नशिबावर बरेच काही अवलंबून असते असे म्हणतात. नशीब चांगले असेल तर माणूस मजल्यापासून मजल्यापर्यंत पोहोचतो. दुसरीकडे, नशिबाने साथ दिली नाही तर केलेले कामही बिघडते. नशिबाची ताकद दाखवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल कारण या व्हिडिओमध्ये ती व्यक्ती मृ-त्यू-ला स्पर्श करून परत आली आहे. हा व्हिडीओ पाहताना अक्षरशः अंगाचा थरकाप होतो.
सोशल मीडियावर आजकाल अनेक मजेशीर आणि ध-क्कादायक व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून एक व्यक्ती सहजपणे मोठ्या अपघातात थोडक्यात बचावत असल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. या व्हिडिओमुळे नेटकऱ्यांमध्ये चांगल्याच चर्चा रंगल्या असून यावेळी यमदेव लंच ब्रेकला गेला होता असं कॅप्शन टाकून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात येत आहे. माणसाचं आयुष्य खूप छोटं आहे, ते कसं जगावं हे आपल्या हातात असते. आयुष्य क्षणभंगुर आहे, जेवढं जगताय तेवढं आनंदात जगा, असाही सल्ला या व्हिडीओच्या निमित्ताने दिला जातोय.
सोशल मीडियावरील काही व्हिडिओ ध-क्कादायक आहेत की मजेशीर आहेत याची पहिल्यांदा कल्पना येत नाही पण जेव्हा आपण संपूर्ण व्हिडिओ बघतो त्यावेळी आपल्याला संपूर्ण किस्सा लक्षात येतो. या व्हिडीओत पण आपल्याला अजिबातच अंदाज येत नाही की पुढे नेमकं काय होणार आहे? पण पुढे होणारी गोष्ट पाहिल्यावर मात्र अक्कल बंद पडायची वेळ येते. असं वाटून जातं की, हा मुलगा अजून क्षणभर जरी आहे त्या जागेवर थांबला असता तर क्षणात होत्याचं नव्हतं झालं असतं.
व्हायरल झालेल्या व्हिडीओत आपल्याला दिसून येते की, एक मुलगा खूप अस्वस्थ आहे. तो स्वतःवरच कुठल्याशा कारणाने नाराज आहे. त्याच्या सोबत कुणी नसल्याने त्याची अवस्था एकदम भांबावलेली आहे. तो जमिनीवर पाय आपटत आहे. अगदी ज्या लोखंडी सुरक्षा हँडलला धरून तो उभा आहे, त्यावरही तो निराशेत हात मारत आहे. शेवटी कंटाळून तो निघतो… अगदी निघताना सुद्धा आपल्याला जाणवत राहते की, हा खरोखरच काहितरी मोठ्या टेन्शनमध्ये आहे.
व्हिडीओत आपल्याला दिसत असते की, समोरच्या बाजूला रस्ता आहे, हा मुलगा रस्त्याच्या एका बाजूला उभा आहे. आजूबाजूला झाडे पण आहेत. समोर असलेल्या रस्त्यावरून वाहने एकदम वेगाने वाहत आहेत. आणि आता हा मुलगा इथून निघून जात असतो. तितक्यातच मागून एक कार येते, जी वेग अतिप्रचंड असतो. म्हणजे जर ते झाड आणि लोखंडी अँगल तिथे नसते तर समोर हत्ती असता तरीही या कारला रोखू शकला नसता इतका स्पीड होता. पण झाड आणि लोखंड हे एकत्र आल्याने ही गाडी थांबली… पण ही गाडी जोरात तिथेच येऊन आदळली, जिथे हा मुलगा 1 सेकंद आधी उभा होता.
सुदैवाने संबंधित रस्त्यावरून पुढे आलेल्या या मुलाने एव्हाना 4 पाऊले चालल्यामुळे तो सुरक्षित असतो. एक क्षण वेळ घालवला असता तरी हा मुलगा आपल्याला बघवणार नाही अशा अवस्थेत आणि डोळ्याला सहन होणार नाही, अशा अपघा-तात अडकला असता. या दु-र्घ-टनेत संबंधित व्यक्तीच्या जीवाला धो-का निर्माण झाला असता. पण तसे घडत नाही. व्यक्ती थोडक्यात वाचते, यामुळेच काही जण यमराजांच्या लंच टाईममुळे वाचला, असे म्हणत आहे.
बघा व्हिडीओ :