रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या दुसऱ्या पर्वाने आपला काही दिवसांअगोदरच निरोप घेतलाय. त्या जागी एक नवीन मालिका आली आहे जिने प्रेक्षकांमध्ये उस्तुकता, भीती अशा संमिश्र प्रतिक्रिया निर्माण केल्या आहेत. बरोबर ओळखलंत. ‘देवमाणूस’ हे त्या मालिकेचे नाव. यातील प्रमुख भूमिकेत किरण गायकवाड आहेत. आपण त्यांना त्यांच्या उत्तम कामांसाठी ओळखतोच. पण त्यांच्या डॉक्टरच्या मुख्य भूमिकेबरोबरच एक नवीन अभिनेत्रीसुद्धा तिच्या चुलबुल्या अभिनयामुळे चर्चेचा विषय बनली आहे. तिच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे ‘डिंम्पी’. आज थोडं तिच्याचविषयी.
तर अशा या डिंम्पीचं म्हणजे डिंपलचं खऱ्या आयुष्यातलं नाव आहे, अस्मिता देशमुख. अस्मिता मुळची पुणेकर. तिने आपलं कॉलेज शिक्षण पूर्ण केलंय, ते सायकॉलॉजीस्ट म्हणून. अभ्यासाबरोबरच अभिनयाची आवड तिने आधीपासून जोपासली आहे. तिच्या ‘मले पिरतीचं गोखरू रुतलं गं’ या म्युजिक विडीयोचं खूप कौतुक झालं होतं. मग तिने काम केलं ते ‘चाणक्य’ या कलाकृतीत. तसचं तिने अभिनय केलेलं टिकटॉक विडीयोज सुद्धा प्रसिद्ध झाले होतेच. या दोघांआधी तिने काम केलं होतं ते ‘अकार’ या शॉर्ट फिल्म मध्ये आणि अर्थातच आत्तापर्यंतचा मोठा ब्रेक तिला मिळालाय तो ‘देवमाणूस’ या नव्याकोऱ्या मालिकेत. यातही तिने स्वतःची छाप सोडली आहेच आणि जे कलाकार आपली छाप सोडतात त्यांच्याबद्दल तर सध्या एक ट्रेंडच आहे म्हणा, जे पात्र लोकांना आवडतं त्यावर मिम्स बनतात. तसेच मिम्स सध्या ‘डीम्पी’ च्या संवादांवर बनताना दिसतायत. खुद्द अस्मितानेच ते शेयर केले होते तिच्या इंस्टाग्रामच्या स्टोरीज मध्ये.
तर अशी हि चुलबुली अभिनेत्री खवय्यीसुद्धा आहे बरं का. तिला नवनवीन डिशेस ट्राय करायला खूप आवडतं. तसचं तिला फिरायला, फोटोज काढायला सुद्धा खूप आवडतं. फार कमी वेळात तिने बरीच कामं केली आहेत आणि आता तर एका महत्वाच्या सिरीयलचा ती हिस्सा आहे. त्याची तिला जाणीव नक्कीच असणार आणि तिच्या इतर भूमिकांप्रमानेच ती या भूमिकेलासुद्धा उत्तम न्याय देईल यात शंका नाही. तर अशा या हुशार आणि तरुण अभिनेत्रीला या नव्याकोऱ्या मालिकेसाठी आणि पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पा टीमतर्फे खूप खूप शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)