Breaking News
Home / जरा हटके / भटजींनी डोंबिवलीवरून लावले कॅनडात असलेल्या जोडप्याचे लग्न, बघा व्हिडीओ

भटजींनी डोंबिवलीवरून लावले कॅनडात असलेल्या जोडप्याचे लग्न, बघा व्हिडीओ

इतरांपेक्षा वेगळं काही तरी काम करावं, किंवा आपली वेगळी अशी स्टाईल असावी आणि आपलं कौतुक व्हावं असं सगळ्यांनाच कधी ना कधी वाटतच. पण काही वेळेस हे वेगळेपण जपणं ही काळाची आणि त्या त्या वेळेची गरज असते. अर्थात वेगळेपण कशामुळे ही आलेलं असो, ते कुतुहलास आणि बऱ्याच वेळेस कौतुकास पात्र ठरते. असंच काहीसं वेगळेपण एका जोडप्याला आपल्या लग्नात दाखवावं लागलं आणि पुढे ते कुतूहलाचा भाग झाले. आजचा हा लेख त्यांच्या या वेगळेपणा विषयी आहे.

या जोडप्याचं हे वेगळेपण दडलंय त्यांच्या लग्न पद्धतीत. हे जोडपं राहतं परदेशात. गेल्या वर्ष ते दीड वर्षांपूर्वी त्यांचं लग्न ठरलं. दोन्ही घरातून सहमती होतीच. पण क’रोनाची माशी शिंकली. मग सरतेशेवटी दोन्ही कुटुंबांनी एकत्र येत एक धाडसी निर्णय घेतला. तो निर्णय म्हणजे यांचं लग्न ऑनलाईन पद्धतीने करण्याचा. यात मुला मुली कडचे काही जण त्यांच्यासोबत परदेशात तर बाकी मंडळी भारतात. मुलाकडची मंडळी तर महाराष्ट्रात, डोंबिवली मध्ये. मग काय, एकदा ठरलं आणि तयारी सुरू झाली. असं म्हणतात की काही जिन्नस हे आपल्या मायभूमीतून तिथे पाठवण्यात आलं.

लग्नाचा दिवस आला. बाकी सगळं झालं , पण भटजी बुवांचं काय असा प्रश्न पडला असेल. पण या प्रश्नावर तोडगा निघाला तो आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने. भटजीबुवा डोंबिवलीत असले तरी व्हिडियो कॉलिंगच्या मदतीने त्यांचे स्वर मात्र परदेशात ही ऐकायला आले. हीच या लग्नाची खासियत ठरली. बाकी सगळी तयारी झाली होती. नवरा मुलगा, नवरी मुलगी हे अगदी नटून थटून व्यवस्थित तयार होते. त्यांच्या सोबत असणारी सगळी मंडळी पण एकदम झकास दिसत होती. इथे भारतात ही सगळेजण तयार बसले होते. घरच्या घरीच सोहळा असला तरी सगळे अगदी प्रसन्न आणि छान दिसत होते. एवढं सगळं उत्तम असताना या आगळ्या वेगळ्या लग्नाची चर्चा न होते तरच नवल.

अनेक प्रथितयश वृत्तसंस्थानी या लग्नाचं वार्तांकन केलं. त्यावेळी या सगळ्यांची थोडक्यात ओळख झाली. यात ज्यांचं लग्न झालं ते वर आणि वधू म्हणजे भूषण चौधरी आणि मनदिप कौर. तसेच या दोघांचे लग्न प्रत्यक्षात घडवून आणणारे भटजीबुवा म्हणजे विवेक ठोंबरे गुरुजी होत. गुरुजींना लग्न विधींचा अनुभव अमाप असला तरी ऑनलाईन पद्धतीने लग्न करण्याचा त्यांचा हा अनुभव अद्भुत होता हे कळून येतं.

या लग्नाविषयी माहिती घेताना आपल्या टीमने यावर काही व्हिडियोज बघितले. त्यातील एका व्हिडियोत डोंबिवलीत बसलेली सगळी मंडळी दिसून येतात. त्यांच्या समोर असलेल्या मोठ्या टीव्हीवर सगळं चित्रीकरण चालू असलेलं दिसून येतं. शिर्षस्थानी गुरुजी बसलेले असतात. त्यांच्या मुखातून येणाऱ्या लग्न संस्कारांप्रमाणे सगळे विधी होत असतात. तर परदेशात वधू आणि वर, पारंपरिक वेषात अगदी शोभून दिसत असतात. त्यांच्या सोबत असणारी मंडळी सुद्धा या नवीन पद्धतीने होणाऱ्या लग्नाचा आनंद घेत असतात. दोन्ही बाजूंच्या चेहऱ्यांवर आनंद आणि कौतुक दिसत असतं. आपल्याही तशाच भावना असतात. आपल्याला या जोडप्याचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं कौतुकच वाटतं. तसेच यानिमित्ताने या नवपरिणीत जोडप्याला आपल्या टीमकडून पुढील सुखी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा ! आपला येता काळ सुखाचा, भरभराटीचा आणि यशाचा असो ही ईश्वरचरणी प्रार्थना !!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तसे तुम्ही ते कळावतच. आपल्या सकारात्मक कमेंट्स आणि आपण लेख शेअर करता यांमुळे आपल्या टीमला एक नवीन ऊर्जा मिळते. ही ऊर्जा नवनवीन विषयांवर लेख लिहिण्यास प्रवृत्त करते, काम करवून घेते आणि समाधान ही देते. त्यात आपण जेव्हा ‘आपल्याला लेख आवडला’ एवढं जरी लिहिलंत तरी कष्ट फळाला आले असं वाटतं. तेव्हा आपला हा पाठिंबा आपल्या टीमच्या पाठिशी कायम असू द्या. आम्हीही तुम्हाला दर्जेदार लेख नेहमी वाचण्यासाठी प्रसिद्ध करत राहू. लोभ कायम असावा. धन्यवाद !!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *