आपल्या कुटुंबां मध्ये असलेल्या प्रत्येक नात्याचं नाव घेतलं तर आपल्या डोळ्यासमोर काही चित्र उभी राहतात. जसं की वहिनी आणि दिर म्हणजे मायेचं आणि खेळकर नातं. या नात्यात जर वहिनी मोठी असेल तर नक्कीच ती त्या दिरासाठी एका मोठ्या बहिणीप्रमाणे आणि काही बाबतीत तर आईप्रमाणे असते. काही वेळेस तर भावाला एखादी गोष्ट सांगायची तर वहिनी शिवाय पर्याय नसतो. अस हे मोकळं ढाकळ नातं. त्यामुळे आपल्या दिराचं लग्न असताना त्यात वहिनी मजा आणि धमाल करणार नाही असं होतं नाही. अशाच एका वहिनीच्या डान्सचा वायरल व्हिडियो आज आपल्या टीमने पाहिला. म्हंटलं त्याविषयी लिहिलं तर आवडेल आपल्या वाचकांना म्हणून हा लेखप्रपंच मांडला आहे.
हा व्हिडियो आहे शर्मा कुटुंबाच्या विवाह सोहळ्यातला. या कुटुंबातील ज्यांचा विवाह पार पडला आहे त्या नवरा बायकोचं युट्युब चॅनेल म्हणजे Mrs&MrSharma. या युट्युब चॅनेल वरून आपल्याला सदर व्हिडियो बघता येतो.या व्हिडियोला आतापर्यंत जवळपास साडे सात लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यावरून या व्हिडियोची लोकप्रियता लक्षात यावी.
या व्हिडियोत आपल्याला या जोडप्याच्या वहिनी उत्तम डान्स करताना दिसून येतात. व्हिडियो सुरू होतो तेव्हा एकदम राजेशाही थाटात डेकोरेशन केलेला मंच दिसत असतो. त्यावर एकदम राजेशाही आणि भरजरी पोशाख घातलेल्या वहिनी उभ्या असतात. त्यांच्या व्यक्तिमत्वाला शोभेल असा हा पोशाख असतो. व्हिडियो सुरू होतो आणि एक ओळखीचं गाणं वाजायला लागतं. ‘लो चली मैं, मेरे देवर की बारात ले के, लो चली मैं’ हे ते सुप्रसिद्ध गाणं. डान्स करायला खुद्द वहिनी आणि त्यात हे गाणं म्हणजे दुग्ध शर्करा योग होय. गाणं सुरू होतं तशा वहिनी एकेक करून छान छान स्टेप्स करू लागतात. एवढा भरजरी पोशाख घालून डान्स करणं म्हणजे दिव्यच पण वहिनी ते दिव्य पार करून जातात. एवढंच कशाला तर होणाऱ्या देवरानीला म्हणेज नववधूला सुद्धा या डान्स मध्ये सहभागी करून घेतात. मग दोघींच्या काही स्टेप्स एकत्र होतात. पण त्या गाण्यांच्या बोलांनुसार मग या मोठ्या वहिनी एकेक स्टेप्स करू लागतात. त्यांचा अभिनय उत्तम असतो त्यामुळे मजा येते. त्या छोट्या वहिनीसुद्धा त्यांच्या जेठानी च्या डान्सची मजा घेत असतात.
सरतेशेवटी मग पुन्हा जेठानी, आपल्या देवरानीला सोबत घेऊन पुन्हा एकत्र डान्स करू लागतात आणि व्हिडियो संपतो. खरं तर व्हिडियो अगदी लहान आहे. केवळ १ मिनिट ११ सेकंदांचा हा व्हिडियो आहे. पण त्यातही या दोन्ही जावा जावांमधलं प्रेम यातून स्पष्टपणे दिसून येतं. येत्या काळातही हे प्रेम असेच वृद्धिंगत होत राहू दे हीच सदिच्छा. शर्मा कुटुंबाला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !! हा व्हिडियो आपल्या टीमला तर प्रचंड आवडला. आपणही हा व्हिडियो पाहिला असेल तर आपल्याही पसंतीला उतरला असेल.
तसेच हा लेखही आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम आपल्या वाचकांसाठी नेहमीच विविध विषयांवर लेख लिहीत असते. हा लेख सुद्धा त्यातलाच एक आहे. आमच्या टीमला हे सगळं शक्य होतं ते आपल्या प्रोत्साहनामुळे. यापुढेही आपलं हे प्रोत्साहन आम्हाला मिळत राहो ही सदिच्छा. आपल्या या प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !!
बघा व्हिडीओ :