Breaking News
Home / जरा हटके / तिबेटच्या डोंगरात आढळणाऱ्या ह्या काळ्या सफाचंदाची किंमत पाहून थक्क व्हाल

तिबेटच्या डोंगरात आढळणाऱ्या ह्या काळ्या सफाचंदाची किंमत पाहून थक्क व्हाल

कधी पाहिलाय असा सफरचंद 

काळे द्राक्ष खूप पहिले असतील, कदाचित तुम्ही रोज एक सफरचंद खात असाल. डॉक्टर पण हाच सल्ला देतो कि, रोज एक सफरचंद खा. प्रश्न हा उद्भवतो कि, तुम्ही कोणत्या रंगाचे सफरचंद पाहिले आहेत. तर उत्तर असेल लाल, हिरवा आणि पिवळसर रंग, आपण ह्याच रंगाचे सफरचंद पाहिले आहेत. आश्चर्याची बाब अशी की, काळ्या द्राक्षा प्रमाणे काळ्या रंगाचा सफरचंद ही असतो. तो पूर्ण काळा नसतो तर त्याचा रंग गडद वांगी रंगाचा असतो. परंतु अचानक पाहिल्या बरोबर त्याचा रंग काळा दिसतो. हा सफरचंदाचा दुर्मिळ प्रकार आहे, तो खूप कमी आढळतो. ह्या सफरचंदाची चव मधापेक्षासुद्धा गोड असते.

तिबेटच्या डोंगरावर होते शेती :

या दुर्मिळ सफरचंदाच्या प्रकाराला ब्लॅक डायमंड म्हणतात, आणि तिबेटच्या पठारावर याची शेती होते. सफरचंदाच्या या जातीला ‘हुआ नीयु’ म्हणतात. चायनीज लोकं त्याला रेड डिलिसियास म्हणतात. तिबेटच्या या गडद वांगी रंगाच्या सफरचंदाच्या पाठी तिब्बत मधील नाईंग भागाची भौगोलिक स्थिती आहे. चीनची कंपनी Dandong Tianluo Sheng Nong ई-कॉमर्स ट्रेड कंपनी ५० हेक्टर जमिनीवर याची शेती करते. हि जमीन समुदाच्या तळापासून ३१०० मीटर उंचावर आहे. हि जागा या प्रकारच्या सफरचंदासाठी सर्वात उत्तम जागा आहे.

या कारणाने म्हणतात ब्लॅक डायमंड :

या ठिकाणचे तापमान दिवसा आणि रात्री खूप वेगळे असते. दिवसा भरपूर सूर्य प्रकाश मिळतो आणि अल्ट्रा वॉयलट किरणे मिळतात. त्यामुळे त्याचा रंग गडद लाल बदलून गडद वांगी होतो. ब्लॅक डायमंडची शेती करणारी कंपनीची डायरेक्टर यु वेजीन म्हणते, “ब्लॅक डायमंड सफरचंदाचा रूप खूप आकर्षित आहे. ते असे दिसते की सफरचंदावर वॅक्स लावले आहे.”

२०१५ ला सुरु झाली शेती :

नाईंग – ची बगान मधे २०१५ साली सफरचंदाची शेती सुरु झाली. ३ वर्षा नंतर काही काही झाडांना फळं लागत होती. या सफरचंदाचा जास्त खप बीजिंग, शंघाई, गुआंंगजौ आणि शेन्जेन या ठिकाणच्या सुपरमार्केट मधे असतो. यांना शक्यतो ६ ते ८ असे पॅकेट बनवून विकतात. ‘टेसेन्ट न्यूज ‘ नुसार या एका सफरचंदाची किंमत ५० युआन म्हणजे कमीत कमी ५०० रुपये एवढी असते.

फक्त ३० टक्के झाडांनाच लागलेत फळं :

या काळ्या सफरचंदाचा उत्पन्न खूप कमी प्रमाणात आहे. साधारणतः एका झाडाला परिपूर्ण होण्यासाठी २ ते ५ वर्ष लागतात. परंतु ब्लॅक डायमंडच्या झाडाला परिपूर्ण होण्यासाठी ८ वर्ष इतका कालावधी लागतो. आत्ता पर्यंत बागेतील झाडांपैकी 30 टक्के झाडांना फळे लागलीत.

बाकी दुनियेसाठी रहस्य :

ब्लॅक डायमंड सफरचंद इतर शेतकरी वर्गासाठी रहस्य आहे. काही बाग मालकांचे म्हणणे आहे की, असे सफारचंद होतच नाहीत. तर काहींचे म्हणणे आहे की, सोशल मीडियावर वायरल झालेले फोटो म्हणजे खरोखर मधे फोटोशॉप आहे.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.