Breaking News
Home / मनोरंजन / तुर्की आईस्क्रीम वाल्याने ह्या लहान मुलाची गंमत केल्यावर मुलाची रिऍक्शन पाहून हसू आवरणार, बघा व्हिडीओ

तुर्की आईस्क्रीम वाल्याने ह्या लहान मुलाची गंमत केल्यावर मुलाची रिऍक्शन पाहून हसू आवरणार, बघा व्हिडीओ

आईस्क्रीम हा शब्द एकदा का उच्चारला की तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. त्यात जर हा खाद्यपदार्थ खायचं ठरलं की सहसा आपण त्याच्यापासून दूरही वळत नाही. आईस्क्रीम हे खाऊनच राहतो. खासकरून लग्न समारंभात आईस्क्रीम खाणं (मग ते कितीही साध्या फ्लेवरचं का असेना), हा तर आपल्या आवडीचा विषय. असाच काहीसा मोह एका लहान मुलाला झाला. बरं त्या लग्नात तुर्की आईस्क्रीमवाला आणला गेलेला होता. मग काय अजून धमाल. हीच धमाल एका व्यक्तीने टिपली आणि पुढे हा व्हिडियो सोशल मीडियावर शेअर झाला. आपल्या टीमच्या ही पाहण्यात आला. मग काय त्याविषयी लिहावं अस ठरलं आणि आजचा हा लेख लिहिला जातो आहे. चला तर मग वेळ न दवडता, या व्हिडियो विषयी जाणून घेऊयात.

हा व्हिडियो आपल्याला तुर्कीश आईस्क्रीमवाल्याच्या टेबल काउंटर वरून बघायला मिळतो. त्यामुळे समोर बससेल्या सगळ्या जणांचे हसरे चेहरे आपल्याला पूर्ण व्हिडियोभर बघता येतात. त्यात अगदी समोर असतो तो वर उल्लेख केलेला लहान मुलगा. निळ्या रंगाचा, फुलफुलांची नक्षी असलेला पोशाख घातलेला हा मुलगा हुशार दिसत असतो. तसेच आईस्क्रीम खायला मिळणार याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत असतो.

व्हिडियो सुरू होतो तेव्हा हा आईस्क्रीमवाला या मुलाच्या हातात आईस्क्रीमचा कोन देतो. पण तुर्की आईस्क्रीमवालाच तो ! गंमत जंमत केल्याशिवाय कसा सोडेल. कोन दिल्यावर त्यावर आईस्क्रीम टाकताना तो हलकासा झटका देतो. त्यामुळे आईस्क्रीम सकट कोन वर जातो. त्याच्या या एकाच कृतीने हा लहान मुलगा एवढा दचकतो की आपण हसायला लागतो. पुढे तर त्याच्या दचकण्याची साखळीच सूरु होते. दुसऱ्या वेळी हा आईस्क्रीमवाला, कोनमधूनखाली आईस्क्रीम खाली पडलंय असं दाखवतो. त्यावेळी ही हा मुलगा दचकतो. मग बाकीच्या करामती करून दाखवतो. कोन्सची अदलाबदली करताना तर मजा येते. ‘हा आईस्क्रीमवाला असा काय’ असे भाव त्या मुलाच्या चेहऱ्यावर दिसून येतात. इथे आपण मात्र पोट धरून हसत असतो. मग पून्हा आईस्क्रीम खाली पडल्याचा अभिनय या आईस्क्रीमवाल्याकडून केला जातो. ही सगळी गंमत पाठी बसलेली वर्हाडी मंडळी पाहत असतात. या मुलाचं दचकून पाठी जाणं त्यांनाही हसून सोडत असतं. तसेच हा आईस्क्रीमवाल्या विषयी थोडी भीती, थोडी उत्सुकता आणि आईस्क्रीम खाण्याची इच्छा या सगळ्या भावना या मुलाच्या चेहऱ्यावर दाटून आलेल्या आपल्याला दिसत असतात. त्यामुळे आपणही पूर्ण व्हिडियोभर हसत राहतो.

पण जेव्हा शेवटी हा आईस्क्रीमवाला त्याला टिशू पेपर देतो आणि मग आईस्क्रीम देतो तेव्हा हा मुलगा निरागसपणे त्याला टिशू पेपर परत देतो. त्या एका क्षणाने आपल्याला त्याचं कौतुक वाटून जातं. कारण त्याला आईस्क्रीम हवं असतं आणि ते मिळतं तेव्हा जे नको ते तो देऊन टाकत असतो. टिशू पेपरचा उपयोग त्याला माहिती नसावा. पण त्यामुळे त्याच्यातील प्रामाणिकपणा अधोरेखित होतो आणि त्याचंच खूप कौतुक वाटतं. आपणही जर हा व्हिडियो पाहिला असेल तर आपल्यालाही हा व्हिडियो आवडला असणार. नसेल पाहिला, तर हा व्हिडियो जरूर पाहा. केवळ ३० सेकंदांचा व्हिडियो असला तरी बराच आनंद देऊन जातो.

तसेच मंडळी, आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच विविध विषयांवर लेखन करत, आपल्या भेटीस आणत असते. आपणही त्यास उत्तम प्रतिसाद देत असता आणि टीमला प्रोत्साहन ही देत असता. आपलं हे प्रोत्साहन आम्हाला यापुढेही मिळत राहू दे ही सदिच्छा. आपली टीमही वाचकांसाठी नेहमीच उत्तमोत्तम लेख लिहीत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे आपण न वाचलेले लेख जरूर वाचा आणि आनंद घ्या. त्यांना आठवणीने शेअर करा आणि हा आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.