Breaking News
Home / मनोरंजन / तुम्ही ह्या आजोबांचा आवाज एकदा एकाच, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय राहणार नाही

तुम्ही ह्या आजोबांचा आवाज एकदा एकाच, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय राहणार नाही

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या वेगवेगळ्या व्हिडिओला नेटकऱ्यांचा नेहमीच प्रतिसाद मिळतो. सोशल मीडियावरील त्या व्हिडिओला शेयर करुन अनेकजण मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळवतात. यामुळे कित्येकांना मोठा आर्थिक फायदाही झाला आहे. त्यात रस्त्यावर गाणाऱ्या वयस्कर राणु मंडलला टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील एका बड्या रियॅलिटी शो मध्ये बोलावण्यात आले होते. कच्चा बादाम फेम भुवन बड्याकरला देखील प्रसिद्धी मिळाली होती. आताही एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यातील एक आजोबांनी जुने मराठी गाणे गायले आहे. त्याला नेटकऱ्यांनी मोठा प्रतिसादही दिला आहे. हा गाण्याचा आता महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

असं म्हटलं जातं की, माणूस 60 वर्षांच्या पलिकडे गेला की त्याला वृद्ध मानलं जातं. कारण त्याच्या शारीरिक व्याधी वाढतात. त्याला विविध प्रकारचे आजार उद्भवतात. अशी अनेक म्हातारी माणसं तुम्ही आपल्या आसपास पाहिली असतील. परंतु हे 60 वर्षांचे असेही काही लोक पाहिले असतील जे वयाने वाढलेले असतात पण मनाने मात्र तरुण असतात. उत्साह घटलेला असतो पण मावळलेला नसतो.

असेच एक आजोबा मात्र अशा सर्व वृद्धांना अपवाद ठरत आहेत. खरं तर त्यांचा आवाज, त्यातील दर्द पाहून अनेक तरुण मंडळी देखील थक्क होतायेत. या आजोबांनी ज्या पद्धतीने हे गाणं गायलं आहे, ते पाहून असे वाटते की, एखाद्या तरुणाने आपल्या तरुण निखळ प्रेयसीसाठी गायले आहे. पूर्वी एखाद्याला प्रसिद्धी मिळवण्यासाठी भरपूर प्रयत्न करावे लागायचे. आता मात्र सोशल मीडियामुळे परिस्थिती बरीच बदलली आहे. आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकजण रातोरात प्रसिद्धीझोतात येतात. मागील काही दिवसांपासून शेंगदाणे विकणाऱ्या भुबन बड्याकर यांच्या Kacha Badam गाण्याने इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ घातला आणि रातोपात बड्याकर प्रसिद्धीझोतात आले. लोक त्यांच्यासोबत सेल्फी घेत आहेत. कच्चा बदाम गाण्यावर फक्त देशातीलच नव्हे तर विदेशातील सेलिब्रिटीही इन्स्टाग्राम रिल्स बनवत आहेत. कच्चा बदाम गाणं अजूनही लोकांच्या ओठांवर असतानाच आता या आजोबांच्या गाण्याने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

हे खेडेगावात राहणारे आजोबा आहेत. जे ‘सांग कधी कळणार तूला, भाव माझ्या मनातला’ हे गीत गात आहेत. एका क्षणाला तर असं वाटून जातं, या आजोबा लोकांची एक गायन स्पर्धा घ्यायला हवी, जी टीव्हीवर व्हावी. जेणेकरून वयस्कर लोकांना त्यांची कला जगासमोर आणता येईल. कारण त्यांच्या काळी सोशल मीडिया वगैरे गोष्टी नव्हत्या. आता या आजोबांनी गायलेले हे गाणे पाहून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल. इतकं हुबेहूब आणि अफलातून हे गाणं आहे. हे गाताना आजोबाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच नूर आहे. या वयात या आवाजाची देणगी लाभलेले हे आजोबा लवकरच देशभरात प्रसिद्ध होतील.

या व्हिडीओमध्ये असलेले आजोबा हे अगदी रस्त्यावर बसलेले दिसून येत आहेत आणि आपल्या मधुर आवाजाची लोकांवर एक वेगळीच जादू पसरवलीय. त्यांचा आवाज ऐकून नेटकऱ्यांनी त्यांचा हा व्हिडीओ वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर करत अक्षरशः डोक्यावर बसवलंय. गाणं गात असताना हे आजोबाना कुठलेच बॅगराउंड म्युझिक नाही. फक्त त्यांचा आवाज आहे. संपूर्ण ताल, चाल आणि लयीत गाणे म्हणत या आजोबांना सोशल मीडियावरील लाखो लोकांची मने जिंकली आहेत. त्यांची गाणी ऐकून कोणीही मंत्रमुग्ध होऊ शकतो. हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.