Breaking News
Home / मराठी तडका / देवमाणूस मालिकेतील एसीपी दिव्याची भूमिका निभावणार हि अभिनेत्री नक्की आहे तरी को’ण, बघा दिव्याची जीवनकहाणी

देवमाणूस मालिकेतील एसीपी दिव्याची भूमिका निभावणार हि अभिनेत्री नक्की आहे तरी को’ण, बघा दिव्याची जीवनकहाणी

मराठी गप्पाच्या टीमने वायरल व्हिडियोज आणि मराठी कलाकार यांच्याविषयी अगदी सातत्याने लिहिलं आहे. यात कलाकारांच्या नवनवीन कलाकृती असतील वा कालाकृतींमधले नवनवीन कलाकार, या सगळ्यांच्याविषयी आमची टीम वेळोवेळी लिहीत असते. आजच्या या लेखातून आपण अशाच एका उदयोन्मुख अभिनेत्रीच्या मनोरंजन क्षेत्रातील प्रवासाबाबत जाणून घेणार आहोत. ती सध्या एका अतिशय चर्चेत असलेल्या मालिकेत नव्याने दाखल झाली आहे. आपल्या पैकी बहुतेकांनी बरोबर ओळखलंत. आज आपण ‘देवमाणूस’ मालिकेतील ‘ए.सी.पी. दिव्या’ यांच्या विषयी जाणून घेणार आहोत. या मालिकेतील ही चर्चेत असलेली भूमिका साकार केली आहे नेहा खान या उदयोन्मुख अभिनेत्रीने.

नेहाचं बालपण आणि शिक्षण अहमदनगर येथे झालं. लहानपणी असलेल्या आर्थिक हलाखीच्या परिस्थिमुळे आणि अस्थिर आयुष्यामुळे नेहा आणि तिच्या आईने अतिशय कष्टात दिवस काढले. वेळप्रसंगी छोटे मोठे व्यवसाय करत त्यांनी दिवस व्यतीत केले. त्यावेळी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारावी असं नेहा हिला मनापासून वाटे. घर संसाराचा गाडा अतिशय लहान वयात सांभाळत असताना मनोरंजन क्षेत्रात काम केलं असता आपल्याला जास्त अर्थार्जन करता येईल असं नेहाला वाटलं, हे तिच्या काही मुलाखतींतून कळतं. पण या क्षेत्रात कोणीही मार्गदर्शक नाही म्हणून नेहा हिने जिद्द सोडली नाही. मुंबई येथे काम मिळू शकेल, असं वाटून अनेकदा ती ऑडिशन्स साठी मुंबईला आली. काही काळाने एका प्रथितयश अभिनेत्यांच्या अकादमीत तिने अभिनय शिकण्यास प्रवेश घेतला. ओळख वाढवत वाढवत तिने काम करण्यास सुरुवात केली. ‘देवमाणूस’ ही नेहा हिची पहिली मराठी मालिका. पण याआधी तिने ‘युवा डान्सिंग क्वीन’ या स्पर्धेत आपलं नृत्य कौशल्य दाखवलं आहे.

तिने सादर केलेली नृत्ये परिक्षाकांना अगदी अवाक् करून गेलेली आहेत. त्यात जसं नृत्य होतं, तसाच बिनधास्तपणा ही होताच. नेहाचा हाच बिनधास्त आणि बो’ल्ड अंदाज तिच्या सिनेमांतूनही दिसून आलेला आहेच. ‘शिकारी’ हा तिचा मराठी व्यावसायिक सिनेमा. या सिनेमातील तिच्या अंदाजाची बरीच चर्चा झाली. तिने मराठी सोबतच ‘U वा’ या हिंदी चित्रपटातही अभिनय केलेला आहे. या चित्रपटात जिमी शेरगिल यांचीही भूमिका होती. तिने महेश भट यांच्या ‘द डार्क साईड ऑफ मुंबई सिटी’ मध्येही अभिनय केलेला आहे. तसेच १९७१ साली झालेल्या भारत पा’किस्तान यु’द्धावर आधारित एका दक्षिण भारतीय सिनेमात ती लोकप्रिय अभिनेते मोहनलाल यांच्यासोबत झळकली होती. मालिका आणि सिनेमांतून अभिनय करणारी नेहा ही वेब सिरीज चा ही भाग राहिली आहे. ‘काळे धंदे’ या वेबसिरीज चा ती एक भाग होती. अभिनयासोबतच मॉडेलिंग क्षेत्रातही कार्यरत होती. अभिनय आणि मॉडेलिंग यांच्या सोबतच नेहा ही व्यायाम आणि उत्तम आरोग्य यांना नेहमीच महत्व देत असते.

तिच्या सोशल मीडिया पोस्टसमधून हे दिसून येतंच. उत्तम अभिनेत्री आणि नृत्यांगना असणारी नेहा ही उत्तम चित्रही काढते. सध्या नेहा ही देवमाणूस या मालिकेच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. पण नजीकच्याच काळात तिच्यावर एक अतिशय दुः’ख्खद प्रसंग ओढवला. तिचे वडील या वर्षीच्या जानेवारी महिन्यात नि’वर्तले. हा तिच्यासाठी आणि कुटुंबासाठी मोठा ध’क्काच. पण आयुष्यभर अडीअडचणी यांचा सामना करून नेटाने वाटचाल केलेली नेहा या ध’क्क्यातूनही सावरेल हे नक्की. तिच्या दुः’ख्खात मराठी गप्पाची टीमही सामील आहे. तिच्या वडिलांच्या आ’त्म्यास शांती मिळो. अडीअडचणींचा सामना करत करत असतानाही जिद्दीने प्रवास करत राहणाऱ्या या उदयोन्मुख अभिनेत्रीला मराठी गप्पाच्या टीमचा सलाम आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *