Breaking News
Home / मनोरंजन / तुम्ही ह्या गावठी मायकल जॅक्सनचा डान्स पाहिला का, भाऊने एक से एक खतरनाक स्टेप्स मारल्या आहेत

तुम्ही ह्या गावठी मायकल जॅक्सनचा डान्स पाहिला का, भाऊने एक से एक खतरनाक स्टेप्स मारल्या आहेत

मायकल जॅक्सन नृत्य क्षेत्रातल्या प्रत्येकाचा देवच; त्याच्या भेदक स्टेप्स आणि लकबिंनी समोरचा घायाळ झाला नाही तरच नवल. पोरीतर मायकल जॅक्सनचा डान्स पहायला गेल्या की हार्टअटॅक येऊन पडायच्या; त्यांच्या साठी आता कांदे लावावे लागतील एवढा मायकल जॅक्सनचा डान्सचा फिवर असायचा. आता अर्जित सिंग जसा घायाळ करतो ना अगदी तसच. मायकल जॅक्सन गेला पण त्याचा डान्स कायम अजरामर राहीला. डान्समधल्या प्रत्येकाचा तो प्रेरणास्थान होता. आपल्याला कधीकाळी असा डान्स घ्यायला हवा, असं प्रत्येक नर्तकाला वाटत असेल. डान्स करायला पॅशन लागतो आणि ते पॅशन मायकलच्या रक्तातच होता. पण आज आपण बोलणार आहोत एका वेगळ्याच मायकल जॅक्सनबद्दल. खरतर या या व्यक्तीला मायकल जॅक्सन म्हणावं की नाही इथूनच वादाचा मुद्दा आहे. पण त्याने जो काही मूनवॉक केलाय त्यातून मायकल जॅक्सन ची एक झलक दिसते हे मात्र खरं. पण हा काही प्रोफेशनल डान्सर नाही नाईंटी घेतल्यानंतर जो काही परिणाम झालाय त्यातून असला गावठी मायकल जॅक्सन तयार झालाय.

या गावठी नक्कल जॅक्सनला सोशल मीडियावर ही लाखोंनी हिट्स येत आहेत. आपलं कसं असतं माहिती आहे का जरा पोटात थर्टी सिक्स्टी नाईंटी गिअर पडू लागले की आपण मायकल जॅक्सन काय जस्टिन बीबर चा बापालाही घाबरत नाही. आपल्या याच करामती मुळ आपण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या सगळ्यात आपल्याला एक कळून चुकेल की व्यसन केल्या वर माणूस कुठच्या लेवलला जाऊ शकतो, याची प्रचिती ही व्हिडिओतून येते. पोरं काय करतात मायकल जॅक्सन सारखा डान्स करायचा म्हटलं की हजारो रुपये खर्च करून शेकडो तास वाया घालवून मायकल जॅक्सनची स्टेप शिकायला जातात आणि मग कुठेतरी गॅदरिंगच्या आणि सोसायटीच्या कार्यक्रमात मायकल जॅक्सन चे दोन-तीन स्टेप म्हणतात आणि स्वतःला मायकल म्हणवतात. पण या मायकल जॅक्सन काहीतरी वेगळेच आहे गावठी मायकल जॅक्सन ने स्वतःची जबरा फॅन कम्युनिटी तयार केली आहे की भाऊचे स्टेप बघायला आता बार नाही दरबार भरतो.

मायकल जॅक्सन ही वरून याचे स्टेप पाहत असेल तर कपाळावर हात मारून घेत असेल. त्याचं झालं काय, मायकल जॅक्सन एकदा मुंबई शो करायला आला होता. त्यावेळी भाऊ एकदम फॅन मोमेंट म्हणून हा शो पहायला गेला होता. ते मायकल जॅक्सन इतका डोक्यात बसला की पुढे भाऊ सरळ चालायला मागे ना फरशी वरून चालायचं मूनवॉक करायचा. साधं पायर्‍यांवरुन उतरायचं तरी भावाला स्टेप सुचायचे. हा पण मायकल जॅक्सन होणार असतं, तेव्हाच या पोरांना वाटलं होतं पण हे गणित काय पठ्ठयाला जमलं नाही. ही परिस्थिती हीच सगळ्याचं उत्तर पुढे मग भावाला थर्टी सिक्स्टी नाईंटी असा नाद लागला. या नादात पण भाऊ मून वॉक काय विसरला नव्हता. नाईंटीचा गियर लागला की मूनवॉक आपोआप बाहेर पडायच, त्याला कोणी बोलवायला लागायचं नाही. म्हणजे ते कसे सगळं नॅचरल आपोआप आणि पोरं तिकडे इकडं क्लासला जाऊन त्यांना काय असला मूनवॉक जमला नाही. ते म्हणतात ना आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. तशीच गत भावा तुझ्या या गावठी मायकल जॅक्सनच्या पात्राला ला सलाम!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *