Breaking News
Home / मनोरंजन / थिएटरमध्ये पावनखिंड पाहत असताना एका शिवभक्तांने दिलेली गारद, व्हिडीओ पाहून तुमच्यादेखील अंगावर शहारे येतील

थिएटरमध्ये पावनखिंड पाहत असताना एका शिवभक्तांने दिलेली गारद, व्हिडीओ पाहून तुमच्यादेखील अंगावर शहारे येतील

पावनखिंड ! या पंचाक्षरी शब्दाने, ती ऐतिहासिक घटना आठवून अंगावर काटा न उभा राहिला तरच नवल. त्यामुळे या घटनेवर आधारित चित्रपट येणार आहे हे कळल्यावर उत्सुकता ताणली गेली होती. पण चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी करोनाची माशी शिंकली आणि हा चित्रपट जवळपास दीड एक वर्षांनी प्रदर्शित झाला तो गेल्या आठवड्यात ! सहसा मध्ये एवढा काळ गेलेला चित्रपट आज किती आवडेल हा कोणालाही प्रश्न पडू शकतो.

पण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेला इतिहास हा कालातीत आहे, काळाच्या सीमांपलिकडे गेलेला आहे. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील कोणत्याही घटनेवर आधारित कलाकृती ही कोणत्याही कालखंडात पाहिली की स्फूर्ती येतेच येते. त्यातही पावनखिंडीत शत्रूचे ४० हुन अधिक वार अंगावर झेलणाऱ्या पण तरीही खंबीरपणे उभ्या थकलेल्या बाजी प्रभूंची झुंज ही कोणालाही प्रेरणा देईल अशीच आहे. आयुष्यात अगदी नकारात्मक विचार असणाऱ्या माणसाने ही घटना एकदा जरी ऐकली तरी त्यास स्फुरण चढावे. इथे तर या चित्रपटाने ही घटना अक्षरशः जगता येते. ज्यांनी हा चित्रपट अजून पाहायचा आहे त्यांना कदाचित चट्कन अंदाज येते नसेल. पण वाचकांनो, हा चित्रपट बघून आपण जेव्हा बाहेर पडतो तेव्हा आपण निशब्द असतो. त्या वीरांचं कार्य किती थोर होतं हेच सारखं सारखं डोक्यात येत असत.

काही जण तर अशावेळी आपल्या मनातील भावनांना आवरु शकत नाहीत. आता भावना अनावर झाल्या की दोन गोष्टी घडतात. एक तर स्फूर्तिदायक काही तरी काम होतं किंवा कोणाला त्रासदायक असं तरी काम होतं. पण हा चित्रपट पाहणारे सगळे छत्रपतींचे मावळे असतात. त्यामुळे आपल्याकडून इतरांना त्रास होत नाही. पण स्फूर्तिदायक असं काम होतंच होतं. अनेक जण जय भवानी ! जय शिवाजी ! म्हणत महाराजांना आणि त्यांच्या शिलेदारांना नमन करतात. तर काही जण चित्रपट संपल्यावर गारद म्हणतात ! आता छत्रपती शिवाजी महाराजांसाठी म्हंटली जाणारी गारद आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. अगदी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गड कोटांवर ही गारद ऐकणं म्हणजे एक अविस्मरणीय क्षण असतो. हाच क्षण काही तरुणांमुळे आपल्याला थिएटर्स मध्ये ही अनुभवता येतो. बरं, संपूर्ण चित्रपट पाहून आपल्या मनात बऱ्याच भावना दाटून आलेल्या असतात. त्यामुळे आपसूकच ही गारद ऐकून आपण जागच्या जागी उभे राहतो आणि आपला आदर व्यक्त करतो. आमच्या टीमच्या सदस्यांनी ही हा चित्रपट पाहिला आणि तत्क्षणी यावर काही लिहावं अस वाटलं. आता समीक्षा लिहावी तर ते योग्य वाटेना. पण सुदैवाने एका तरुणाचा ‘गारद’ म्हणतानाचा व्हिडियो बघण्यात आला.

हा व्हिडियो आमच्या टीमचा नाहीये हे इथे पुन्हा एकदा नमूद करायला हवं. पण या क्षणात व्यक्त झालेली भावना, छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचा आदर हा या व्हिडियोतुन व्यक्त झाला असं वाटलं. म्हणून सदर व्हिडियो खाली शेअर करत आहोत. या व्हिडियोत आपल्याला एक तरुण गारद म्हणताना दिसतो. त्याचा तो खणखणीत आवाज अख्ख्या चित्रपटगृहात घुमला असणार हे नक्की. इतकंच काय, पण उपस्थित प्रत्येकाचं मन हेलावून गेलं असणार !

असो. वर उल्लेख केल्याप्रमाणे हा चित्रपट पाहून त्यावर काही छान लिहावं अस वाटत होतं आणि हा व्हिडियो बघण्यात आला. एक चांगला योगायोग घडून आला ! त्यातूनच आजचा हा लेख आमच्या टीमने लिहिलेला आहे. याच प्रमाणे येत्या काळातही उत्तमोत्तम असे विषय आणि लेख घेऊन आपली टीम आपल्या भेटीस येत राहीलच. आजपर्यंत आपण आम्हाला ज्याप्रमाणे माया लावली आहेत, त्याचप्रमाणे यापुढेही पाठबळ द्या. आमची टीमही वर उल्लेख केल्याप्रमाणे उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच यातील एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचा हा लेख आपल्याला आवडला असल्यास नक्की शेअर करा. तसेच अन्य लेखही डोळ्यांखालुन नक्की घाला. आपल्या पाठिंब्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *