दिवाळी म्हटलं की, सर्वत्र धामधूम असते. या सणाच्या पूर्व तयारीसाठी आपण नवीन वस्तूंची खरेदी, फराळ व साफसफाई करत असतो. दिवाळीच्या काळाच सोशल मिडीयावर साफसफाईवरुन अनेकदा मिम्स आपल्याला पाहायला मिळतात. काही वेळेस ते इतके ट्रोल होतात की, आपल्या घरातील लोकही त्याप्रमाणेच वागू लागतात. काही नोकरी करणाऱ्या लोकांना सुट्टी मिळते. मात्र घरी आई किंवा बायको आपल्याला कामाला लावतात तेही साफसफाईच्या… एकूणच काय तर सुट्टीची मजाच घेता येत नाही. पण कधी कधी साफसफाई करण्याच्या नादात वेगळाच काहीतरी कुटाणा होतो, हाही अनुभव अनेकांना आला असेल. सध्या एका अतरंगी काकूंचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात साफसफाईच्या नादात काकूंनी थेट स्वतःचा जीव धोक्यात टाकला. व्हिडीओ पाहतानाच आपल्या काळजात धस्स होते.
दिवाळीच्या सफासफाईचा हा एक जबरदस्त आणि डोकं बंद पाडणारा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसत आहे. त्यात एक महिला तिच्या घराच्या खिडक्या साफ करताना दिसत आहे. बरं, हे सामान्य वाटेल पण तो सामान्य साफसफाईचा फोटो नाही, ती महिला खिडकीच्या बाहेर चढली आणि साफसफाई करु लागली. त्यातच तिने चौथ्या मजल्यावर असल्याचे दिसून आले. आणि ती खिडकीच्या बाहेर जाऊन साफ करत होती. विशेष बाब म्हणजे ही साफसफाई करताना ती अजिबात घाबरत नव्हती. जर चुकून हुकून तिचा हात सटकला असता तर थेट मृ त्युला आमंत्रण होते.
दिवाळीत घरे स्वच्छ करण्याची प्रथा आहे. प्रत्येकजण साफसफाई करताना खिडक्या आणि दरवाजे देखील स्वच्छ करतात. घर स्वच्छ असेल तरच लक्ष्मी येते असे मानले जाते. दरम्यान, दिवाळीपूर्वी स्वच्छतेचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक महिला आपल्या बहुमजली फ्लॅटची खिडकी साफ करताना दिसत आहे.
या व्हायरल व्हिडिओवर लोकांकडून वेगवेगळ्या कमेंट्स केल्या जात आहेत. काही लोक असेही म्हणतात की, जर लक्ष्मीजी त्यांच्या घरी आली नाही तर ती कुठेच येणार नाही. ज्या ठिकाणी महिला उभी राहून साफसफाई करत आहे, तिथून तिचा पाय थोडा घसरला तर ती अनेक मजले खाली पडण्याची शक्यता आहे. यानंतरही ती पूर्ण तल्लीन होऊन आणि आरामात खिडक्या साफ करत आहे.
सगळा व्हिडीओ पाहताना एक गोष्ट लक्षात येते की, या काकू अशा पद्धतीने खिडक्या कायमच साफ करत असाव्यात. नाहीतर अशी हिम्मत कोण आणि कशाला करेल. ज्या आत्मविश्वासाने या काकू स्वच्छता करत आहेत, ते पाहता त्यांच्यासाठी हे नित्यनियमाचे काम आहे, असेच वाटते.
बघा व्हिडीओ :