Breaking News
Home / मनोरंजन / तरुणाने कॉलेजच्या आवारात केला अप्रतिम डान्स, स्टेप्स पाहून तुम्हीदेखील फॅन्स व्हाल

तरुणाने कॉलेजच्या आवारात केला अप्रतिम डान्स, स्टेप्स पाहून तुम्हीदेखील फॅन्स व्हाल

येत्या काही दिवसांत शाळा आणि कॉलेजेस पुन्हा एकदा सुरू होतील. पुन्हा तो अभ्यास, सेमिस्टर आणि सगळं काही सुरू होईल. पण मग सालाबादप्रमाणे यथावकाश कॉलेज फेस्टिव्हल येतील. किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू होईल. गेल्या दोन वर्षांत करोनाच्या साथीने यावर सगळं पाणी फिरवलं होतं. सांस्कृतिक समारंभच काय तर अनेकांचे, पदवीदान समारंभ ही यामुळे पुढे ढकलले गेले होते. निदान यावर्षी तरी हे अस काही होऊ नये ही इच्छा !

कारण कॉलेज मधलं आयुष्य हे नंतर पुन्हा जगायला मिळत नाही. ते मित्र मैत्रिणी, त्यांच्या सोबत तयार झालेल्या त्या आठवणी पुन्हा तशाच्या तशा जगता येत नाहीत. कारण आपण आणि आपलं मित्रमंडळ मोठं झालेलं असतं. अगदी ठरवून भेटलो तरी आता चर्चेचे विषय बदललेले असतात. केवळ आनंद घ्यायचा म्हणून मजा करण्यापेक्षा बजेट, वेळ, स्थळ, काळ बघून मजा केली जात असते. अर्थात त्यात काही गैर नाही वा चूक नाही. पण सांगण्याचा मुद्दा हा की कॉलेजमधले ते दिवस वेगळेच असतात. त्यातही कॉलेज फेस्टिव्हल असेल वा एखादा कार्यक्रम असेल, त्यानिमित्ताने आपण जो सहभाग नोंदवतो तो इतरत्र दिसत नाही. म्हणजे सहभाग असतो पण पहिला येण्याची धडपड जास्त असते. याउलट कॉलेजमध्ये केवळ मजा म्हणूनही सहभाग नोंदवला जातो.

अनेकवेळा तर आपल्याला जी कला येते तिचं, सादरीकरण करण्यातला आनंद घेत घेत परफॉर्मन्स दिला जातो. त्यासाठी हा सहभाग असतो. हे असेच परफॉर्मन्स मग आपलं मन जिंकत जातात. असाच एक परफॉर्मन्स आपल्या टीमने आज पाहिला आणि आमची मनं, नकळतपणे आमच्या कॉलेज जीवनाच्या आठवणीत रममाण झाली. म्हंटलं हा व्हिडियो आपल्या वाचकांना ही असंच नॉस्टॅल्जिक करेल यात शंका नाही, म्हणून त्यावर लिहायचं ठरलं. हा व्हिडियो मोंसून श्रेष्ठा या मुलाचा आहे. नेपाळ दर्शन कॉलेज या कॉलेजचा तो विद्यार्थी असल्याचं कळतं. या कॉलेजमध्ये काही वर्षांपूर्वी सरस्वती पूजन निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केलेलं होतं. त्याप्रसंगी या गुणी मुलाने मस्त असा डान्स केला होता. त्याचा व्हिडियो वायरल ही झाला होता आणि आज आमच्या तो बघण्यात आला. चार ते पाच वर्षे झाली तरी या व्हिडियो असणारा आनंद जाणवून गेला आणि वर म्हंटल्याप्रमाणे नॉस्टॅल्जिक करून गेला. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला सरस्वती पूजन कार्यक्रमाचा पोस्टर लागलेला मंच दिसून येतो. तसेच वर उल्लेख केलेला मुलगा तिथे उभा असतो. बाजूला इव्हेंट सांभाळणाऱ्या अनेक मुली असतात. त्यातील एका मुलीचं आणि त्याचं बोलणं होत असतं.

तेवढ्यात गाणं सुरू होतं आणि दोघांचं बोलणं तुटतं. कारण त्याने डान्स करायला सुरुवात केलेली असते. त्याच्या या डान्स मध्ये आपल्याला त्याची सहजता आवडून जाते. कोणत्याही डान्स स्टेप्स करताना तो अडखळताना दिसत नाही. यावरून त्याला डान्सची आवड आणि सवय अशा दोन्ही गोष्टी असाव्यात हे जाणवतं. तसेच त्याने केलेल्या विविध डान्स स्टेप्स मधून ही हे जाणवतं. कारण काही डान्स स्टेप्स या फारच लोकप्रिय आहेत. आपणही म्युझिक व्हिडियो बघत असाल तर आपल्याला हे जाणवलं असेल. तसेच गाण्याच्या मुडनुसार आणि गतीनुसार त्याच्या स्टेप्सची गतीही बदलते. त्यामुळे कधी तो स्लो मोशन मध्ये स्टेप्स करतो. तर कधी पटकन मुन वॉक करून मोकळा होतो. पण जे काही करतो ते बिट्स वर करतो आणि म्हणून हा डान्स जास्त आवडून जातो. पण सगळ्यांत महत्वाची गंमत ही व्हिडियोच्या शेवटी असते. मघाशी एका मुलीचा उल्लेख झाला होता बघा. त्या मुलीचा मंचावर प्रवेश होतो आणि डान्स मध्ये अजून रंग भरले जातात. ते कसे भरले जातात? यासाठी मात्र आपण हा व्हिडियो बघितलेला बरा. कारण आपल्या वाचकांना हा व्हिडियो बघायला आवडेल अशी अटकळ आम्ही बांधलीच होती. म्हणून सदर व्हिडियो आमची टीम या लेखाच्या शेवटी शेअर करते आहे. हा व्हिडियो पूर्ण बघा. आपल्याला डान्स आवडून जाईलच आणि आपल्या कॉलेजच्या दिवसांच्या आठवणी ही ताज्या होतील. आम्ही मात्र आता इथेच थांबतो.

बरं तर मंडळी, हा होता आपल्या टीमने लिहिलेला लेख ! आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.