बॉलिवूडचा लोकप्रिय विनोदी कलाकार गेले काही महिने तुरुंगात होता. बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवचे म्हणणे आहे की, जेल मध्ये राहताना स्वतःला पुनः ओळखायला आणि आयुष्य नव्या पद्धतीने पाहण्याची संधी मिळाली. राजपाल यादवने सांगितले की “देशाचा कायदा सर्वांसाठी सारखा आहे. जेल मध्ये जो आदेश दिला तो पाळला” त्याला चेक बाऊन्स झाल्याच्या कारणाने तीन महिने जेल झाली होती. तो या वर्षी फेब्रुवारीच्या शेवटी तिहाड जेल मधून बाहेर आला. याच संदर्भात त्याने एका मीडियाशी इंटरव्ह्यू दिला.
प्रश्न: जेल चा अनुभव कसा होता?
उत्तर: जेलच्या कायद्याचा मी खूप आदर करतो. प्रशासनाने मला जिथे उभे केले, तेथे पूर्ण अनुशासनने उभे राहण्याचा प्रयत्न मी केला. मी कायद्याच्या बाहेर नाही! जेल मध्ये मला जो आदेश मिळाला तो मी पाळला.
प्रश्न: तिथली सगळ्यात मोठी शिकवण काय होती?
उत्तर: मला वाटते की, स्वतःला ओळखण्याची संधी मिळाली. जसे शेतकरी आपल्या शेतात पिकलेले गहू खाण्या व विकण्याच्या व्यतिरिक्त बियाणांसाठी राखून ठेवतो. तसेच मला वाटतेय जेल मध्ये गेल्यानंतर देवाने मलाही बी बनवणाऱ्या गहू बनण्याची संधी दिली.
प्रश्न: तिथे खाण्याची व्यवस्था कशी आहे ? असे सांगितले की, तिथे खाण्यालायकही जेवण मिळत नाही?
उत्तर: नाही असे नाही! जे असे बोलतात, त्यांनी एक वेळ तिकडे भेट दिली पाहिजे. तेव्हा त्यांना कळेल की, तिथे खाण्या-पिण्याचा, व्यवहार तसेच संस्कार कशा प्रकारचे असतात. तिथे नियमांप्रमाणे पौष्टिक आहार मिळतो.
प्रश्न: जेलची अशी कोणती गोष्ट जाणून आश्चर्य झाले?
उत्तर: तिथे इंग्लिश हिंदी शिकवतात. सर्वाना वाचनालय देतात. 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट ला व्यवस्थित प्रेरणा देतात. मी डिसेंबर पासून फेब्रुवारी पर्यंत तिथे होतो. तेव्हा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा पाहिला. सर्वांना गाण्याच्या द्वारे प्रेरणा दिल्या जातात. सर्व कैदी भावांना कोणत्याही भेदभावाशिवाय यामध्ये भाग घेण्याचा आदेश येतो. त्या दिवशी सर्वांमध्ये सकारात्मक ऊर्जा पहायला मिळते. जे खूप छान वाटले. जेल प्रशासन तेथे माहिती देतात. सर्वांना खूप शिकायलाही मिळते.