Breaking News
Home / मराठी तडका / देवकीचा हा अजब लुंगी डान्स पाहून शालिनी म्हणाली ‘म्हणून हिला कुठे नेत नाय मी’, बघा पडद्यामागची धम्माल

देवकीचा हा अजब लुंगी डान्स पाहून शालिनी म्हणाली ‘म्हणून हिला कुठे नेत नाय मी’, बघा पडद्यामागची धम्माल

मनोरंजन क्षेत्र हे तसं नेहमीच चर्चिलं जाणारं क्षेत्र आहे. त्यात होणाऱ्या अगदी बारीक बारीक घटनांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न काही वेळेस केला जातो. गेल्या काही काळात तर सोशल मीडिया मुळे यात भरच पडली आहे. यातीलच एक प्रसिद्ध भाग म्हणजे बिहाइंड द सीन्सचे व्हिडियोज. म्हणजे एखादी कलाकृती घडत असताना मधल्या काळात काय काय घडतं हे दाखवणारे व्हिडियोज. मग कलाकार कसे वागतात, अभिनयाची तालीम कशी होते, इथपासून ती सगळी धमाल मस्ती यात येते. पण हे व्हिडियोज एखाद्या अधिकृत व्यक्तीकडून येत असतील तर त्यांची विश्वासार्हता वाढते. मोहित जाधव हे मनोरंजन क्षेत्रातील जानंमानं नाव. त्यांनी अनेक कलाकृतींमध्ये सिनेमॅटोग्राफीची धुरा सांभाळली आहे. त्यातलीच एक कलाकृती म्हणजे ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’. या मालिकेचे सिनेमॅटोग्राफर म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. या दरम्यान त्यांच्या कॅमेऱ्यातून बिहाइंड द सीन्स ही टिपले जातात. हे त्यांच्या युट्युब चॅनेल वरून दिसतात. त्यातलाच एक व्हिडियो आपल्या टीमच्या नजरेस पडला. आवडला सुद्धा. म्हणून मग त्यावर लेख लिहायचं ठरलं.

हा व्हिडियो आहे धमाल मजा मस्तीचा. यात आपल्याला मालिकेतील कलाकार एकत्र उभे असलेले दिसतात. मग त्यात देवकी साकार करणारी मीनाक्षी राठोड, शालिनी साकार करणाऱ्या माधवी निमकर आणि उदय ही व्यक्तिरेखा साकार करणारे संजय पाटील दिसतात. व्हिडियोची सुरुवात होते तेव्हा एका सिन साठी ही सगळी मंडळी अर्धवर्तुळाकार आकारात एकत्र उभी असतात. सिन शूट होण्यापूर्वी संजय पाटील गाणं गुणगुणायला लागतात – पिया बोले, पिहू बोले. सोबत हलकासा डान्स पण असतो. पण बाजूला उभी असलेल्या मीनाक्षी राठोड मात्र अगदी मजा मस्तीच्या मूड मध्ये असतात. त्यामुळे या काहीशा शांत गाण्यावर त्या लुंगी डान्स करणं सुरू करतात. सगळ्यांनाच मजा वाटते. दुरून पण कोणी एक सहकारी जोरात लुंगी डान्स ओरडतात. त्यावर उत्तर म्हणून मीनाक्षी, ‘वही कर रही हुं’ म्हणत हसतात. एव्हाना शालिनी ची भूमिका दमदार पणे वठवणाऱ्या माधवी निमकर ही तिथे आलेल्या असतात. मिनाक्षी यांची चाललेली मस्ती बघून खट्याळ भाव चेहऱ्यावर आणत त्या म्हणतात , ‘म्हणून हिला कुठे घेऊन जात नाही.’

त्यांच्या या वाक्यावर आपणही हसतो. पण मीनाक्षी मात्र फुल ऑन मजा मस्तीच्या मूड मध्ये असतात. अजूनही लुंगी डान्स चालू असतो. त्यांच्या खट्याळपणाला हसत हसत माधवी पूढे होतात आणि त्यांची मस्करी करतात. आपणही हसतो आणि काही क्षणात व्हिडियो संपतो. अवघ्या अर्धा मिनिटाचा हा व्हिडियो असावा. पण मीनाक्षी यांच्या खट्याळपणामुळे मात्र अगदी मनोरंजक होतो. खरं तर मालिकांचं शूटिंग म्हणजे प्रचंड वेळखाऊ प्रकार असतो. त्यात कलाकार, तंत्रज्ञ आणि इतर अनेक हात सतत कार्यरत असतात. जराशीही विश्रांती नसते. अशा वेळी सगळ्यांवरच किती ताण येत असेल याची कल्पना केलेली बरी. पण त्यातून अशा काही क्षणांमुळे हलके फुलकेपणा येतो हे ही खरं. या व्हिडियोत तो मीनाक्षी यांच्या डान्स आणि माधवी यांच्या डायलॉग्ज मुळे येतो हे नक्की. एरवी अभिनयाने आपल्याला आनंद देणाऱ्या या अभिनेत्री या व्हिडियोतुनही आपलं मनोरंजन करतात. मोहित जाधव यांच्या कॅमेऱ्यातून हे क्षण टिपले जातात म्हणून त्यांचे धन्यवाद. कारण आपल्या लाडक्या कलाकारांची ही गंमतीदार बाजू त्यांच्यामुळे आपल्या बघायला मिळाली.

आपल्या पैकी अनेकांनी हा व्हिडियो पाहिला असेल आणि आपल्याला तो आवडला ही असेल. त्याचप्रमाणे आपल्या टीमने लिहिलेला लेखही आपल्या पसंतीस उतरला असेल हे नक्की. आपली टीम अगदी सातत्याने विविध विषयांवर लेखन करत असते. आपणही हे लेख मोठ्या प्रमाणावर शेअर करत आपली पसंती दर्शवत असता त्याबद्दल धन्यवाद. आपला हा पाठींबा आम्हाला प्रोत्साहन देतो. तेव्हा आपला लोभ कायम असावा. लेख वाचत राहा, शेअर करत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *