गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून आपल्या सगळ्यांचे ग्रह जणू वक्री होऊन बसलेत की काय असं वाटावं अशी परिस्थिती आपण बघितली आहे. अर्थात यास असलेलं कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहेच. क’रोना (को’विड १९) चा विषाणू हे त्यामागचं कारण. संक्रमणातून पसरणाऱ्या या विषाणू पासून कसं वाचायचं, यासाठी काय करायचं हे सगळं एव्हाना आपल्याला माहिती झालं आहे. किंबहुना हे सगळे नवीन नियम आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग झालेले आहेत. असं असलं तरी हा विषाणू आला कुठून आणि कसा प्रसारित झाला याविषयी अनेकांची अनेक वेगवेगळी मतं आहेत. अजूनही जगात तरी यावर एकमत झालेलं दिसून येत नाही. पण सगळ्यांचा होरा हा आहे की हा चीन मधून प्रसारित झालेला विषाणू आहे. खरं खोटं तर देवच जाणे. पण यावर आधारेलला एक व्हिडियो नुकताच सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळाला. यात क’रोनावर बोलणारी कोणी तज्ञ व्यक्ती नव्हती, तर ती होती एक छोटी मुलगी. तिचा व्हिडियो अल्पवधीतच वायरल झाल्याचं दिसून आलं.
व्हिडियो सुरू होतो तेव्हा ही चिमुरडी आपल्या समोर बसलेली असते. कॅमेऱ्यामागून एक स्त्री या मुलीला बोलणं सुरू करण्याविषयी सांगतात. सोबतच क’रोना चा प्रसार कसा झाला या आशयाचा प्रश्न विचारतात. यातून या छोटीला विषयाची सुरुवात करून मिळते. मग काय एकदम राग आल्याच्या आवेशात या चिमुरडीचं बोलणं सुरू होतं. तिच्या समजुतीनुसार ती बोलण्यास सुरवात करते. त्यात तिच्या चेहऱ्यावर असलेले भाव एखाद्या मोठ्या व्यक्तीसारखे भासतात. तसेच तिच्या हातांच्या हालचालींनी या तिच्या बोलण्याला जिवंतपणा येतो. कारण त्यातून चीड आल्याचं दाखवण्यात ती यशस्वी ठरते. तसेच करोना विषयक माहिती जर आधीच कळली असती तर आपण अधिक सजग असतो, हे ही ती नमूद करते. तसेच करोनाच्या सद्य परिस्थितीचं वर्णन ही तिच्याकडून केलं जातं. या बोलण्या बोलण्यात आधी मराठी बोलत असलेली ही मुलगी मग हिंदी भाषा बोलायला लागते. त्यात बोलताना ती एखादं वाक्य चुकली असं वाटून जवळ असलेली अजून एक स्त्री हसते. पण त्या मुलीने बरोबर वाक्य बोलल्याचा निर्वाळा कॅमेऱ्यामागील ताईंकडून दिला जातो आणि थोड्या वेळाने हा व्हिडियो संपतो.
या संपूर्ण काळात कॅमेऱ्यामागून या चिमुरडीशी संवाद साधणाऱ्या या ताई या व्हिडियोत विशेष भूमिका बजावतात असं जाणवतं. या व्हिडियोतील संवाद सुरू करण्याची जबाबदारी तर त्या पार पाडतातच, तसेच या मुलीच्या बोलण्यावर तिला प्रतिक्रिया देण्याचं कामही त्या करतात. यामुळे या मुलीचं बोलणं हे एकसंध स्वरूपात ऐकायला मिळतं आणि ती थांबत नाही. बोलण्यात फारसे अडथळे येत नाहीत. याबद्दल त्यांचं कौतुक करायला हवं. कारण कोणीही एकसंधपणे बोलत असेल तर ऐकणाऱ्याला ही त्या विषयावरचे विचार ऐकवेसे वाटतात. या व्हिडियोत व्यक्त केलेल्या विचारांशी आपण सहमत असालच असं नाही. पण ते विचार मांडताना या मुलीने दाखवलेली तडफ आपल्या मनावर तिची एक छाप सोडून जाते. तिचं एवढ्या लहान वयातही एवढ्या आत्मविश्वासाने बोलणं आपल्याला चकीतही करून जातं. या वयात असताना आपण एवढ्या आत्मविश्वासाने कॅमेऱ्यासमोर बोलू शकलो असतो असं ठामपणे म्हणता येणार नाही. त्यामुळे तिच्या आत्मविश्वासाची खरंच दाद द्यायला हवी.तिचा हा गुण कॅमेऱ्यामागील ताईंनी ओळखला असणार असं वाटतं आणि यातूनच हा व्हिडियो समोर आला असावा.
व्हिडियो मागील कारण काही असो, पण या मुलीच्या चुणचुणीत बोलण्याची झलक या व्हिडियोतुन आपल्याला बघायला मिळाली याचा आनंद आहे. तसेच एक नमूद करावीशी वाटणारी बाब म्हणजे या व्हिडियोत व्यक्त झालेल्या मतांशी आज किंवा यापुढे आपली टीम सहमत किंवा असहमत असेलच असं नाही. केवळ वाचकांचं मनोरंजन म्हणून या व्हिडियोविषयी आपली टीम लिहिते आहे. क’रोना विषयावर कोणत्याही प्रकारचं भाष्य करण्यासाठी हा लेख नाही याची कृपया नोंद घ्यावी. बाकी आपण सुज्ञ आहातच.
आज या व्हिडियो वर आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला कसा वाटला हे आम्हाला तुम्ही कमेंट्स मधून सांगू शकता. तसेच आपण हा लेख मोठ्याप्रमाणावर शेअर कराल हे नक्की. आपण आपल्या टीमने लिहिलेले प्रत्येक लेख मोठ्या प्रमाणावर शेअर करत असता याचा उल्लेख व्हायला हवा. कारण आपल्या या पाठींब्यामुळे आपल्या टीमला प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे आपल्या या प्रेमासाठी आपले मनःपूर्वक धन्यवाद. येत्या काळातही आपला आमच्या टीमवरचा हा लोभ असाच कायम रहावा ही सदिच्छा. धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :