Breaking News
Home / मनोरंजन / ‘त्या’ गोष्टीमुळे घोडा पिसाळला आणि नवऱ्याला घेऊन लग्नमंडपातूनच फरार झाला, बघा व्हिडीओ

‘त्या’ गोष्टीमुळे घोडा पिसाळला आणि नवऱ्याला घेऊन लग्नमंडपातूनच फरार झाला, बघा व्हिडीओ

आमच्या गावाकडे माझ्या मावसबहिणीचं लग्न होतं. साधारण 17-18 वर्षांपूर्वीचा किस्सा. नवरदेवाला हौसेने मिरवण्यासाठी घोडा आणला होता. नेमका दाजीने घोड्यावर बसायचा उशीर आणि घोडा उधळला. काही वेळाने म्हणजे 10 मिनिटात मालकाने घोड्याला आवरलं आणि शांत केला. पण आता आमचे दाजी मोक्कार घाबरले होते. दाजी काय घोड्यावर बसायला तयार होईनात. शेवटी नाय-होय करत दाजीला दुचाकीवर बसवून मिरवायला नेलं. आता हे दाजी मुळातच घाबरट स्वभावाचे आहेत. आता विचार करा, दाजी घोड्यावर बसले असते आणि हाच घोडा उधळला असता तर… आमच्या घरात लग्न वगैरे असलं की हा किस्सा आवर्जून चर्चिला जातो. लग्नात अशा गमती-जमती घडत असतात. कधीकधी या गमती महागातही पडतात. आता असाच एक लग्नातील धमाल व्हिडीओ आमच्या टीमकडे आला.

हा व्हिडिओ अवघ्या काही सेकंदाचा आहे. व्हिडीओ बघून तुम्हाला सुरुवातीला हसू येईल. नंतर तुम्हीही विचार कराल की नवऱ्या मुलाची पुढे काय अवस्था झाली असेल. आजकाल सगळीकडे लग्नात नवरदेवाला घोड्यावर मिरवण्याचा ट्रेंड आहे. मग भले नवरदेवाला कुणी विचारत नाही, तुला घोड्यावर बसून मिरवायचे आहे की नाही?

या सगळ्या गोष्टी प्रतिष्ठेसाठी केल्या जातात. काही ठिकाणी तर नवरदेवच डीजे आणि घोडा नसल्याने रुसून बसतो. पण आपल्याकडे प्रतिष्ठा महत्वाची असते पसंतीपेक्षा… असो लै सिरीयस न होता आपण आपल्या व्हिडीओकडे वळूयात. तर व्हिडीओत आपल्याला दिसतं की, सगळीकडे मस्त लग्नाचा माहोल बनलेला आहे. थोडयावेळाने मंडपात ब्राम्हण ‘नवरी मुलीचा मामा नवरीला घेऊन या’ अशी ऑर्डर सोडणार आहे. त्याआधी नवरदेवाला गावात देवाच्या पाया पडून आणायचं आहे. नवरदेवाच्या मित्रांना नवऱ्याच्या पुढे नाचायच आहे. नवरीच्या भावांनी दाजीसाठी घोड्याचा इंतजाम केलेला आहे. कधी गाडीच्या टपाडावर न बसलेला दाजी आता थेट घोड्यावर मिरवणूक निघणार, म्हणून नर्व्हस दिसतोय.

आधीच नवरदेवाला घोड्यावर बसायचं टेन्शन, त्यात हे नवरदेवाचा कुर्ता घालून बसायचं म्हणजे पॅन्ट टाईट होणार… पॅन्ट फाटू नये, अशी प्रार्थना नवरदेव मनातल्या मनात करत असतोय. आपल्या पेताड मित्रांना सांभाळायचं ही टेन्शन त्याला आहे. आणि एवढ्यात जे नको व्हायला पाहिजे, तेच होतं. मेहुण्याचं तोंडावर आजवर कधीच न दिसलेलं टेन्शन दिसतं. घोड्याचा मालक ‘आता आपल्याला पैशे मिळणार नाही म्हणून टेन्शनमध्ये येतो. नवरीच्या ‘दिल की धडकन’ स्लो होते. नवऱ्याच्या मित्रांचीही चढलेली एका क्षणात उतरते. नेमकं होतं काय, हे बघण्यासाठी व्हिडीओ बघावा लागणार ना भाऊ… पण तरीही लै सस्पेन्स न ठेवता सांगतो.

वर्हाडीमंडळींच्या घोळक्यांच्या मधोमध नवरदेव मस्त तोऱ्यामध्ये घोड्यावर बसलेला असतो. अचानक वर्हाडी मंडळीपैकी एकाने पॉपर (बर्थडेत वैगेरेत उडवतात तो) लावला. तो पॉपर फटाका फुटताच मोठ्याने आवाज आला. आणि प्राणी फटाक्यांना घाबरतात. त्यामुळे पॉपरचा आवाज येताच घोडा मोठ्या जोरात उधळतो. इतक्या जोरात उधळतो की, घोड्याच्या मालकाच्या हातातून रस्सीही सुटते. आणि क्षणात घोडा नवरदेवाला घेऊन सणाट निघून जातो. आता नेमकं पुढं काय होतं, याचा मात्र व्हिडीओ आमच्या हाती लागलेला नाही.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.