Breaking News
Home / जरा हटके / तीन हजार रुपयांचे चलन फाडले म्हणून वीज इंजिनिअरने पोलिस ठाण्याचीच वीज काढून टाकली

तीन हजार रुपयांचे चलन फाडले म्हणून वीज इंजिनिअरने पोलिस ठाण्याचीच वीज काढून टाकली

ट्रॅफिकचे नियम कडक करण्यासाठी ह्या महिन्यापासून दंडाची किंमतही वाढवण्यात आली आहे. त्यामुळे हजारोंचे चलन कापल्याच्या अनेक घटना सध्या सोशिअल मीडियावर वायरल होत आहे. त्यापैकी अजून एक वायरल होत असलेली हि घटना आहे. परंतु ह्या घटनेत केवळ पोलिसांनीच चलन नाही कापले. तर त्यांच्याबाबतीतही विचित्र घडले आहे. चला तर पाहूया नक्की काय घडलं ते. मेरठ मधील ट्रॅफिक कॉन्स्टेबलने एका माणसाचे चलन फाडले. विना हेल्मेट तो गाडी चालवत होता. तसेच त्याच्या जवळ ना इन्शुरन्सचे कागद होते ना पोल्यूशन सर्टिफिकेट. म्हणूनच पोलीसांनी या महाशयांच्या हाती 3000 रुपयांचे चलन हाती सोपवले. न्यूज १८ चॅनेलने दिलेल्या बातमी नुसार ट्रॅफिक कॉन्स्टेबल राजेश कुमार त्यावेळी ड्युटीवर होते. तेजगढी चौकातून जेई सोम प्रकाश गर्ग ट्रॅफिकच्या नियमांचे उल्लंघन करून जात असताना पोलिस कॉन्स्टेबलनी पकडले व चलन फाडले. या महाशयांनी पोलीस चौकीचीच वीज कापून टाकली.

 

सोम प्रकाशने आपण सरकारी अधिकारी आहोत हे पोलिसांना सांगितले. त्यांनी विचार केला कि जर आपण आपली खरी ओळख सांगितली तर आपल्याला दंड होणार नाही. पण कायदा सगळ्यांना समान असतो. त्यामुळे त्याचे सुद्धा इतर सामान्य लोकांप्रमाणे चलन फाडले. सोम प्रकाशला जेव्हा पोलिसांनी अडवले तेव्हा त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसेन्स आणि आरसी बुक होते. पण बाकीची आवश्यक कागदपत्रे आणि हेल्मेट नव्हते. या प्रसंगी जेई सोम प्रकाश आणि हेड कॉन्स्टेबल यांच्या दरम्यान चलान फाडण्यावरून मोठ्या प्रमाणात वाद झाले. जेई यांनी प्रश्न उपस्थित केला कि कोणते पोलिसवाले नियमांचे पालन करतात? पोलिस चौकी आणि पोलीस ठाण्याचे बील तुम्ही थकवलं आहे. त्याकडे कोणाचेच लक्ष नाहीये.

 

गोष्ट इथेच संपली नाही. जेई यांनी फोन करून लाईनमनला बोलावले व तेजगढी चौकी आणि मेडिकल ठाणे येथील वीजच कापून टाकली. वीज कापल्यानंतर पोलीस चौकीतले पोलिस अधिकारी हैराण झाले. वीज (बराच काळ) जाण्याची शोधाशोध केल्यानंतर त्यांना समजले की हे काम जेई सोम प्रकाश यांच्या आदेशानुसार झाले आहे. ज्याच्या विरूद्ध चलन फाडले होते. त्यानंतर पोलिसांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क केला आणि त्यांना वीज जोडणी करण्याची विनंती केली. मीडिया रिपोर्ट अनुसार पोलिस ठाण्याचे २७,००० रुपयांचे वीजबिल थकले होते. व चौकीच्या बिलाच्या थकबाकी बद्दलची अद्याप कोणत्याही प्रकारची माहिती मिळाली नसली तरी अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर थकबाकीची रक्कम भरली जाईल असे आश्वासन दिले आहे.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *