Breaking News
Home / मराठी तडका / दुनियादारीचा सॉरी एकेकाळी नाटकाचे सेट लावायचा, बायको आहे अभिनेत्री

दुनियादारीचा सॉरी एकेकाळी नाटकाचे सेट लावायचा, बायको आहे अभिनेत्री

दुनियादारी चित्रपटातील टायटल सॉंग मधील ‘सॉरी सॉरी म्हणत तो या जगी हो आला रे’ ह्या ओळी तर आठवत असतीलच. दुनियादारी चित्रपटातला सॉरीने आपल्या अतरंगी अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. हा सॉरी म्हणजेच आपला प्रणव रवींद्र रावराणे. नुकताच प्रणवचा ‘आटपाडी नाईट्स’ हा चित्रपट रिलीज झाला. प्रणवचा जन्म २७ जुलैला झाला. त्याने राजे शिवाजी विद्यालयातून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याने ऑटोमोबाइलमध्ये डिप्लोमा केला. डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर त्याने रिलायन्समध्ये एक ते दीड वर्ष नरिमन पॉईंट येथे काम केले. परंतु प्रणवचे कामात मन लागत नसे. त्याला अभिनयाची आवड असल्यामुळे त्याने मग अभिनयक्षेत्र निवडले. परंतु त्याला चित्रपट आणि नाटकात काम करायला मिळाले नाही. त्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला. सुरुवातीच्या काळात त्याने अगदी सेट लावण्याचे काम केले. परंतु त्या कामातून पुढे कसे त्याला नाटकात काम मिळाले ते पाहूया.

जेव्हा प्रणवने सुरुवातीच्या काळात कलाक्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी घरचे खर्चाला पैसे देत नव्हते. घरच्यांचे म्हणणे होते कि, तू ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग केले आहे, तर आता नोकरीला लाग. परंतु प्रणवला अभिनयात रस असल्यामुळे नोकरी करायची नव्हती. घरचे पैसे देत नव्हते म्हणून खिशात पैसे नसायचे, चित्रपटाच्या शूटिंगला सेट लावण्यासाठी त्यावेळी तो काळाचौकीहुन माहीम, दादरला चालत प्रवास करायचा. ट्रेन वैगेरेने विनातिकीट जाणे त्याला मान्य नव्हते. तिथे गेल्यावर सर्वांसाठी चहा सांगण्याचे, स्क्रिप्टच्या झेरॉक्स आणून देण्याचे काम करायचा. जर एखादवेळी एखादा अभिनेता आला नाही, तर प्रणव त्याच्या स्क्रिप्टचे वाचन करत असे. तिथूनच प्रणवला नाटकांत वैगेरे काम करण्याची इच्छा निर्माण झाली. जेव्हा ‘सोहळा गोष्ट प्रेमाची’ ह्या पहिल्या नाटकावेळी प्रणवने सेट डिजाईन केला, त्याचा कमर्शिअल विभागासाठी प्रणवला ‘महाराष्ट्र टाइम्स सन्मान’ पुरस्कार मिळाला. त्याचसोबत झी गौरवसाठी नामांकन सुद्धा मिळाले.

जेव्हा पण प्रणवला वाटायचे कि आता आपलं चित्रपटात करिअर चांगलं चालू नाही आहे, तेव्हा आपण नाटक करूया किंवा इतकं चांगलं ऑटोमोबाइलचं शिक्षण घेतलं आहे तर चांगली नोकरी करूया. असे विचार सतत येत असत. तेव्हा एके दिवशी प्रणवने ठरवले, कि काय करायला पाहिजे नक्की. नुसतं काहीतरी शिकतोय किंवा काहीतरी करतोय असं नाही. कारण करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून काहीच योग्य क्रम नव्हता असे त्याला वाटत होते. कारण त्याने दहावी नंतर डिप्लोमा केला होता, त्यानंतर बारावी. बारावी पूर्ण केले. त्यानंतर थ्रीडी ऍनिमेशन. त्याला सतत वाटत होते कि काहीतरी चुकते आहे. आपण नेमकं काय करायचं आहे, हे आपल्याला कळत नाही आहे. त्यामुळे एक दिवस निर्णय घेतला एकतर ऑटोमोबाईल फिल्ड किंवा मग अभिनयक्षेत्र. मग अभिनयक्षेत्र पक्के केले. आणि त्यावेळेला त्याने ऑटोमोबाईलचे जितके नोट्स, पुस्तके, आणि जितकं काही त्यासंबंधित गोष्टी होत्या फक्त सर्टिफिकेट व्यतिरिक्त ते सर्वच्या सर्व रद्दीत विकले. आणि त्या रद्दीतून मिळालेल्या पैस्यातुन नाटकासंबंधित लोकांना फोन करणे, रिहर्सलला जाणे ह्या गोष्टी केल्या.

हळहळू प्रणवला नाटकात काम मिळू लागले. उत्तम अभिनयामुळे पुढे त्याला नाटकांत कामे येऊ लागली. प्रणवने लगे रहो राजाभाई, वाऱ्यावरची वरात, सेलिब्रेटी वस्त्रहरण, वासूची सासू ह्यासारखी लोकप्रिय नाटके केली. वार्यावरची वरात आणि सेलेब्रेटी वस्त्रहरण हे नाटक करतेवेळी लोकप्रिय दिग्दर्शक संजय जाधव ह्यांनी प्रणवला ‘दुनियादारी’ चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली. आणि तिथूनच मग संजयचे मराठी चित्रपट सृष्टीत पर्दापण झाले. प्रणवने ‘दुनियादारी’, ‘मस्का’, ‘सहासष्ट सदाशिव’, ‘भागमभाग’, ‘हृदयनाथ’, ‘पोलिसलाईन’ ह्यासारखे चित्रपट केले. प्रणव जेव्हा झी मराठीवर ‘हास्य सम्राट’ सिरीयलमध्ये काम करत होता, तेव्हा तो स्वतःच लिहायचा. प्रणवने त्यावेळी असे ठरवले होते कि जोपर्यंत मी हास्यसम्राट मधून बाहेर निघत नाही तोपर्यंत रोज रात्री कमीत कमी एक पान लिहिल्याशिवाय झोपणार नाही. आणि तो रोज कमीतकमी एक पान लिहीत असे. तो ज्यावेळी फायनल जिंकला त्यावेळी तो रात्रभर झोपला नाही.

प्रणवची पत्नी अमृता सकपाळ सुद्धा एक अभिनेत्री आहे. दोघांची ओळख एका नाटकादरम्यान झाली. दोघेही एक कमर्शिअल नाटक करत होते. नाटकादरम्यानच दोघांमध्ये प्रेम झाले आणि त्यांनतर डिसेंबर २०१६ मध्ये दोघांनी लग्न केले. दोघांच्या लग्नाला आता तीन वर्षे झालेली आहे. अमृताने ‘अवघाची संसार’, ‘लज्जा’, ‘लक्ष्मणरेषा’ ह्यासारख्या मालिकेत काम केलेले आहे. अमृताने ठाणे येथील ज्ञानसाधना महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केले. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच तिने अनेक एकांकिकेमध्ये मध्ये काम केले आहे. त्यानंतर ‘ऑल द बेस्ट’ ह्या नाटकात तिने मुख्य भूमिका केली. तिला ‘हरी माझ्या घरी’ ह्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. प्रणव आणि अमृता दोघांनाही २५ जून २०१८ ला कन्यारत्न प्राप्त झाले. मुलीचे नाव शाम्भवी असून ती दीड वर्षाची आहे. प्रणव सध्या चित्रपटांत व्यस्त असून ‘आटपाडी नाईट्स’ नंतर तो ‘प्रीतम’, ‘वन मिसकॉल’ ह्यासारख्या चित्रपटांत काम करत आहेत. हे चित्रपट येत्या नवीन वर्षात लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतील. आपल्या मराठी गप्पा कडून ‘सॉरी’ला पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *