Breaking News
Home / मराठी तडका / देऊळ बंद चित्रपतील हा अभिनेता आहे ह्या लोकप्रिय मराठी अभिनेत्याचा मुलगा, हिंदी मालिकेत करतोय काम

देऊळ बंद चित्रपतील हा अभिनेता आहे ह्या लोकप्रिय मराठी अभिनेत्याचा मुलगा, हिंदी मालिकेत करतोय काम

सध्या नवनवीन मालिका आपल्या भेटीस आल्या आहेत आणि अजूनही येऊ घातल्या आहेत. हा ट्रेंड मराठी सोबतच हिंदीतही दिसून येतो आहे. अशाच एका हिंदी मालिकेतून एक मराठमोळा चेहरा मुख्य कलाकाराच्या भूमिकेतून आपल्याला दिसणार आहे. या मालिके निमित्त या गुणी अभिनेत्याच्या अभिनय कारकिर्दीचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न. ही नवीन मालिका म्हणजे ‘इमली’ आणि त्यात काम करणारा मराठी चेहरा म्हणजे गश्मीर महाजनी. होय, आपल्या सगळ्यांचा आवडता अभिनेता गश्मीर महाजनी. आज पर्यंत गश्मीर याने मुख्यतः चित्रपटांतून अभिनय केला असला, तरीही नाटक, मालिका, वेब सिरीज ही माध्यमंही त्याने पादाक्रांत केली आहेत.

किंबहुना, नुकताच त्याने एका वेब सिरीज मध्ये अभिनय करून या नवं माध्यमातही मुशाफिरी सुरू केली आहे. या वेब सिरीजचं नाव श्रीकांत बशीर असं आहे. यात श्रीकांत म्हात्रे ही भूमिका साकारली आहे. हा थ्रिलर असल्याने यात गश्मीर आपल्याला ऍक्शन सीन्स मध्ये दिसून येतोय. आजवरच्या कारकीर्दीत वर उल्लेखल्या प्रमाणे त्याने विविध माध्यमांतून अभिनय केला आहे. त्याची सुरवात झाली ती नाटक आणि सिनेमांमधून. आपल्या पैकी अनेकांना, ‘दादाची गर्लफ्रेंड’ हे लोकप्रिय नाटक आठवत असेल. त्यात गश्मीर याने केतकी थत्ते हिच्या सोबत मुख्य भूमिका साकारली होती. हे त्याचं पहिलं व्यावसायिक नाटक. या नाटकाचे असंख्य प्रयोग झाले. पुढे त्याने अनेक मराठी हिंदी चित्रपटांतून अभिनय केला. देऊळ बंद, मला काहीच प्रॉब्लेम नाही, बोनस, कान्हा हे त्याचे मराठी चित्रपट. यातील देऊळ बंद हा त्याचा चित्रपट विशेष गाजला. आजही टीव्ही वर हा चित्रपट पुन्हा पुन्हा पाहता येतो, यावरून या चित्रपटाची लोकप्रियता लक्षात यावी. या चित्रपटात त्याने मोहन जोशी यांच्या सारख्या कसलेल्या अभिनेत्यासमोरही उत्तम अभिनय केला होता.

तसेच मराठी समवेत त्याने हिंदी चित्रपट ही केलेले आहेत. मुस्कुराके देख जरा, डोंगरी का राजा, पानिपत हे त्याचे गाजलेले हिंदी चित्रपट. पानिपत या चित्रपटात त्याने जनकोजी शिंदे ही ऐतिहासिक व्यक्तिरेखा उभी केली होती. अभिनयासोबत त्याला व्यायामाची आवड आहे हे आपण जाणतोच. त्याचसोबत तो एक उत्तम डान्सर ही आहे. आपण त्याला इव्हेंट्स मध्ये गाण्यांवर थिरकताना पाहिलं आहेच. सोबत तो स्वतःची एक डान्स अकादमीही चालवतो. ही डान्स अकादमी पुण्यात आहे. त्याने स्वतःचं एक युट्युब चॅनेल तयार केलं आहे. त्या युट्युब चॅनेल च्या माध्यमांतून त्याचे नृत्याविष्कार आपण जरूर पाहू शकता. तसेच त्याच्या सोशल मीडिया अकाउंट वरून तो सातत्याने त्याच्या नृत्याचे आणि अकादमीतील मुलांचे व्हिडियोज पोस्ट करत असतो. त्याच्या एका इन्स्टाग्राम हायलाईट्स मध्ये त्याने काही परदेशी नागरिकांना सैराटच्या झिंगाट गाण्यावर नाचावलं होतं. रवींद्र महाजनी ह्याच्या पत्नीचे नाव गौरी असून दोघांनाही व्योम नावाचा गोंडस मुलगा आहे.

अभिनय आणि कलेचा वारसा हा गश्मीरला घरूनच मिळाला. त्याचे वडील, रवींद्र महाजनी हे उत्तम अभिनेते. त्यांनी एक उत्तम नायक म्हणून नाव कमावलं आहे. रवींद्र महाजनी हे सत्तर ते ऐशीच्या मध्यकाळात मराठी चित्रपटसृष्टीचे लोकप्रिय अभिनेते होते. त्यांना मराठी चित्रपटसृष्टीचे विनोद खन्ना म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या पर्सनॅलिटी आणि लूक मुळे बॉलिवूड दिग्दर्शक एन चंद्रा ह्यांना ‘अंकुश’ चित्रपटासाठी रवींद्र महाजनी अभिनेते म्हणून हवे होते. परंतु त्यांनी हि भूमिका नाकारली. त्यानंतर हि भूमिका नाना पाटेकर ह्यांना मिळाली. वडील रवींद्र महाजनी ह्यांच्या पावलावर पाऊल ठेवत मुलगा गश्मीरही त्याच्या विविध कलाकृतींतुन सातत्याने एक उत्तम नायक म्हणून समोर आला आहे. वर उल्लेख केला प्रमाणे नुकतेच त्याचे नवीन प्रोजेक्ट्स आपल्या समोर येत आहेत. येत्या काळातही ‘सरसेनापती हंबीरराव’ हा प्रवीण तरडे यांचा महत्वाकांक्षी चित्रपट येतो आहे. एकूणच त्याचे व्यायाम, नृत्य यांतील सातत्य त्याच्या अभिनय कारकिर्दीत ठळकपणे दिसून येते. अशा या सातत्यपूर्ण आणि प्रयोगशील अभिनेत्यास मराठी गप्पाच्या टीमकडून त्याला पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.