Breaking News
Home / मनोरंजन / तरुणीने साडीमध्ये केलेला हा अफलातून डान्स पाहून तुम्हीसुद्धा फॅन्स व्हाल, स्टेप्स नक्की पहा

तरुणीने साडीमध्ये केलेला हा अफलातून डान्स पाहून तुम्हीसुद्धा फॅन्स व्हाल, स्टेप्स नक्की पहा

तरुणाई म्हणजे सळसळता उत्साह आणि अपरिमित ऊर्जा हे समीकरण आपल्या सगळ्यांना माहिती आहेच. किंबहुना आपणही कधी ना कधी आयुष्यात हे समीकरण अनुभवलं असणार. आपल्या वाचकांपैकी काही आताही अनुभव असतील. त्यांच्यातील उत्साह आणि ऊर्जा ही आपल्याला वेळोवेळी दिसून येतच असते. ही मंडळी करत असलेल्या कामातून हे दिसत असतंच. सोबतच ही तरुणाई ज्या पद्ध्तीने सण सोहळे अगदी आनंदात आणि दिमाखात साजरे करते, त्यातूनही त्यांचा हा उत्साह आणि ऊर्जा डोसून येते.

सण, समारंभ हे तसेही उत्साह घेऊन येतातच. त्यात या सगळ्यांत तरुणाईचा सहभाग असला की यात अंमळ वाढच होते. त्यामुळे मग या सण समारंभातील प्रसन्नता ही वाढीस लागते. बरं, सण समारंभ म्हंटले की त्यात गायन आणि नृत्य आलंच. त्यात एखाद्या समारंभानिमित्त मिरवणूक वगैरे असेल तर ढोल आणि इतर वाजंत्री हे असतातच. त्यात फक्त एखाद्या उत्तम डान्स करणाऱ्या व्यक्तीची जोड असावी लागते. ती एकदा का मिळाली की मग आनंद मिळतो. असाच आनंद आपल्या सगळ्यांना काही दिवसांपूर्वी एका व्हिडियोतुन अनुभवायला मिळाला असेल. नसेल अनुभवला तरी हरकत नाही. त्याविषयी इथे जाणून घ्या. आपल्याला हा आनंद मिळवून देणारा व्हिडियो एक डान्स व्हिडियो आहे.

बहुधा गुढी पाडव्यानिमित्त निघालेल्या एखाद्या मिरवणूकितील असा हा व्हिडियो असावा. किंवा एखादा अन्य समारंभ असेल आणि त्यावेळी वादन आणि डान्स होत असावा. अर्थात हा एक एडिटेड व्हिडियो असल्याने त्यावेळी झालेलं वादन आपल्याला ऐकायला येत नाही. पण हरकत नाही. कारण या व्हिडियोत ज्या तरुण मुलीने डान्स केला आहे तो या व्हिडियोतील संगीताला अगदी चपखल बसतो. तसेच या तरुण मुलीचा सळसळता उत्साह ही कौतूक करण्यासारखा आहे. तिच्या या उत्साहामुळे ती मस्त डान्स करतेच. सोबतच तिचं व्यक्तिमत्व ही प्रसन्न दिसतं आणि त्यामुळे ते अजून खुलून येतं. त्यात या मुलीने रंगीबेरंगी सुंदर साडी आणि त्यावर स्टायलिश गॉगल असा मस्त पारंपरिक आणि मॉडर्न लूक केलेला असतो. त्यामुळे तशीही चारचौघात तिचं व्यक्तिमत्त्व वेगळं जाणवत असतं. पण या व्यक्तिमत्वाला लकाकी येते ती तिच्यात असलेल्या बिनधास्तपणे आणि आत्मविश्वासाने वावरल्याने ! या बिनधास्त आणि आत्मविश्वासपूर्ण वावरण्याचं प्रतिबिंब आपल्याला तिच्या मस्त अशा डान्स मध्ये दिसत. आमच्या टीमला तर तिचा हा बिनधास्त आत्मविश्वास खूप आवडून गेला. तसेच तिचा डान्सची वाखाणण्याजोगा होताच. तेव्हा म्हंटलं याविषयी आपल्या वाचकांना कळायला हवं. त्यातूनच आजचा हा लेख लिहिला गेला आहे. पण मंडळी, आमच्या वाचकांवर आमचं प्रेम आहे. केवळ या लेखावर आम्ही आपली बोळवण करणार नाही.

त्या मुलीने केलेल्या सुंदर डान्सचा अनुभव आपल्या वाचकांना ही मिळावा ही आमची इच्छा आहे. परिणामतः आम्ही तो व्हिडियो या लेखाच्या शेवटी शेअर करतो आहोत. आपण त्या व्हिडियोचा जरूर आनंद घ्या. तसेच या व्हिडियोतुन आपणही प्रेरणा घेऊन असेच उत्साही, ऊर्जेने परिपूर्ण होऊयात आणि या तरुणीप्रमाणे आयुष्याचा आनंद घेऊयात.

चला तर मंडळी, हा होता आपल्या टीमने लिहिलेला लेख ! या लेखाप्रमाणे आपण आमचे अन्य लेखही पूर्ण वाचता याबाद्दल धन्यवाद ! कारण आपली टीम आपल्या वाचकांसाठी अगदी शोधून शोधून विषय निवडत असते. त्यावर माहिती घेऊन लिहीत असते. दिसलं काही तरी आणि लिहून दिलं अस होत नाही. अनेकवेळा तर विविध विषयांवर लिहिताना खूप वेळ ही जातो. पण आमची लिहायची आणि आपली वाचायची आवड यासाठी आम्ही हे अगदी मनापासून करत असतो. पुढेही करत राहू. गरज आहे ती आपल्या खंबीर पाठिंब्याची जो आम्हाला आतापर्यंत मिळत आला आहे ! तो यापुढेही कायम मिळत राहू दे ही सदिच्छा! लवकरच एका नवीन विषयासह भेटूच. तोपर्यंत काळजी घ्या, आमचे सगळे लेख वाचा आणि आठवणीने शेअर करा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *