Breaking News
Home / मनोरंजन / दिराच्या लग्नात वहिनीने केला सर्वांसमोर अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

दिराच्या लग्नात वहिनीने केला सर्वांसमोर अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

‘लो चली मैं, मेरे देवर की बारात लेके’ हे गाजलेलं गाणं आपल्याला सगळ्यांना आठवत असेलच. या गाण्याला स्वतःचा असा एक प्रेक्षकवर्ग आहे. हम आपके हैं कौन या चित्रपटाची लोकप्रियता आहेच, पण या गाण्याची लोकप्रियता ही वाखाणण्याजोगी आहेच. आजही अनेक लग्नप्रसंगी या गाण्याची फर्माईश होताना दिसते. मग काय डीजे वाले बाबू हे गाणं वाजवतात आणि उपस्थित वहिनी मंडळी आपल्या दिराच्या लग्नात मनसोक्त नाचून घेतात. आज आपल्या टीमने असाच एक व्हिडियो पाहिला. आपल्या वाचकांना त्याविषयी वाचायला आवडेल असं वाटलं आणि आजचा हा लेख लिहिला जातो आहे.

व्हिडियो सुरू होतो तेव्हा समोर डीजे दिसतो. लग्नमंडपाची सजावट चांगली केली आहे हे लक्षात येतं. हे सगळं होई पर्यंत ज्यांचं लग्न असतं, त्यांच्या वहिनी आपल्या समोर येतात. एव्हाना वर उल्लेखलेलं गाणं ऐकायला मिळतं. वहिनी सुदधा या गाण्यावर अगदी आवडीने डान्स करायला सुरुवात करतात. डान्सची आवड असेल तर डान्स आपोआप उत्तम होतोच. या वहिनींच्या डान्स मधून ते दिसून येतं.

त्या अगदी आत्मविश्वासाने नाचत असतात. पण त्यांना या गाण्यावर केवळ एकटीने डान्स करणं नको असतं. त्यांना सोबत हवे असतात ते नववधू आणि वर. मग काय, अगदी वहिनीच्या हट्टाने त्या, या दोघांना डान्स फ्लोअर वर घेऊन येतात. डान्स फ्लोअर वर हे दोघेही येताच या जोडीची छाप पडते. एकदम राजेशाही जोडपं दिसत असतात दोघे. हिरव्या रंगाच्या मॅचिंग कपड्यांमध्ये ही जोडी अजून खुलून दिसत असते. इथे वहिनी सुद्धा छान दिसत असतात. त्यात त्या खुश असतात. गाणं पुढे जात जातं. वहिनी नव्याने स्टेप्स करत या गाण्यात रंग भरत असतात. नवविवाहित जोडप्याला ही डान्स करण्यासाठी प्रोत्साहन देत असतात. त्याला दिर म्हणजे या व्हिडियोतील नवरा मुलगा छान प्रतिसाद देतो. मस्त नाचतो. नवरी पण डान्स करते पण शेवटी शेवटी. या गाण्यात असलेली प्रत्येक ओळ जिवंत करण्यात या वहिनी यशस्वी होतात.

त्या जेवढ्या आनंदाने डान्स करत असतात, तेवढाच आनंद त्यांना या दोघांना एकत्र बघून होत असतो. त्यांच्या स्टेप्स मधूनही हे जाणवतं. अर्थात कितीही चांगली गोष्ट असली तरी संपुष्टात येतेच. तसंच या डान्सचं पण आहे. पण त्यात एक छान बाब म्हणजे आपल्या वहिनीला केंद्रस्थानी ठेवत या नवरा बायकोने केलेली शेवटची स्टेप छान वाटते. आपणही हा व्हिडियो कदाचित पाहिलेला असू शकतो. आजपर्यंत जवळपास ९५ लक्ष लोकांनी हा व्हिडियो पाहिलेला आहे. आपल्याला हा व्हिडियो आवडला ही असेल.

त्याचप्रमाणे आपल्या टीमने लिहिलेला हा लेखही आवडला असणार यात शंका नाही. आपण नित्यनेमाने आपले लेख वाचता. मोठ्या प्रमाणावर शेअर ही करता अनं ते ही अगदी आनंदाने. यापुढील काळातही आपल्या टीमला आपण वाचक म्हणून पाठिंबा देत राहालाच. आपला हा लोभ आपल्या टीमप्रति कायम टिकून राहू दे ही सदिच्छा. धन्यवाद !!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *