Breaking News
Home / मनोरंजन / ‘तेरी आँखो का ये काजल’ गाण्यावर ह्या भाऊंनी केलेला जबरदस्त डान्स पाहून तुमचे देखील पाय थिरकू लागतील, बघा व्हिडीओ

‘तेरी आँखो का ये काजल’ गाण्यावर ह्या भाऊंनी केलेला जबरदस्त डान्स पाहून तुमचे देखील पाय थिरकू लागतील, बघा व्हिडीओ

लग्न असो वा कोणताही समारंभ असो. जिथे जिथे गाणं असतं तिथे सहसा डान्स हा असतोच. अर्थात काही अपवाद ही असतात. पण काही समारंभ मात्र डान्स शिवाय पूर्णच होऊ शकत नाहीत. याचं लग्न हा समारंभ म्हणजे अगदी उत्तम उदाहरण आहे. कारण हा एक असा समारंभ आहे जिथे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे डान्स परफॉर्मन्स बघायला मिळतात.

त्यातला प्रसिद्ध असा प्रकार म्हणजे वरातीतला डान्स ! हा डान्स अगदी कोणीही करतात. त्यासाठी डान्स यायला हवा, आवड हवी वगैरे कशाचीही गरज नसते. आवड असलीच तर चांगलीच ठरते, पण नसली म्हणून काही अडत नाही. त्यामुळे ज्याला नुसतं अंग हलवता येतं तो सुद्धा या धुमाकूळ डान्स प्रकारात डान्स केल्यागत करत असतो. मग येतो तो संगीत कार्यक्रम. यात तर एकापेक्षा एक उदाहरण बघायला मिळतात. कधी एकट्या दुकट्याने केलेले डान्स परफॉर्मन्स तर कधी ग्रुप परफॉर्मन्स बघून आपलं मनोरंजन होत असत. त्यात ज्यांना डान्स येत नाही त्यांना बघून तर अजून मजाच मजा येते. खासकरून आपणही त्यांच्यासारखे नॉन डान्सर्स असतो तेव्हा तर अजून मजा येते.

आपल्यापेक्षा ही कोणी तरी खराब डान्स करू शकतं याविषयी आपण स्वतःच स्वतःची समजूत घालत असतो आणि आनंद मानत असतो. ते ही आपला डान्स बघून हेच म्हणत असावेत. असो. गंमतीचा भाग सोडला तर एक मात्र खरं की लग्नात डान्स करणं यांमुळे धमाल येते. पण सगळ्यांत जास्त धमाल मजा मस्ती, त्यांच्यामुळे येते जे अगदी मनापासून डान्स परफॉर्मन्स देऊन जातात. अशा व्यक्ती ज्यांना डान्स खूप आवडतो त्यांना नाचताना बघणं ही पर्वणी असते. सोबतच त्यांच्यामुळे बाकीचे सगळे ही मस्त मस्त डान्स स्टेप्स करू लागतात. त्यामुळे माहोल एकदम जबरदस्त होऊन जातो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आज आपल्या टीमने पाहिलेला व्हिडियो होय. हा व्हिडियो काही वर्षांपूर्वीचा आहे. यात आपल्याला एक असा मुलगा भेटतो ज्याला डान्सची प्रचंड आवड आहे हे दिसून येतं. आता आम्ही किंवा आपण त्याला वैयक्तिक रित्या ओळखत नसलो तरी त्याचा डान्स बघून मजा येते. त्यात अजून मजेशीर गोष्ट म्हणजे तो हा डान्स उपस्थित असलेल्या सगळ्यांना शिकवत असतो. त्यामुळे ते ही त्याच्या स्टेप्स करून बऱ्यापैकी नाचत असतात. त्यांचं कौतुक वाटतंच.

अर्थात अस असलं तरी हा मुलगाच व्हिडियोच्या केंद्रस्थानी असतो. त्याचा उत्साह आणि बिट्स पकडत नाचणं यांमुळे हा व्हिडियो जबरदस्त वाटतो. बरं डान्सची आवड असल्याने बिट्स पकडणं यासाठी त्याला विशेष मेहनत करावी लागत नाही. अगदि सहज वाटेल अशा पध्दतीने तो नाचत असतो. त्यात त्याच्या स्टेप्स सुद्धा शब्दांना न्याय देणाऱ्या वाटतात. तसेच गाणं ही आपल्या आवडीचं असतं. ‘तेरे आख्यां का यो काजल’ हे हरयाणवी गाणं वाजत असतं. त्यामुळे हा व्हिडियो म्हणजे एक तडकतं गाणं आणि त्याला साजेल असा डान्स यांचं उत्तम मिश्रण आहे. आणि जे जे उत्तम ते आपल्याला आवडतंच नाही का. किंबहुना म्हणूनच आजच्या या लेखात या व्हिडियो विषयी लिहायचं ठरलं. कारण जे जे उत्तम त्याविषयी लिहावं याकडे आमच्या टीमचा कटाक्ष असतो.

त्यातूनच आजच्या सारखे हे लेख प्रत्यक्षात येतात. आपल्याला ही हे लेख आवडतात हे आपल्या प्रतिसादावरून कळतं. आजचा हा लेखही आपल्या पसंतीस उतरला असेल अशी अपेक्षा आहे. सोबतच आपण जर यात उल्लेख केलेला व्हिडियो ही बघितला असेल तर आपलं दुप्पट मनोरंजन एव्हाना झालं असेल. पण आपण हा व्हिडियो बघितलेला नसेल तर मात्र आपण एका उत्तम डान्सला मुकाल. म्हणून आपल्या टीमने हा व्हिडियो खाली शेअर केलेला आहे. आपण हा व्हिडियो जरूर बघा आणि त्याचा आनंद घ्या. पण मंडळी एक मात्र जरूर करा. मनोरंजनाचा हा डबल आनंद तुमच्या प्रमाणे इतरांना ही घेऊ द्यात. हा लेख मोठ्या प्रमाणात शेअर करा. तसेच आपली टीम आपल्या वाचकांसाठी नेहमी उत्तम लेख लिहीत असते. त्यामुळे अन्य लेख ही वाचत चला आणि त्यांचा आनंद घ्या. अर्थात पुन्हा तो आनंद वाटायला विसरू नका. असो. लवकरच एका नवीन विषयावरील लेखासह भेट होईलच..तोपर्यंत आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.