Breaking News
Home / ठळक बातम्या / तोंडाने पाणी शिंपडत इस्त्री करणाऱ्याचा व्हिडीओ कॅमेरात कैद, बघा हा किळसवाणा प्रकार

तोंडाने पाणी शिंपडत इस्त्री करणाऱ्याचा व्हिडीओ कॅमेरात कैद, बघा हा किळसवाणा प्रकार

इंटरनेटवर दररोज काहीतरी नवीन आणि वेगळेपणा असणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओला कसलच बंधन नसतं. कधी कोणती आणि काय गोष्ट इंटरनेटवर व्हायरल होईल सांगता येत नाही. सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. काही व्हिडीओंमध्ये मजेशीर गोष्टी दाखवण्यात आलेल्या असतात. तर काही व्हिडीओंना पाहून आपण अवाक् होतो. असाच एक व्हिडिओ आमच्या हाती लागला आहे. इंटरनेटवर लहान मुलांपासून तर म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. लोक त्याचा आनंदही घेतात. कधी कधी अगदी किळस येईल, असेही व्हिडीओ समोर येतात. आज आमच्या टीमच्या हाती चक्क असाच एक किळसवाणा व्हिडीओ आला आहे. आता तुम्ही म्हणाल,… जर व्हिडीओ किळसवाणा आहे तर आम्हाला का दाखवताय… तुम्हाला दाखवण्याचे कारण हे आहे की, जो गोष्ट या व्हिडीओत घडली आहे, ती आपल्यासोबत घडायला नको, याची तुम्ही काळजी घ्याल.

जितक्या व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, असे आपण नेहमीच म्हणत असतो. जगात जसे प्रेमळ, संवेदनशील आणि दयाळू लोक असतात तसे क्रूर, नालायक आणि किळस येईल, असे वागणारे लोक पण असतात. यातील तिसऱ्या नंबरचे म्हणजेच किळसवाणे लोक समाजासाठी अत्यंत घातक असतात. कारण क्रूर आणि नालायक लोक त्यांच्या नजरेतून आणि कृतीतून ओळखू येतात मात्र किळसवाणे लोक वरून दिसायला वागायला चांगले असले, तरी आतून मनाने किळसवाणेच असतात. तर अशाच एका अतिशय भंगार मानसिकता असलेल्या एका छोट्या व्यावसायिकाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

काही दिवसांपूर्वी थुंकी लावून रोटी आणि नान तयार करत असलेल्या एका व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर एका बेकरीत टोस्टला थुंकी लावणाऱ्याचाही व्हिडीओ समोर आला होता. असे अनेक किळसवाने व्हिडीओ मधल्या काळात समोर आले. थुंकी लावणाऱ्या या प्रकारावरुन नागरिकांकडून संताप व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी यावर कडक कारवाई केली होती. त्यानंतर असंच आणखी एक किळसवाण्या कृत्याचा नवा व्हिडीओ उघडकीस आलाय. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती चक्क तोडांने पाणी शिंपडत इस्त्री करताना दिसून येतोय. हा व्हिडीओ पाहून तुमच्या सुद्धा तळपायाची आग मस्तकात जाईल.

जेव्हा आपण इस्त्री करण्यासाठी कपडे देतो, तेव्हा आपल्याला व्यवस्थित इस्त्री केलेले आणि कडक इस्त्री झालेले कपडे अपेक्षित असतात. अशावेळी इस्त्री करणारी मंडळी कपड्यांवर पाणी टाकतात, जेणेकरून कपडे छान कडक इस्त्री व्हावेत. पाणी टाकलेल्या कपड्यावर गरम इस्त्री पडली की कपडे पाण्याने सरळ होतात. पाण्याने इस्त्री करणे ही अत्यंत प्रभावी प्रक्रिया आहे. पण पाणी कसं शिंपडता हे देखील महत्त्वाचं असतं. सामान्यतः, हाताने किंवा स्प्रे बाटली वापरून पाणी शिंपडले जाते. पण या व्हायरल व्हिडीओमधल्या एका वृद्धाने कपडे इस्त्री करण्यासाठी चक्क तोंडात पाणी टाकून मग ते कपड्यावर शिंपडलंय. व्हायरल व्हिडीओत आपल्याला दिसून येते की, इस्त्रीवाला पांढऱ्या रंगाच्या कपड्यावर तोंडाने पाणी स्प्रे करताना दिसत आहे. पातेल्यातलं पाणी तोंडात घेऊन कपड्यावर टाकताना दिसत आहे. इस्त्रीवाल्याकडे जुन्या काळातील कोळश्यावर चालणारी इस्त्री असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. आता अशा भंगार मानसिकता असलेल्या लोकांचे करायचे काय? हा प्रश्न मलाही पडला आहे. पण यावर कारवाई व्हावी, हे नक्कीच.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *