Breaking News
Home / बॉलीवुड / तान्हाजी चित्रपटासाठी ह्या तीन कलाकारांनी पहा किती मानधन घेतले, चित्रपटाने ३ दिवसात तब्बल इतके करोड कमावले

तान्हाजी चित्रपटासाठी ह्या तीन कलाकारांनी पहा किती मानधन घेतले, चित्रपटाने ३ दिवसात तब्बल इतके करोड कमावले

वीर सुभेदार तानाजी मालुसरे ह्यांच्या जीवनावर आधारित ‘तान्हाजी’ चित्रपट गेल्या शुक्रवारी १० जानेवारी २०२० ला रिलीज झाला. अजय देवगण, सैफ अली खान, काजोल, शरद केळकर ह्यासारख्या स्टार कलाकारांच्या भूमिका असेलेल्या ह्या चित्रपटाने महाराष्ट्रात तर धम्माल उडवलीच ह्याशिवाय बॉक्स ऑफिसवर देखील जबरदस्त कमाई केली. ट्रेड अनॅलिस्ट रमेश बाला ह्यांच्या रिपोर्ट नुसार ह्या चित्रपटाने रविवारी २६ कोटींची कमाई केली. ह्या चित्रपटाने ३ दिवसातच तब्बल ६१.१ कोटींची कमाई केली आहे. ह्या ३ दिवसांत चित्रपटाने अनुक्रमे शुक्रवारी १५.१० कोटी, शनिवारी २० कोटी आणि रविवारी २६ कोटींचा गल्ला जमवला. ‘तान्हाजी’ हा चित्रपट भारतात ३८८० स्क्रीन्स वर रिलीज झाला आहे. तर संपूर्ण जगभर ४५४० स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत ह्यांनी केले असून अजय देवगणने हा चित्रपट प्रोड्युस केला आहे. खास गोष्ट अशी कि हा चित्रपट सगळीकडे चांगली कमाई करत आहे. चित्रपटाला बड्या शहरातील मल्टिप्लेक्सला आणि छोट्या जागी असेलेल्या सिंगल स्क्रीन्सवर सुद्धा चांगला रिस्पॉन्स मिळत आहे.

तान्हाजी चित्रपट तर देशभर धुमाकूळ घालतोच आहे परंतु ह्या चित्रपटातील कलाकारांनी किती मानधन घेतले आहे ते तुम्हांला माहिती आहे का ? चला तर जाणून घेऊया ह्या चित्रपटातील मुख्य कलाकारांनी चित्रपटासाठी किती मानधन घेतले आहे ते. अजय देवगण ह्याने चित्रपटात वीर सुभेदार तानाजी मालुसरे ह्यांची जबरदस्त भूमिका साकारली आहे. अजयने आपल्या दमदार अभिनयाने हि भूमिका जिवंत केली. प्रेक्षकही अजयचे कौतुक करताना थकत नाहीत. चित्रपटामधील त्याच्या एक एक डायलॉग आणि ऍक्शन सीनला प्रेक्षक टाळ्या, शिट्या आणि जयघोष करत आहेत. ह्या चित्रपटासाठी अजय देवगणने प्रचंड मेहनत घेतली. अगदी बोलीभाषा ते शरीरयष्टी पर्यंत सर्व लहानमोठ्या गोष्टींचा त्याने अभ्यास केला. ह्या चित्रपटासाठी अजयने फी सुद्धा तितकीच भारी घेतली. अजयला तान्हाजी चित्रपटासाठी तब्बल ३० कोटी रुपये इतके मानधन मिळाले. चित्रपटातील त्याचा अभिनय आणि चित्रपटाला मिळत असेलला प्रतिसाद पाहून हे मानधन योग्यच आहे, हे त्याने सुद्धा सिद्ध करून दाखवले.

अजय देवगण ची पत्नी काजोल हिने सुद्धा ह्या चित्रपटात मुख्य भूमिका स्वीकारली आहे. काजोलने वीर तानाजी मालुसरे ह्यांच्या पत्नी सावित्रीबाई मालुसरे ह्यांची भूमिका साकारली आहे. काजोलने सुद्धा आपल्या उत्कृष्ट अभिनयाने सावित्री बाई ह्यांचे आपल्या पतीबद्दल असलेले प्रेम ह्या भूमिकेतून दाखवून दिले. काजोल आणि अजय देवगण हि पती पत्नीची जोडी तब्बल ११ वर्षानंतर पुन्हा एकदा चित्रपटात पाहायला मिळाली. तान्हाजी चित्रपटासाठी अभिनेत्री काजोलला ५ कोटी रुपये इतके मानधन मिळाले. चित्रपटात जितका दमदार अभिनय अजय देवगणने केला आहे तितकाच दमदार अभिनय सैफ अली खान ह्याने केला आहे. ‘सेक्रेड गेम्स’ सारख्या वेबसिरीज नंतर सैफचा अभिनय आणि त्याची लोकप्रियता सुद्धा चांगलीच वाढली आहे. त्याने ‘तान्हाजी’ चित्रपटात सुभेदार उदयभान ह्यांची क्रूर भूमिका आपल्या वेगळ्याच अंदाजात साकारून आपल्या अभिनयाची छाप सोडली. प्रेक्षक जितके अजय देवगणच्या अभिनयाचे कौतुक करत आहेत, तितकेच सैफच्या अभिनयाचे देखील करताना दिसत आहेत. सैफला ह्या चित्रपटासाठी तब्बल ७ ते १० कोटी रुपये इतके मानधन मिळाल्याचे सांगण्यात आले आहे.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.