जगात डान्सचे अनेक प्रकार बघायला मिळतात. जगातच कशाला, आपल्या येथे पण अनेक नृत्य प्रकार आपण बघतच असतो. किंबहुना प्रत्येक प्रांताची स्वतःची अशी ओळख सांगणारे अनेक नृत्य प्रकार आहेतच. आता एवढे प्रकार आले की डान्स करणारी माणसं पण आली. पण अस असलं तरी डान्स करणारी साधारणतः दोन प्रकारची माणसं असतात असा एक समज असतो. एक, ज्यांना डान्स येतो आणि दुसरे म्हणजे ज्यांना डान्स येत नाही.
पण मंडळी, विश्वास ठेवा. आमची टीम गेली काही वर्षे सातत्याने लेखन करत आली असून, वायरल व्हिडियोज वर लिहीत आली आहे. यातून आमच्या असं लक्षात आलंय की साधारणतः तिसरा ही एक प्रकार असतो. हा प्रकार असतो डान्स न येता ही डान्स येतो असा आत्मविश्वास असणाऱ्या लोकांचा. खरं सांगतो मंडळी, अशा पद्धतीची माणसं कमी नसतात. किंबहुना आधीही त्यांचं अस्तित्व असेलच. पण सोशल मीडियाने या अशा हौशींना एक मुक्त व्यासपीठ दिलं आहे. अगदी त्यांचं स्वतःच लक्ष असेल नसेल तरी इतर कोणी तरी त्यांच्यासाठी हे काम करतच करत. कारण, ही मंडळीच एवढी जबरदस्त वेगळी नाचतात की काय विचारू नका. बरं कोणी कसं नाचावं वगैरे विषयी आमचं काही म्हणणं असण्याचं कारण नाही. पण मंडळी, जेव्हा एखादी घटना दिसते आणि हसू आवरत नाही तेव्हा काय करणार.
आता आज आपल्या टीमने बघितलेल्या व्हिडियोचं उदाहरण घेऊ. हा व्हिडियो तसा अंमळ जुनाच असावा. पण यातील अतरंगी डान्स बघून तो व्हिडियो कधीचा का असेना, काही फरक पडताना दिसत नाही. उलट आपण हा व्हिडियो बघून इतके हसतो की हा व्हिडियो पुन्हा पुन्हा बघतो. खरं खरं सांगायचं तर आमच्या टीमने एव्हाना हा व्हिडियो सातव्यांदा बघितला आहे. एकदा दिसला म्हणून, दुसऱ्यांदा लेखन करण्यासाठी म्हणून आणि पुढच्या पाचही वेळा केवळ आनंद म्हणून. तुम्ही म्हणाल एवढं काय आहे त्यात. पण मंडळी आपणही हा व्हिडियो एकदा बघाच. आमच्या टीमने खासकरून आपल्यासाठी हा व्हिडियो या लेखाच्या शेवटी शेअर केला आहे. यात आपल्याला दोन जणं भेटतात. त्यात एक मुलगी असते जिला डान्स येत असतो. आणि एक उत्साही मुलगा असतो, ज्याला…. आता समजून काय ते. किंबहुना उत्साही म्हणजे काहीसे अतरंगी हे ही समीकरण असतंच. काय नाचतो पोरगा. किंबहुना त्याला तसं वाटत असावे. पण काय अंग घुसळतो. कोकणातल्या बाल्या डान्सची आठवण येते. पण त्यातही एवढी घुसळण नसते.
अहो एवढंच काय नंतर जरा लयदार डान्सही दिसतो. बरं याचा आत्मविश्वास एवढा जबरदस्त असतो की शेवटी जिला डान्स येतो ती मुलगी सुद्धा स्वतःचा डान्स करता करता हसू लागते. आपणही एव्हाना हा डान्स बघितला असेल, तर हसत असाल. नसेल बघितला तर जरूर बघा. किंबहुना आताच जाऊन बघा. कारण तसंही हा लेख आता संपत आला आहे. बाकीचा लेख व्हिडियो बघून झाल्यावर वाचा.
बरं मंडळी, वर उल्लेख केल्याप्रमाणे आता थांबतो. पण आम्हाला खात्री आहे की आमच्या टीमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल. आमच्या वाचकांचं मनोरंजन व्हावं म्हणून आमची टीम सतत कार्यरत असते. हा लेख आणि हे व्हिडियो शेअर करणं हे त्याचाच एक भाग आहेत. आमचे हे प्रयत्न आपल्या पसंतीस उतरत असतीलच. तेव्हा अगदी आठवणीने, आमच्या टीमने लिहिलेले लेख शेअर करा. तसेच आमची टीम, रोजच्या रोज नवनव्या विषयावर लेखन करत असते. तेव्हा ते लेख आवडीने वाचा. आपली आवड म्हणजेच आमचा आनंद. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !
बघा व्हिडीओ :