Breaking News
Home / ठळक बातम्या / डॉक्टरने केले लज्जास्पद कृत्य, कुत्र्याला धावत्या कारला साखळीने बांधून फरफटत नेलं

डॉक्टरने केले लज्जास्पद कृत्य, कुत्र्याला धावत्या कारला साखळीने बांधून फरफटत नेलं

गेल्या काही दिवसांपासून कुत्र्यांच्या हल्ल्याची बरीच प्रकरणं समोर आली आहेत. या घटनांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ व्हायरल झाले आणि चर्चाही झाली. पण या कुत्र्यांपेक्षाही भयानक आहे तो माणूस, असंच म्हणावं लागेल. कारण मुक्या जीवांचा छळ करणाऱ्या अशाच एका व्यक्तीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून संताप संताप होईल. विशेष बाब म्हणजे हा कुत्र्याला छळणारा व्यक्ती प्रोफेशनली कोण आहे, हे समजल्यावर तर तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल.

एका माणसाने कुत्र्याचा छळ केला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओत पाहू शकता एक कुत्रा रस्त्यावर धावताना दिसतो आहे. पण त्याच्या गळ्यात दोरी बांधलेली आहे. आपल्याला पुढे जाऊन लक्षात येते की, खरंतर हा कुत्रा धावत नाही आहे, तर त्याला दोरी बांधून फरफटत नेलं जातं आहे.

कुत्र्याच्या पुढे एक चारचाकी गाडी आहे. त्या गाडीला कुत्र्याच्या गळ्यातील दोरी बांधण्यात आली आहे. गाडीत बसलेली व्यक्ती भरधाव गाडी पळवते आहे आणि गाडीला बांधलेल्या दोरीसोबत कुत्रा खेचला जातो आहे. वाईट गोष्ट ही आहे की, कुत्रा सातत्याने धावून धावून थकलेला दिसत आहे. कुत्रा प्रचंड धावतो, हे आपल्याला माहिती आहे पण तो सलगपणे खूप धावू शकत नाही. अशाच पद्धतीने कुत्रा हालबेहाल झालेला आपल्याला दिसून येईल.

अनेकदा मुक्या प्राणी अत्याचाराच्या घटनांनी मन सुन्न होऊन जाते. अशीच एक मन सुन्न करणारी घटना पुढे आली आहे. ही घटना राजस्थान राज्यातील जोधपूर शहरातील असल्याचे समजते. या घटनेत कुत्र्याचा अमानूष छळ करण्यात आला आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील कारच्या मागे धावणारा कुत्रा फारच थकलेला आहे. कार चालवणाऱ्या इसमाचे नाव डॉ. रजनीश गलवा असे सांगण्यात येत आहे.

चक्क डॉक्टर असूनही इतका अमानुषपणे व्यवहार करणारा माणूस किती भयंकर प्रवृत्तीचा असू शकतो, हे पाहून शॉक व्हाल. यानंतर काही लोकांनी एकत्र येऊन कुत्राची सुटका केली आणि डॉक्टरला सवाल विचारला. त्यानंतर डॉक्टरने जे उत्तर दिले ते खरोखरच विचित्र होते. हा डॉक्टर गाडीतून कुत्र्याला दोरीने ओढून घेऊन जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल आल्यावर लोकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. डॉक्‍टरच्‍या घरात हा कुत्रा घुसला होता, यामुळे संतापून डॉक्‍टरने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. यादरम्यान काही दुचाकीस्वारांनी कुत्र्याचा जीव वाचवत आणि डॉक्टरांविरोधात एफआयआर दाखल केलाय.

डॉक्टर रजनीश गालवा यांच्या घरात कुत्रा घुसला तेव्हा त्यांनी कुत्र्याला प्लास्टिकच्या दोरीने बांधले आणि त्याला कारमधून पाच किलोमीटरपर्यंत ओढत नेले. दरम्यान, डॉक्टर रजनीश याच्या कारच्या मागून येणाऱ्या दुचाकीस्वारांनी कार थांबवून भटक्या कुत्र्याला रुग्णवाहिकेतून पशुवैद्यकीय रुग्णालयात नेले. तेथे रक्तस्त्राव झालेल्या कुत्र्यावर उपचार करण्यात आले. त्या कुत्र्याची काय अवस्था झाली आहे, हेही आपल्याला या व्हिडीओतुन दिसून येईल.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *