एकमेकांना विश्वासात घेऊन आपलं यापुढे जमणार नाही, हे सांगितलं जातं. पण काही वेळेस मात्र डेटिंग कारांऱ्यांपैकी एखादी व्यक्ती काही सुप्त हेतू मनात ठेवून आणि प्रेम भावना नसताना डेटिंग करत असतात. जेव्हा याचा उलगडा दुसऱ्या व्यक्तीस होतो, तेव्हा काही काळ का होईना पण मनावर परिणाम होतो. काही काळाने या मग गत स्मृती बनतात आणि आपण आयुष्यात पुढे निघून येतो.

पण यातील काही जण मात्र आपली फसवणूक करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला चांगलाच धडा शिकवतात. असंच काहीसं एका परदेशी मुला आणि मुलीने डेटिंग करताना घडलं. ही दोघे समुद्र किनाऱ्यावर जीवरक्षक म्हणून काम करण्यासाठी प्रशिक्षण घेत होते. तेव्हा त्यांची भेट झाली. पुढे मैत्री आणि मग काही काळाने डेटिंग. डेटिंग करत असताना त्यांचं बाहेर जाणं, फिरणं आणि अर्थात खवय्येगिरी सुरू असायची. दोघेही खुश होते. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले होते. निदान त्यातल्या मुलाला तरी तसं वाटत होतं. पण एक दिवस ती दोघं प्रशिक्षण घेत असलेल्या ठिकाणच्या दुसऱ्या एका मुलाने त्याला एक गोष्ट सांगितली. ही होती त्या मुलीविषयी. या दुसऱ्या मुलाने तिच्याशी केलेलं चॅटिंग या प्रेमी मुलाला दाखवलं. या चॅटमध्ये दुसऱ्या मुलाने तिची आणि त्याच्या प्रेमी मुलाची जोडी किती छान आहे आणि ते लग्न करतील, अशी आशा व्यक्त केली होती. त्यावर या मुलीने जोपर्यंत हा प्रेमी मुलगा तिचे बाहेर फिरण्याचे, खाण्याचे पैसे देत राहील तोपर्यंत ती त्याच्यासोबत राहील, असा तिचा हेतू होता.

त्यानंतर त्याला हळूहळू कळलं कि हि मुलगी अश्या अनेक मुलांना डेट करण्याच्या बहाण्याने महागडया हॉटेल मध्ये जाऊन खाद्यपदार्थ मागवून डेट करणाऱ्या मुलाला बिलाचे पैसे भरायला सांगत असे. हे सर्व समजल्यावर कोणीही असता तर त्याला धक्काच बसला असता आणि हा मुलगाही त्याला अपवाद नव्हता. एव्हाना त्याला समजलं कि हि मुलगा आपल्या प्रेमाचा गैरफायदा घेत आहे. पण तो यातून सावरला आणि आपला गैरफायदा घेणाऱ्या मुलीला त्याने अद्दल घडवण्याचा निर्णय घेतला. तिची बाहेर खाण्याची आवड पाहून तिला आज आपण एका महागड्या हॉटेल मध्ये जाऊ असं सांगितलं. तिला तिथे घेऊन गेला. तिच्या आवडीचं आणि अर्थात त्या हॉटेलमधील सर्वात महागडे असे खाद्यपदार्थ त्याने मागवले. खाद्यपदार्थ जसे आले तसे आपण जरा लघु शंकेस जाऊन आलो, असं सांगून तो गेला. गेला, तो थेट बाहेरच पडला. एव्हाना पदार्थ आले होते. त्यामुळे त्या मुलीला बाहेर पडता येईना. काही काळाने आपणच आपल्या जाळ्यात अडकलो, याची तिला कल्पना आली.

तिच्या जवळ तर पैसे नव्हते, हॉटेलवाले सुद्धा जाऊ देई नात. त्यानंतर तिने मग हार मानत तिच्या आईला फोन लावून तिला बोलवून पैसे अदा केले आणि तसं त्या मुलाला सांगितलं सुद्धा. एव्हाना या मुलाने तिला चांगलाच धडा शिकवण्यात यश संपादन केलं होतं. वर उल्लेख केलेली बातमी ही आम्हाला इंटरनेट वर मिळाली असून, त्यातून कोणावरही टीका टिप्पणी करणे आणि भावना दुखावणे असा आमच्या टीमचा उद्देश नाही. केवळ एक वेगळी आणि वायरल बातमी म्हणून ती आम्ही आमच्या वाचकांसमोर ठेवत आहोत. आपल्याला वायरल व्हिडीओजवरील लेख आणि बातम्या वाचायच्या असल्यास वर उपलब्ध असलेल्या सर्च ऑप्शनचा वापर करा. त्यात जाऊन वायरल असं लिहून सर्च केल्यास आपल्याला वैविध्यपूर्ण लेख मिळतील. आमचे नियमित वाचक असण्यासाठी धन्यवाद !

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *