एखादी कलाकृती आपल्या म्हणजेच प्रेक्षकांच्या मनात भरली की मग तिचं स्वतःच अस एक स्थान निर्माण करते. असं एक स्थान जे जवळजवळ अढळपद असतं. अन्य शब्दांत सांगायचं झालं तर प्रेक्षकांच्या भावनांना हात घालणाऱ्या कलाकृती या लोकप्रिय होतात आणि त्या स्मरणात ही राहतात. आता हम आपके हैं कौन या सिनेमाचं उदाहरण घेऊ. हा सिनेमा, यातील कथानक आणि गाण्यांसकट प्रेक्षकांना परिचित आहे. अगदी आजही, तब्बल २८ वर्षांनंतर ही या सिनेमाची जादू कायम आहे. कारण एकच, या सिनेमाने प्रेक्षकांच केवळ मनोरंजन केलं नाहीये, तर त्यांच्या भावनांना हि स्पर्श केला आहे.
याचं एक उत्तम उदाहरण आमच्या टीमला नुकतंच मिळालं. बऱ्याच दिवसांनी सिनेमा विषयी काही लिहावं अस वाटत होतं. मग काय लिहायचं काय लिहायचं म्हणून विषय शोधले जात होते. तेवढ्यात एक वायरल व्हिडियो आमच्या नजरेस पडला. आजपासून जवळपास आठ वर्षे जुना असा हा व्हिडियो होता. किंबहुना आजही आहे. या व्हिडियोला तब्बल ५३ लाख व्ह्यूज मिळाले आहेत. म्हंटलं हा व्हिडियो बघायला पाहिजे. कारण सहसा व्ह्यूज हे एवढ्या मोठ्या प्रमाणात असतील तर व्हिडियो ही बहुधा चांगले असतात. अर्थात त्यात अपवाद असू शकतात. पण हा व्हिडियो त्यास अपवाद नव्हता. आमचा अंदाज खरा ठरला होता.
हा व्हिडियो म्हणजे एक उत्तम व्हिडियो ठरला. त्याला कारणीभूत ठरल्या या व्हिडियोत डान्स करणाऱ्या एक ताई ! या ताईंच्या कुटुंबात तेव्हा लग्न समारंभ वगैरे असावा. बहुधा त्यांच्या दिराचं लग्न असावं असा अंदाज करता येतो. असं का वाटलं त्याचं कारण पुढे येईलच. असो. तर व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला डान्स फ्लोअर आणि डीजे दिसून येतो. तसेच या ताई डान्स फ्लोअरच्या मध्यभागी उभ्या असतात. गाणं सुरू होतं आणि त्यांचा डान्स ही सुरू होतो. वर उल्लेख केलेल्या, ‘हम आपके हैं कौन’ मधील ‘लो चली मैं, अपने देवर की बारात ले के’ हे सुप्रसिद्ध गाणं वाजत असतं. या लोकप्रिय गाण्यावर या ताई अगदी सुरेख नृत्य करतात. त्यांच्या हाताच्या लयदार हालचाली, ठुमके, तसेच प्रसन्न व्यक्तिमत्व यांनी त्या हे नृत्य बहारदार करतात. त्यांच्या डान्स स्टेप्स मधून त्यांना नृत्याची आवड असावी हे कळून येतं. तसेच त्यांनी कदाचित डान्सचं प्रशिक्षण ही घेतलं असावं. अर्थात त्यांनी प्रशिक्षण घेगलेलं असेल वा नसेल पण त्यांनी केलेला डान्स हा एखाद्या डान्स कोरिओग्राफरला सुचेल असाच आहे. तसेच अशा उत्स्फूर्त गाण्यांवर डान्स करताना आपल्यात तेवढी सकारात्मक ऊर्जा आणि उत्साह असणं गरजेचं असतं. या ताईंकडे असलेली सकारात्मक ऊर्जा ही तर पदोपदी जाणवत असतेच. तसेच त्या उत्साही आहेत हे ही जाणवतं.
पण या व्हिडियोचा सर्वोच्च क्षण येतो जेव्हा, ‘कल तक थी घर की बहु, अब हुं जेठानी’ हे वाक्य येत तेव्हा ! या वाक्यावर या ताईंना जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो त्याला तोड नाही. यावरूनच वाटतं की बहुधा त्यांच्या दिराचं लग्न असावं आणि त्यानिमित्ताने त्यांनी डान्स केला असावा. अर्थात कारण काहीही असो, या ताई उत्तम डान्स करतात हे नक्की. आमच्या टीमला तर या ताईंचा डान्स खूप आवडून गेला. तसेच यातील गाण्याची आणि पर्यायाने सिनेमाची लोकप्रियता ही कळली. कारण या ताईंनी हा सिनेमा प्रदर्शित झाल्यावर तब्बल २० वर्षांनी या गाण्यावर डान्स केला होता. यावरून या कलाकृतींची लोकप्रियता लक्षात यावी. असो. आपणही या ताईंचा डान्स बघितला असेल तर आपल्याला ही आवडला असेलच. पण आपण हा उत्तम डान्स बघितला नसेल तर जरूर बघा. आमची टीम सदर व्हिडियो आपल्या वाचकांसाठी या लेखाच्या शेवटी शेअर करणार आहे. तेव्हा या कलाकृतीचा आनंद घ्या.
बरं तर मंडळी, आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :