Breaking News
Home / मराठी तडका / ‘तू बुधवार पेठेतली RAND आहेस’ यूजरच्या कमेंटवर मानसी नाईकने लाईव्हवर दिले चांगलेच उत्तर

‘तू बुधवार पेठेतली RAND आहेस’ यूजरच्या कमेंटवर मानसी नाईकने लाईव्हवर दिले चांगलेच उत्तर

सध्या सोशिअल मीडियाच्या काळात प्रत्येकालाच स्वतःचे विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. परंतु अनेकदा काही लोकं ह्याचा गैरफायदा हि घेतात. सोशिअल मीडियावर अनेकदा कलाकारांना ट्रॉल केले जाते. कधी त्यांच्या दिसण्यावरून, चित्रपटातील कामावरून तर कधी कपड्यांवरून. परंतु काही ट्रॉलर्स तर त्याही पलीकडे जाऊन खूपच घाणेरड्या शब्दात वैयक्तिक टीकेची पातळी गाठतात. बहुतेकवेळा अभिनेत्रींना अशाप्रकारचे अनुभव आले आहेत. असाच काहीसा अनुभव मराठी अभिनेत्री मानसी नाईक हिला आला. हा अनुभव मानसीने लाइव्हदरम्यान शेअर केला. मानसी नाईक हिच्या फोटोवर एका यूजरने खूपच अश्ली’ल भाषेत कमेंट केली होती. मानसीने त्या कमेंटला एक चांगलेच प्रतिउत्तर देखील दिले. सोबत तिचा ह्या बाबतीतला दृष्टिकोनसुद्धा लोकांसमोर ठेवला आहे.

मानसीने व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले कि, ‘हा टॉपिक फक्त मुलीसांठीच नाही तर मुलांसाठी सुद्धा आहे जे स्वतः ट्रॉल होतात, त्यांच्यावर अश्ली’ल कमेंट येतात. परंतु त्यांच्या बाजूने कोणी बोलायला नसतं. परंतु कलाकार ह्या नात्याने आम्हांला असं वाटते कि हा मुद्दा घेऊन बोललंच पाहिजे. कारण प्रत्येकवेळी दुर्लक्ष करून देणे हे सोल्युशन नाही आहे. कुठेतरी कधीतरी अश्या लोकांना सांगणे गरजेचे आहे. आणि अश्या लोकांना सुद्धा सांगणे गरजेचे आहे जे अश्या कमेंट्स वाचतात परंतु काही बोलत नाही.’

आपला अनुभव शेअर करताना मानसीने सांगितले कि, तिच्या एका फोटोवर एका युजरने ‘तू बुधवार पेठेतली RAND आहेस’ अशी कमेंट केली होती. ती कमेंट वाचून मानसीला थोडंसं हसू आले परंतु कुठेतरी खूप वाईट सुद्धा वाटले. परंतु मानसीने त्या युजरला प्रश्न केला कि, “पहिली गोष्ट बुधवार पेठेतली मी आहे बघायला तुम्ही बुधवार पेठेत मला कधी बघितलंत आणि तुम्ही तिथे काय करायला गेला होतात. “

पुढे मानसी म्हणाली कि, “दुसरी गोष्ट बुधवार पेठ हि जागा ज्या बायका चालवतात ते तुम्हाला काय वाटतं ते का चालवतात? का कधी प्रश्न तुम्ही स्वतःला विचारलात का. ते स्वतःचे पोट भरत आहेत. त्यांना सुद्धा स्वतःचे एक अस्तित्व आहे. त्या मेहनत करतात. हा विचार न करता हि एक शि’वी म्हणून एका अभिनेत्रीला कुठल्याही फोटोवर किती सहजपणे बोलून जातं.”

अशाप्रकारची मानसिकता कुठून येते असा सवालही पुढे मानसीने त्या युजरला केला आहे. त्यासोबतच मानसीने तेथील स्त्रियांबद्दल आपले मत मांडले. त्या बायका स्वतःचे पोट भरण्यासाठी घर चालवण्यासाठी मेहनतीने छातीठोकपणे करत आहेत. तुम्हाला बोलणं इतकं सोपं असेल तर तुम्ही ते करून दाखवा. मग आम्ही पण बघतो तुम्ही कसे घर चालवता ते.

त्याचसोबत तिने अश्या कमेंट वाचून पण काही न बोलणाऱ्यांना सुद्धा जाब विचारला आहे. मित्रांनो अशाप्रकारचे मुद्दे जर बाहेर येतील तेव्हाच अश्या लोकांना धडा शिकेल. तुम्हीही अशाप्रकारचे कमेंट्स जेव्हा पाहाल तेव्हा नक्की त्यांना जाब किंवा प्रतिप्रश्न जरूर करा. त्याशिवाय त्यांना आवर घालता येणार नाही. आम्ही तो व्हिडीओ खाली देत आहोत. नक्की बघा एकदा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.