Breaking News
Home / मनोरंजन / तात्यांनी केलेला हा अतरंगी डान्स व्हिडीओ पाहून भल्याभल्यांच्या भुवया उंचावल्या, बघा व्हिडीओ

तात्यांनी केलेला हा अतरंगी डान्स व्हिडीओ पाहून भल्याभल्यांच्या भुवया उंचावल्या, बघा व्हिडीओ

खुद्द सपना चौधरीला पण लाजवतील, हजारो आयटम डान्स फिके पडतील, अशी तोड नसलेला डान्स या तात्यांनी करुन दाखविला. अगदी धोतरानंही उडता उडता ठेका धरला. तात्यांच्या या सगळ्या मस्तीमध्ये वय हा केवळ नंबरचं असतो, हे त्यांनी दाखवून दिलंयं. अहो सपना चौधरीच्या गाण्यावर नाचायचं म्हणजे काय एनर्जी लागतेयं ना ही जो नाचलायं ना त्यालाच कळेल. उगा हातपाय हलवायचे म्हणून नाचायचं काम तात्यांनी केला नाही. तात्यांनी त्यांच्या सिग्नेचर स्टेपनं लाखो चाहत्यांना घायाळ करुन टाकलंयं. एकदम तात्या इंटरनेटवर व्हायरल व्हायला लागून राहिले. सपना चौधरीच काय राखी सावंतही असती ना तर तिथंही तोंडात बोटं घातलीं असती, असा हादरवून टाकणारा डान्स तात्यांनी करुन सोडलायं. तात्यांच्या या सगळ्या डान्स परफॉर्मन्सला शिट्ट्या वाजवा, फेटे उडवा आणि काय फार फार तर एक शंभर दोनशे रुपयांचं बक्षिस देऊन टाका.

आणखी एक काकांना दहा पैकी दहा गुण द्यायचे की नाही, ते तुम्हीच ठरवा. डान्स हा फक्त मानवी प्राण्याला जमणारा प्रकार आहे. तसा मोरही नाचतो. पण त्यासाठी पाऊस पडायची वाट पहावी लागते. त्याला पाहून लांडोरही नाचतो. पण नृत्याविष्कार ही कला फक्त निसर्गानं मानवालाच दिलीयं. कधी कधी त्याचा ओव्हरडोस होतो. मग तात्या धोतर कसोट्याला खोचून नाचायला लागतो. काय झालंयं ना तात्याची बसायची वेळ होती. अहो म्हणजे ध्यानाला. रोज संध्याकाळ झाली ना की तात्या न चुकता ध्यानधारणेला बसतात. पण मागच्या मंडपात सुरू झाली ना सपना चौधरी. तात्यांचं मन काय घरात रमना, निघाले मंडपात. तात्याला कुणीतरी आग्रह केला. आता आपल्याला नाय झेपत म्हणून गप रहायचं कि नाय. पण तात्यांनी मनावरच घेतलं. सरळ सुटले की हो उडत्या गाण्याच्या ठेक्याला. तात्यांच्या या सगळ्या डान्सकडं पाहून डीजेलाही चेव सुटला. तात्यांनी या सगळ्यानं अख्खा मंडप डोक्यावर उचलून घेतला होता. तात्या म्हणालं आवाज वाढवं डिजे तुला आयची शपथ हाय.

आईची शपथ दिल्यावर डिजे गप राहतो का त्यानंही आवाज वाढवला. डिजेचा आवाज इतका वाढला की तात्यांच्या अंगात एकदम 440 वोल्टचा करंटचं सळसळला. तात्यांनी एकदम मनावरच घेतलं की, सपना चौधरीचं ते फेमस तेरी अखाँ का यो काजल गाणं लागलं आणि काका एक एकीला घाळाय करुन सोडू लागले. आता इथवर झालं की शांत बसावं की नाही म्हाताऱ्या माणसानं पण नाही. धोतर सुटेपर्यंत नाचायला निघाले. वरचा ठेका धरला. तात्यांना आज आडवणं काय म्हातारीला पण शक्य नव्हता. तात्यांचा एकदम स्वर तीव्र सप्तकावरच लागला होता. आणि एवढं सगळं सुरू असताना तात्यांचा व्हीडिओ कुणीतरी शुट करतंयं हे लक्षातंही आलं नाही. इथंच गेम झालायं. तात्या भानावर येईपर्यंत व्हीडिओ पार गावात व्हायरल झाला. घराघरात पोहोचला. तात्यांनी इंटरनेट थांबंवलं. आता भान उरलं नाही ना की काय होतं हे तात्याचंया डान्सवरून कळलं. असेल.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *