Breaking News
Home / मनोरंजन / दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं, हा व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील हेच म्हणाल

दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं, हा व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील हेच म्हणाल

दिसतं तसं नसतं म्हणून जग फसत, असं आपण कायम म्हणत असतो. आपल्यापैकी अनेकांना हे शहाणपण अनुभवातून आलेलं असेल. फेसबुकवर, इन्स्टाग्रामवर एकदम चिकण्या- चोपड्या पोरी समोर बघितल्यावर कळतं की, कॅमेऱ्याचे फिल्टर आणि मेकपच्या जीवावर म्हातारी बाई पण पोरगी बनू शकते. माझ्या लग्नाला आलेला एक मित्र मला महिनाभराने भेटला. आम्ही चहा आग्रह केल्यावर तो घरीही आला. चहापाणी, पोहे झाल्यावर शेवटी जाताना त्याने मला विचारलं. का रे, वहिनी दिसल्या नाहीत? मी म्हटलं, जिने तुला चहा दिला ती वहिनीच होती की… तो म्हणाला 2 आठवड्यात एवढा बदल… लग्नात तर वेगळ्याच दिसत होत्या. मग मी त्याला म्हणलं… ये सब मेकप का कमाल है. दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसत. आणि नेमकं ते बोलणं बायकोने ऐकलं. मग मी 2 दिवस त्याच्या घरी जेवायला होतो. तर दिसतं तसं नसतं ची अशी अनेक गमतीदार उदाहरण तुम्ही बघितली असतील. पण काही गंभीर उदाहरणे सुद्धा आहेत.

काळा, किरकोळ तब्येत असणारा, साधी इंग्रजी पण नीट न बोलणारा आणि इंडस्ट्रीत ओळख नसणारा एखादा माणूस बॉलिवूडमध्ये टिकू शकतो का? असा प्रश्न विचारला तर तुमचे उत्तम नकारात्मक असेल. कारण बॉलिवूड किंवा हिंदी फिल्म्सचा सगळ्यात बेसिक क्रायटेरीया म्हणजे गोरे आणि बॉडिबिल्डर असणे. भलेही अभिनय नसला तरी चालेल पण बॉडीबिल्डर असायला हवं. पण या सगळ्या क्रायटेरीयाला कोलत एक माणूस पुढे गेला आहे आणि आज सुपरस्टार झाला आहे. तो म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी.

दिसतं तसं नसतं, या म्हणीला कोलून नवाजुद्दीन पुढे आला. त्याच्यासारखे अनेक लोक असेच पुढे येतात. के.के. मेनन, अनुराग कश्यप, मनोज वाजपेयी, दीपक डोब्रियाल, पंकज त्रिपाठी… अशा अनेक लोकांकडे बघून असं वाटत नाही की, हे कधी अभिनय किंवा दिग्दर्शन करू शकतील. मात्र त्यांनी ते करून दाखवल. आमच्या टीमकडे नुकताच एक व्हिडिओ आला. आणि उत्सुकता म्हणून आम्ही हा व्हिडीओ बघायला घेतला कारण हा खूप व्हायरल झालेला व्हिडीओ होता.

या व्हिडीओत 3 मुले आहेत. तिघेही संगीत शिकलेले किंवा चांगली जाण असलेले आहेत, हे त्यांच्या गाण्यावरून कळतं. पण त्यांच्यातील एक व्यक्ती असा आहे की, त्याला बघून वाटतं… हा खरोखर गाऊ शकेल. हा गाऊ शकतो का? हा प्रश्न सगळ्यांना पडला असेल आणि नक्कीच पडला असेल पण कबूल कुणी करणार नाही. असो… आम्हालाही हीच शंका आली होती की, सोबत असलेल्या गायकाला हा तोड देऊ शकेल… मात्र त्यानंतर जे घडलं ते पाहून तुम्ही या मुलासाठी टाळ्या वाजवाल. आणि या मुलाचं मनसोक्तपणे कौतुकही कराल.

आता या मुलात नेमकं काय वेगळं आहे, त्याला बघून सगळ्यांना त्याच्या गाण्यावर शंका का उपस्थित झाल्या? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला व्हिडीओ पाहिल्यावर मिळतीलच. आणि हो… दिसतं तसं नसतं या म्हणीवर विश्वास बसवायला हा व्हिडीओ पुरेसा आहे. हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.