Breaking News
Home / मनोरंजन / ताईच्या लग्नामध्ये भावंडांनी मिळून केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

ताईच्या लग्नामध्ये भावंडांनी मिळून केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

एखादा समारंभ म्हणजे सगळ्या नातेवाईकांनी एकत्र येऊन एकमेकांना भेटण्यासाठी एक मस्त निमित्त. खासकरून हा समारंभ एखादा लग्नसमारंभ असेल तर मग काय मजाच मजा. कारण लग्न म्हंटलं म्हणजे हळदीचा, काही वेळेस साखरपुड्याचा आणि अर्थातच संगीत हे असे कार्यक्रम मूळ लग्नसोहळ्या सोबत असतातच. त्यातही ज्या घरात लहान आणि तरुण बहीण भावंड असतील तर मग अजून धमाल. अशाच एका लग्नाच्या संगीत कार्यक्रमाचा व्हिडियो आपल्या टीमच्या पाहण्यात आला. आजच्या या लेखातून याच व्हिडियो विषयी थोडंसं.

हा व्हिडियो आपल्यासारख्याच एका मराठमोळ्या कुटुंबातील एका संगीत सोहळ्याचा आहे. त्यातही या कार्यक्रमात एका नृत्यनिपुण ताईने यात पुढाकार घेऊन सगळे डान्स परफॉर्मन्स कोरिओग्राफ केलेले जाणवतात. तिला साथ द्यायला तिची बहीण भावंडं असतात. आपल्या मोठ्या बहिणीच्या लग्नात या सगळ्यांचा डान्स परफॉर्मन्स होत असतो. सुरुवात होते तेव्हा दोन बहिणी उभ्या असतात.

सोबतीला गाण्याची धून वाजत असते. गाणं ऐकल्यासारखं वाटतं. मग लक्षात येतं, हे तर आपलं आवडतं गाणं आहे.मॅचिंग नवरा पाहिजे हे ते गाणं. हे गाणं जस जसं पुढे सरकत तस तसं या दोन्ही मुली आपल्या स्टेप्स करायला सुरुवात करतात. त्यांचा मस्त डान्स सुरू असतो. त्यात आपल्या डाव्या बाजूला दिसत असलेली ताई कदाचित या डान्सची कोरिओग्राफर असावी. सोबत असणारी ताई पण तिला मस्त साथ देत असते. वेगवेगळ्या स्टेप्स आणि तेही अगदी काही वेळात केल्याने या परफॉर्मन्सचा आनंद अगदी पहिल्या क्षणापासून वृंधिंगत होत जातो. पुढे जाऊन या दोघी अजून काय काय डान्स करून दाखवतील हे बघण्याची उत्सुकता आपल्यात असते. पण यात होणारा बदल आपल्याला माहिती नसतो. हा बदल म्हणजे हे गाणं संपतं आणि दुसरं गाणं सुरू होतं तसा यांच्यात एक मुलगा सुदधा येऊन दाखल होतो. नवीन गाणं असतं, टाइमपास चित्रपटातलं ‘पहिल्या धारेच्या प्रेमाने साला’ हे गाणं. हे गाणं मस्त उडत्या चालीचं आहे. तिघेही यावर मस्त डान्स करतात.

त्यात आपल्या दादाची थोडी कॉमेडी स्टेप पण असते. त्यामुळे अजून धमाल.मग तिसरं गाणं सुरू होतं. हे तर अजून हृदयाच्या जवळचं गाणं. झिंगाट हे गाणं लागलं आणि माणसं थिरकली नाहीत असं क्वचितच झालं असेल.या व्हिडियोतील ही सगळी तर तरुण मंडळी असतात. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या परीने डान्स करत असतो. या तिन्ही परफॉर्मन्स मध्ये वेगवेगळ्या स्टेप्स केलेल्या आपल्याला दिसतात, त्यामुळे एकंदरच हा परफॉर्मन्स पुन्हा पुन्हा बघावासा वाटतो. यात जेव्हा हा परफॉर्मन्स संपतो आणि सगळे जण एकत्र येऊन डान्स करतात यावरून त्यांना झालेला आनंद ही कळून येतो. आधीच मंगल प्रसंग आणि त्यात सगळ्यांच्या आनंदात भर घालणारा हा संगीत कार्यक्रम नकळतपणे आपला मूड ही खुश करून जातो. यात संगीत कार्यक्रमातील एरव्ही दिसणारा झगमगाट दिसत नाही पण या तरुण मुलामुलींचे प्रामाणिक प्रयत्न आणि त्या क्षणांचा आनंद घेण्याची वृत्ती दिसते. त्यांच्या या दोन्ही गोष्टींचं कौतुक आहेच. तसेच हे डान्स परफॉर्मन्स ज्यांनी बसवले आहेत त्यांचं ही विशेष कौतुक.

आपल्याला हा व्हिडियो आवडला असणार हे नक्की. त्याचसोबत आपल्या टीमने त्यावर लिहिलेला हा लेखही आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपण वाचक म्हणून आपल्या टीमला नेहमीच प्रोत्साहन देत असता. त्यामुळे नवनवीन विषयांवर लेखन करण्याचा उत्साह आमच्यात येतो. तो उत्साह आणि प्रेरणा यापुढेही कायम राहील, केवळ आपला आमच्या टीमवर असलेला लोभ कायम असू द्या. लेख वाचत राहा, शेअर करत राहा. आपल्या पाठिंब्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद !!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *