‘हम आपके हैं कौन’ हा चित्रपट येऊन काही दशकं झाली. पण लोकप्रियतेच्या बाबतीत शिखरं सर केलेला हा चित्रपट आजही बऱ्याच बाबींमुळे लक्षात राहतो. त्यातली एक बाब म्हणजे या चित्रपटातली गाणी. आजकालच्या काळात खासकरून लग्नाच्या वेळी या गाण्यांना ऐकायला मिळण्याची संधी मिळते. खरं तर इतक्या वर्षानंतरही चित्रपट गीतांची किती लोकप्रियता असावी याचं एक प्रातिनिधिक उदाहरण. आपल्या टीमला याचा पुनःप्रत्यय आला जेव्हा आपल्या टीमने एक व्हिडियो बघितला.
हा व्हिडियो आहे एका लग्नातला. या व्हिडियोत आपल्याला ‘लो चली मैं, मेरे देवर की बारात लेके’ हे गाणं ऐकायला मिळतं. तसेच त्यावर नवरदेवाच्या वहिनींनी केलेला अप्रतिम असा डान्स ही बघायला मिळतो. हा व्हिडियो सुरू होतो तेव्हा दरवाजा उघडून वहिनी, नवरा मुलगा आणि नवरी मुलगी येताना दिसतात. हे क्षण टिपण्यासाठी म्हणून कॅमेऱ्यांची गर्दी झालेली असते.
हा व्हिडियो काही वर्षांपूर्वीचा असल्याने यात गर्दी खूप असते. या गर्दीतून वाट काढत काढत हे तिघेही पुढे येत असतात. खरं तर त्यात वहिनी अगदी आघाडीवर असतात. सुरू असलेल्या गाण्यावर त्या छान स्टेप्स करत असतात. त्यातील शब्दांना अनुसरून त्यांनी स्टेप्स निवडलेल्या असतात हे कळून येतं. तसेच दोन कडव्यांमधील म्युझिक मध्ये वेळ न दवडता नवरा नवरीला पुढे नेत राहतात. त्यामुळे एके ठिकाणी गर्दी होत नाही. त्यांच्या एकंदर हुशारीने केलेल्या कोरिओग्राफीचं कौतुकच. तसेच त्यांच्या उत्साहाचं देखील कौतुक. स्टेप्स करता करता नवरा नवरीकडे ही त्यांचं लक्ष असतं. मधेच नवरी असलेली ताई पाठी राहते. तिला त्या पूढे घेऊन येतात. तीच बाब नवरा झालेल्या दादांच्या बाबतीत. तसेच आपल्या स्टेप्स मध्ये या दोघांनाही सहभागी करून घेत असतात. हा सगळा सोहळा उपस्थित आनंदाने बघत असतात. आपणही त्यात अगदी आनंदाने सहभागी होत असतो.
शेवटी या दोघांना एकत्र करून या वहिनी एक छान पारंपरिक स्टेप करतात आणि या दोघांना मंचावर सोडतात आणि व्हिडियो संपतो. हा व्हिडियो आपल्या टीमला तर खूप आवडला.
आपल्या वाचकांना ही या व्हिडियोविषयी वाचायला आवडेल असा विचार करून आपल्या टीमने हा लेख लिहिला आहे. याआधीही आपण लग्नाच्या वायरल व्हिडियो विषयी आपल्या वेबसाईटवर वाचलं असेलच. तेव्हा हा लेख ही आपल्याला कसा वाटला हे कमेंट्स मधून आम्हाला कळवायला विसरू नका. कारण आपण जे प्रोत्साहन आम्हाला कमेंट्स मधून देता, त्यामुळे नवनवीन विषयांवर लेखन करण्याचा आमचा उत्साह वाढीस लागतो. तसेच आपण मोठ्या प्रमाणावर आपले लेख सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याबद्दल ही धन्यवाद. येत्या काळातही आपला हा स्नेह आमच्या टीमप्रति कायम राहू द्या. लोभ असावा ही विनंती. धन्यवाद !!
बघा व्हिडीओ :