Breaking News
Home / मनोरंजन / तुर्की आईस्क्रीम वाल्याला असे कुणी ह्या अगोदर रडवलं नसेल… बघा ह्या मुलाने काय आयडिया केली ते

तुर्की आईस्क्रीम वाल्याला असे कुणी ह्या अगोदर रडवलं नसेल… बघा ह्या मुलाने काय आयडिया केली ते

आईस्क्रीम खायला कुणाला आवडत नाही? लहानांपासून मोठ्यांपर्यंत आईस्क्रिमचे अनेक दिवाने आहेत. उन्हाळ्यात तर लोक आईसक्रीम अगदी मनसोक्त खातात, पण आता हिवाळ्याचा ऋतू आहे, तेव्हा तुम्हाला रस्त्यावर आईस्क्रीम खाताना मोजकेच लोक दिसतील. पण आयस्क्रिम लव्हरला ऋतूशी काही देणं घेणं नसतं. कधीकधी आईस्क्रीमशी संबंधित व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतात, जे खूपच मजेदार असतात. असाच एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक लहान मूल आईस्क्रीम घेण्यासाठी गेलं होतं, पण आईस्क्रीमवाला त्याच्यासोबत प्रँक करायला लागला. हा व्हिडिओ इतका मजेशीर आहे की, तो पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच पोट धरुन हसाल.

तुम्ही कधी तुर्की स्टाइलमध्ये आईस्क्रीम खाल्लं असेल तर तुम्हाला समजेल की स्टाईल कशासाठी फेमस आहे. ही आईस्क्रीम हातात देताना इतकं फसवलं, घुमवलं जातं की बास्स. अनेकदा ती हातात दिल्यासारखी करतात आणि काढून घेतात. हा एक पद्धतीचा प्रॅन्क आहे. असे तुर्किश आईस्क्रीमचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालेत ज्यात लहान मुलांवर हा प्रॅन्क केला जातो.

यासंदर्भांतले इतक्या पद्धतीचे व्हिडीओ आहेत सोशल मीडियावर की आता ती वेळ आली होती जेव्हा एका तरी लहान मुलाने या सगळ्याचा बदला घ्यायला लागणार होता. शेवटी एक व्हिडीओ व्हायरल झालाय ज्यात एका लहान मुलाने त्याच्या समस्त समवयस्क बांधवांच्या वतीने बदला घेतलेला आहे. आणि हा बदला खऱ्या अर्थाने सार्थ झाला.

या व्हायरल व्हिडीओमध्ये जेव्हा आईस्क्रीम विक्रेता या लहान मुलासोबत चलाखी दाखवण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा तोच तोंडघशी पडतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला असंच वाटेल की, या मुलाने या विक्रेत्याला चांगलाच धडा शिकवला आहे. हा छोटा जाडजूड मुलगा आपल्या शक्तीने कार्यक्रम करणार हे त्याच्या एकूण वागण्यातून लक्षात येत होतं.

ज्यापद्धतीनं तो आला, ते पाहूनच लक्षात येत आहे की, या मुलाला माहित होतं की, त्याच्यासोबत असा काहीसा प्रकार घडणार आहे. ज्यामुळे तो तयारीतच येतो. तसेच हा तुर्कीश आईस्क्रीम विक्रेता काहीही चलाखी करण्यापूर्वी त्याच्या हातातून आईसक्रीम घेतो. आणि ती पण हिसकावून घेतो. जेव्हा दुकानदार आईसक्रीम द्यायला ती त्यांच्या स्टाईलची काठी पुढे करतो. तेव्हा हा मुलगा आईस्क्रीम नाही डायरेक्ट काठीच हिसकावून घेतो.

आईस्क्रीम प्रँक करणार्‍या व्यक्तीच्या या कृतीने मुलाला आधीचच राग आलेला असतो आणि तो लगेचच रागाच्या भरात, आयस्क्रिम कोन व्यवस्थित आईस्क्रीम सह काढून घेतो आणि रागात सगळा बदला घेतल्याच्या आनंदात निघून जातो. लहान मुलाचा हा गोंडस व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे. त्याने ज्या पद्धतीने आईस्क्रीम करणाऱ्या व्यक्तीवर आपला राग काढला आहे, तो लोकांना आवडला आहे. आता हा व्हिडीओ तुम्हीही पहा आणि आईस्क्रीम प्रॅन्क करणाऱ्यांना शेअर करा… नाहीतर त्यांचही असाच पोपट व्हायचा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *