Breaking News
Home / मनोरंजन / तरुणाने विनाकरण कुत्र्याची कळ काढली, परंतु त्यानंतर कुत्र्याने तरुणाला जी अद्दल घडवली ते तो जन्मभर विसरणार नाही

तरुणाने विनाकरण कुत्र्याची कळ काढली, परंतु त्यानंतर कुत्र्याने तरुणाला जी अद्दल घडवली ते तो जन्मभर विसरणार नाही

प्राणी मग तो माणूस प्राणी असो वा इतर कोणताही प्राणी असो, एका मर्यादेपर्यंत गोष्टी सहन करतो. ती मर्यादा एकदा का ओलांडली की त्या त्या प्राण्यात असलेली रागाची परिसीमा गाठली जाते. अर्थात मग पुढे त्याचं पर्यावसान आपला राग व्यक्त करण्यात होतं. आपल्याला राग आला तरी थेट मारामारी करायची गरजच असते अस नाही. आपण पहिल्यांदा एकमेकांना टोमणे मारतो, मग हात लावून दाखव वगैरे पोकळ धमक्या देतो, मग थोडीशी हुलाहुल होते, मग भांडणं वाद होतात. आणि हे सगळं करून ही काही निष्पन्न होत नाही म्हंटल्यावर मग मारामारी होते. अर्थात ती तशी न झालेलीच बरी. आमची टीमही कोणत्याही मारामारीस वा संघर्षास वा अहिंसेस पाठींबा देत नाहीये. केवळ आपला राग कसकसा वाढीस लागतो आणि त्याच पर्यावसान कशात होऊ शकतं याची एक नोंद केलेली आहे. असो.

बरं इतर प्राण्यांच्या बाबतीत ही हे होतं. आधी आवाज वाढवून, अंग फुलवून आपण किती ताकदवान आहोत हे दाखवलं जातं. काही प्रसंगी नुसतीच हुलाहुल आणि नाहीच तर भिडणं होतं. पण या सगळ्यांना एक अपवाद असतो. तो म्हणजे आपल्याला अचानक एखादी गोष्ट आपल्या मर्यादेपर्यंत घडताना दिसली की आपली प्रतिक्रिया आक्रमक असते. प्राणीही याला अपवाद नाहीत. अगदी आपल्याकडे असणाऱ्या पाळीव प्राण्यांचं उदाहरण ही घेऊ शकता. एरवी पाळीव प्राणी म्हणजे प्रेमाचा कहर असतो. माणसांपेक्षा एवढं प्रेम करतात की विचारता सोय नाही. त्यातही घरातील कुत्रे तर एकदम जबरदस्त प्रेम करतात. बरं हे प्राणी आपल्या घराचं आणि घरातील सगळ्यांचं संरक्षण करण्यास प्रसिद्ध असतात. याबदल्यात त्यांनाही आपल्याकडून केवळ प्रेम आणि त्यांचं अन्न मिळणं हीच अपेक्षा असते. त्यामुळेच त्यांचं प्रेम निर्व्याज वाटतं आणि असतं. पण कधी कधी या प्रेमळ प्राण्यांना असेही नग व्यक्ती भेटतात की जे त्यांच्या या प्रेमळ भावाचा आदर करत नाहीत. किंबहुना त्यांच्या दृष्टीने हे प्राणी म्हणजे एखादं सजीव खेळणं असतं जणू ! कसंही वापरा आणि कसंही वागवा. पण अस नसत. प्राण्यांना ही आपल्यावर प्रेम कोण करतं आणि कोण करत नाही हे कळतं.

बरं त्यातही आताच उल्लेख झालेल्या नतद्रष्ट लोकांपैकी कोणी या प्राण्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला की हे प्राणी त्यावर आक्रमक प्रतिक्रिया देतातच. अशीच एक घटना आमच्या टीमला बघायला मिळाली. ही घटना आपल्याकडे घडते की परदेशात ते कळत नाही. पण बहुधा ती परदेशात घडत असावी असं वाटतं. या घटनेत आपल्याला दोन तरुण उभे असलेले दिसून येतात. सोबत एक डॉबरमन जातीचा कुत्रा दिसून येतो. ही कुत्र्यांची जात मुळातच चपळ असते आणि त्यांना संरक्षण करण्यासाठीच वाढवलं जातं. अर्थात संरक्षण म्हंटलं की आक्रमकता आलीच. पण म्हणूनच या कुत्र्यांच्या जातीने आक्रमकता कमी करावी म्हणून अनेक काळ प्रयत्न झाले आहेत आणि त्यांना यश ही आलेलं दिसून येतं. त्यामुळे ही डॉबरमन मंडळी आपल्या धन्याविषयी कृतज्ञ असतात. ते राहत असलेल्या घरातल्यांविषयी त्यांचं संरक्षण करणं हीच भावना असते. पण हे सगळं खरं असलं तरी वर उल्लेख केल्याप्रमाणे प्रत्येकाची सहन करण्याची म्हणून एक क्षमता असते. या व्हिडियोत ते दिसून येतं. या तरुणांपैकी एकाने या डॉबरमनला पकडून ठेवलेलं असतं. तर दुसऱ्या माणसाच्या हातात झाडाची एक फांदी असते. सुरुवातीला हा हातात फांदी असलेला तरुण ती फांदी या कुत्र्याजवळ नेतो. त्या कुत्र्याला त्याची भीती वाटत नसते. त्याची बाहेर आलेली जीभ तो शांत आहे हेच दाखवत असते. कारम तोपर्यंत हल्ला झालेला नसतो. पण एका क्षणी हा तरुण ती फांदी अगदी जोरात त्या डॉबरमनला मारतो.

आता झाडाची फांदी जोरातच लागते. समोर कुत्रा असो वा माणूस ! पण समोर कुत्रा असेल तर तो चावू शकतो ही शक्यता या तरुणांनी डोक्यात घेतली नसावी. कारण फटका पडल्या पडल्या हा डॉबरमन पुढे झेपावतो. त्याक्षणी ज्याच्या हातात त्याची साखळी असते तो काहीही करू शकत नाही. नंतर तो या दोघांमध्ये पडण्याचा प्रयत्न करतो. पण कसलं काय. त्यालाही थोडासा का होईना प्रसाद मिळतोच. प्राणी पाळीव असले, मुके असले म्हणजे ते मुर्खदुर्बळ नक्कीच नसतात. पण काहींना हे कळतच नाही आणि मग अशी गत होते. असो.

आपल्या टीमने हा व्हिडियो बघितला आणि म्हंटलं यातून काही गोष्टी नक्कीच शिकण्यासारख्या आहेत. एक तर एका मर्यादेपलीकडे कोणत्याही प्राण्याशी मस्ती करू नका. कारण तुमच्यासाठी ती मस्ती असली तरी त्यांच्यासाठी तो छळ असू शकतो. तसेच कोणत्याही प्राण्याच्या सहनशीलतेचा अंत बघू नये. ते ही सजीव आहेत आणि त्यांनाही भावभावना आहेत याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि याला जोडून सगळ्यांत महत्वाचं म्हणजे प्राणी म्हणजे खेळणं नव्हे ते सजीव आहेत हे लक्षात असू द्या. असो. या व्हिडियोतुन आमची टीम हे सगळं शिकू शकली. आपणही काही चांगल्या गोष्टी शिकला असाल. त्या आठवणीने कमेंट्स मध्ये शेअर करा. तसेच आपल्या टीमने लिहिलेले अन्य लेखही वाचा. कारण आपली टीम आपल्या वाचकांसाठी अगदी शोधून शोधून विषय निवडत असते. त्यावर माहिती घेऊन लिहीत असते. दिसलं काही तरी आणि लिहून दिलं अस होत नाही. अनेकवेळा तर विविध विषयांवर लिहिताना खूप वेळ ही जातो. पण आमची लिहायची आणि आपली वाचायची आवड यासाठी आम्ही हे अगदी मनापासून करत असतो. पुढेही करत राहू. गरज आहे ती आपल्या खंबीर पाठिंब्याची ! तो कायम मिळत राहू दे ही सदिच्छा ! लवकरच एका नवीन विषयासह भेटूच. तोपर्यंत काळजी घ्या, आमचे सगळे लेख वाचा आणि आठवणीने शेअर करा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *