Breaking News
Home / मनोरंजन / तुम्हीसुद्धा रस्त्यावरील खाद्यपदार्थ खात असताना हि गोष्ट नक्की लक्षात ठेवा, बघा हा संतापजनक व्हिडीओ

तुम्हीसुद्धा रस्त्यावरील खाद्यपदार्थ खात असताना हि गोष्ट नक्की लक्षात ठेवा, बघा हा संतापजनक व्हिडीओ

काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात एका बेकरीत काही कामगार काम करताना दिसत आहे. यातील एक कामगार चक्क टोस्ट चाटत आहे. आणि त्यावर थुंकी लावत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कल्पना येईल की कशा प्रकारे आपल्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. ही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला उलटीही होऊ शकते. कारखान्यांमध्ये कामगार ज्याप्रकारे काम करत आहेत ते पाहून अक्षरशः तुम्हाला संताप येईल. तेव्हा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिले असेल की, एका ट्रेमध्ये टोस्ट ठेवण्यात आले आहेत आणि इथले कामगार या टोस्टवर पाय देऊन बसले आहेत. एवढंच नाही तर एक कामगार काही टोस्ट उष्टे करून ठेवत आहे आणि वरून हसत आहे. हा व्हिडीओ जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा मात्र लोकांमध्ये प्रचंड संतापाची लाट आली आणि त्यामगोमाग काही अस्वच्छता दाखवणारे व्हिडीओ बाहेर पडले. त्यानंतर एका माणसाचा पाणीपुरीसाठी नाल्याच पाणी वापरत असल्याचा व्हिडीओ समोर आला.

त्यानंतर एक व्यक्ती फळांचे सलाड करून कशा अस्वच्छ पध्दतीने फळे साफ करतो, दुसरा व्यक्ती पुऱ्या तळताना कसे स्वतःच्या बगलेला लावत होता… याचाही व्हिडीओ समोर आला. त्या काळात असे अनेक अस्वच्छ व्हिडीओ समोर आले आणि लोकांनी बाहेर खायचे बंद केले पण शेवटी लोक ते लोकच… एखादी गोष्ट फार दिवस लक्षात ठेवत नाहीत. विसरून जातात परिणामी अशा फसवणूक करणाऱ्या लोकांना संधी मिळते. पण हे लोक आपल्या आरोग्याशी खेळत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ मुंबईतला असल्याची शक्यता सांगितली जात आहे. अवघा काही सेकंदाचा असला तरी हा व्हायरल व्हिडीओ आपल्याला खूप महत्वाची गोष्ट सांगत आहे. या व्हिडीओत आपल्याला दिसून येईल की, एक व्यक्ती हातगाडीवर काही खाद्यपदार्थ विकत आहे. आणि दुसरा व्यक्ती मागच्या बाजूला एकदम घाणेरड्या पाण्यात थाळ्या धुत आहे. धुत आहे म्हणजे फक्त पाण्यातून काढत आहे. आणि लगेच पुढे या थाळ्यात लोकांना ते खाद्यपदार्थ खाण्यासाठी दिले जात आहेत. हे जर असेच चालू राहिले तर का नाही लोकांना आरोग्याच्या समस्या उदभवणार? हा झाला फक्त एका व्हिडीओ पुरता विषय…

रोज असे या पद्धतीने कित्येक लोक अन्नपदार्थ सेवन करत असतात. हातगाड्यावर तर कुठल्याही प्रकारची स्वच्छता नसते. ना हे खाद्यपदार्थ बनवताना चांगला माल वापरला जातो. फक्त हातगाड्याच नाही तर कधी कधी मोठ्या हॉटेलमध्येही असाच प्रकार असतो. आरोग्याला आपल्याकडे अजिबात गंभीरपणे घेतले जात नाही. म्हणजे अगदी आपल्याकडे दुधाला अमृताची उपमा दिली जाते. दूध हा रोजच्या आहारातील एक महत्त्वाचा घटक आहे. घरातील सर्वजण विशेषकरून लहान मुले व वृध्द यांच्या आहारात मोठ्या प्रमाणात दूध असते. आपला देश हा जगातील सर्वात जास्त दूध उत्पादन करणारा देश असूनदेखील शुद्ध दुधाचा पुरवठा होत नाही. अलिकडेच घरात वापरल्या जाणाऱ्या दुधात सर्वाधिक भेसळ आहे, असे उघड झाले आहे. अशा या परिस्थितीत तुम्ही काय खावे? कुठे खावे? यावर विचार व्हायलाच हवा. शेवटी खायला त्यांनी दिलं तरी पोटं आणि आरोग्य आपलं आहे ना…

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *