Breaking News
Home / मनोरंजन / देवमाणूस मालिका खरंच बंद होणार आहे का, बघा डिम्पल आणि डॉक्टरने फेसबुक लाईव्हमध्ये काय सांगितले

देवमाणूस मालिका खरंच बंद होणार आहे का, बघा डिम्पल आणि डॉक्टरने फेसबुक लाईव्हमध्ये काय सांगितले

आपल्याकडे मालिकांचा म्हणून एक अतिशय निष्ठावान प्रेक्षक वर्ग असतो. मालिका अतिशय लक्षपूर्वक बघण्याकडे त्यांचा कल असतो. त्यामुळे मालिकेत होणारे छोटेसे बदल देखील मालिकेतील कथानकात काय बदल घडवू शकतील याची समीकरणं त्यांच्या डोक्यात सुरू होतात. बरं हे तसं प्रत्येक मालिकेच्या बाबतीत होतं. पण जेव्हा मालिकेतील एखादा प्रसंग मालिकेचा शेवट होतो की काय असं दर्शवणारा असतो तेव्हा तर अशा समिकरणांना आणि चर्चांना उधाण येतं. त्यात सोशल मीडिया उपलब्ध असल्याने अजून भर पडते. पण अशावेळी या मालिकांतील कलाकार आणि त्यांच्या काही मुलाखती किंवा त्यांचे सोशल मीडिया लाईव्ह व्हिडियो आपल्याला काहीशी माहिती देऊन जातात.

असंच काहीसं घडलं एका प्रसिद्ध मालिकेबाबत. ही मालिका म्हणजे देवमाणूस. ही मालिका तशी थरारक कथानकावर आधारित आहे. त्यामुळे कथानकात नेहमीच काही ना काही बदल घडत असतात. जुनी पात्र जात असतात तर कधी नवीन पात्र येत असतात. पण जेव्हा या मालिकेतील प्रमुख व्यक्तिरेखा आणि खलनायक असणारा डॉक्टर गजाआड जातो तेव्हा आता मालिका संपते की काय असा प्रश्न अनेकांना पडला होता.

या मालिकेने गेल्या काही काळात जो मोठा प्रेक्षकवर्ग कमावला आहे. त्यांच्यात ही चर्चा बरीच रंगली. याच काळात या मालिकेतील दोन प्रमुख कलाकार एका सोशल मीडिया लाईव्हच्या माध्यमातून चाहत्यांशी गप्पा मारते झाले. तेव्हा त्यांना याविषयी विचारणा झाली नसती तरच नवल. हे दोन कलाकार म्हणजे किरण गायकवाड आणि अस्मिता देशमुख. हे दोघे अनुक्रमे डॉक्टर आणि डिंपल ह्या भूमिका साकारतात. जेव्हा पहिल्यांदा त्यांना मालिका बंद होण्याविषयी विचारलं तेव्हा ते म्हणाले , की प्रेक्षकांना मालिकेत काय काय घटना घडणार हे जाहिरातींतुन काही काळ आधी कळतं. तसंच कलाकारांना ही कथानक कसं वळण घेणार हे काही काळ आधी कळतं. यानंतरही त्यांचं सोशल मीडिया लाईव्ह सुरू राहिलं. तेव्हा किरण गायकवाड उत्तरले त्याचा सारांश असा की, सध्या मालिकेतील नवीन भागांचे ट्रेलर बघायला मिळताहेत. त्यात डॉक्टर सुटका होऊन पुन्हा परतला आहे असं दिसतंय. पण याच दरम्यान त्याला एक व्यक्ती त्याला दिसते आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात. त्यांच्या या उत्तरातून आणि या प्रसंगातून एक नवीन व्यक्तिरेखा भेटीस येणार असल्याचं कळतंय. जेव्हा नवीन व्यक्तिरेखा येते ती अर्थातच काही काळ तरी असतेच.

याचाच अर्थ असा की ही मालिका तूर्तास तरी बंद होण्याच्या वाटेवर नसावी. अजून काही काळ तरी ही मालिका ऑन एअर राहील असेच संकेत आहेत. किंबहुना मालिकेतील मुख्य खलनायकाला घाम फोडणारी ही व्यक्तिरेखा आहे तरी कशी आणि पुढे ती कशी उलगडत जाते याची उत्कंठा चाहत्यांना लागून राहिली असावी. आपली टीम वेळोवेळी मालिका आणि मनोरंजन क्षेत्रातील इतर माध्यमातील बातम्या आपल्या पर्यंत पोहोचवत असते. त्यामुळे येत्या काळात आपल्या टीमला या मालिकेविषयी अजून काही माहिती मिळाल्यास आपल्या वाचकांपर्यंत पोहोचवू हे नक्की.

आपल्याला हा लेख आवडला असेल अशी अपेक्षा आहे. यानिमित्ताने आपण सगळेच जण आपल्या टीमच्या लेखांना जो पाठिंबा देता त्याबद्दल धन्यवाद मानू इच्छितो. आपण कमेंट्स मधून आपल्या टीमला प्रोत्साहन देत असता, सकारात्मक बदल सुचवत असता. तसेच मोठ्या प्रमाणावर लेख शेअर करत असता. यामुळे आपल्या टीमला सतत प्रोत्साहन मिळत राहतं आणि नवनवीन विषयांवर लेखन करण्याची ऊर्जा मिळते. याबद्दल धन्यवाद. यापुढेही आपला लोभ आमच्या टीमवर कायम रहावा ही विनंती. धन्यवाद !!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *