Breaking News
Home / मराठी तडका / देवमाणूस सीरिअलच्या सत्यघटनेमधील हे आहेत खरे डॉक्टर आणि डिम्पल

देवमाणूस सीरिअलच्या सत्यघटनेमधील हे आहेत खरे डॉक्टर आणि डिम्पल

मराठी मालिका विश्वात गेल्या काही काळात एका थरारक मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर ताबा मिळवला आहे. ‘देवमाणूस’ ही ती मालिका. यातील जवळपास सगळ्याच व्यक्तिरेखा अतिशय लोकप्रिय ठरल्या आहेत, हे आपण जाणतोच. पण त्यातही सगळ्यांत जास्त चर्चा असते ती अर्थात डॉ. अजित आणि डिंपल यांची. मालिका ही काही वर्षांपूर्वी समाजासमोर आलेल्या घटनांवर आधारित आहे. त्यामुळे यातील व्यक्तिरेखा ही वास्तवातील व्यक्तिरेखांशी मेळ खाणाऱ्या आहेत. डॉ. अजित ही व्यक्तिरेखा आधारलेली आहे डॉ. संतोष पोळ याच्या व्यक्तिवर तर डिंपल ही व्यक्तिरेखा आधारलेली आहे ज्योती या व्यक्तिवर.

खऱ्या आयुष्यात डॉ. संतोष पोळ हा वाई, सातारा येथे वास्तव्यास होता. काही वृत्तवाहिन्यांच्या मते तो एक बोगस डॉक्टर होता. त्याने आपला एक दवाखाना थाटला होता. या दवाखान्यातून त्याची अनेकांशी ओळख होत असे. त्यातूनच मग कधी विवाहबाह्य संबंध, तर कधी मालमत्ता आणि पैसे यासाठी अनेकांशी जास्त ओळख वाढत असे असं कळतं.

या वृत्तवाहिन्यांच्या मते या सगळ्या ओळखीतूनच त्याच्या हातून पुढे खू’न घडले. तब्बल १३ वर्षात त्याने ६ खू’न केल्याचं कळतं. यातील काही मृ’तदेह त्याने स्वतःच्या मालकीच्या जमिनीवर पुरल्याचे नंतर पोलीस तपासा अंतर्गत लक्षात आलं होतं, असं वृत्तवाहिन्यांतून कळतं. एका अंगणवाडी सेविकेच्या खुनानंतर या सगळ्या गोष्टी सगळ्यांपुढे आल्याचं कळतं. यात पोलीस अधिकारी वेताळ साहेब यांनी प्रमुख भूमिका बजावल्याचं दिसतं. तसेच त्याची प्रेयसी असणाऱ्या ज्योती हिने दिलेली कबुली सुदधा महत्वपूर्ण मानली जाते. तिच्या व्यक्तिरेखे वर आधारित असं डिंपल हे पात्र आपल्याला मालिकेत पाहायला मिळतं.

मालिकेत डॉ. अजित ही भूमिका साकार केली आहे किरण गायकवाड यांनी, तर डिंपल ही भूमिका साकार केली आहे अस्मिता देशमुख यांनी. हे दोघेही उत्तम कलाकार आहेत हे त्यांनी साकार केलेल्या भूमिकांतून कळून येतंच. त्यातही किरण गायकवाड यांना अभिनयाचा प्रदीर्घ अनुभव आहे.

अगदी शाळा कॉलेजमध्येही त्यांनी विविध नाट्यकृतींतून अभिनय केला असल्याचं कळतं. तसेच देवमाणूस मालिकेआधी आलेल्या लागिरं झालं जी या मालिकेतील भैय्यासाहेब ही भूमिका गाजली होती. त्यामानाने नवोदित अभिनेत्री असून सुद्धा अस्मिताचा वावर ही अतिशय सहज वाटतो. तिने मालिकेव्यतिरिक्त अन्य कलाकृतींतुन अभिनय केलेला आहे. मले पिरतीचं गोखरू रुतलं गं आणि खूळ लागलं या म्युझिक व्हिडियोज मध्येही काम केलेलं आहे. या दोघांच्या अभिनयाने मालिकेतील गोष्टीची परिणामकारकता वाढवली आहे हे निश्चित.

या लेखातून मालिका आणि ती आधारित असलेली घटना यांवर थोडक्यात प्रकाश टाकण्याचा आमच्या टीमचा प्रयत्न होता. यातून न्यायालयाधीन असणाऱ्या कोणत्याही गोष्टीवर, घडलेल्या घटनांवर किंवा व्यक्तींवर भाष्य करण्याचा आमच्या टीमचा प्रयत्न नाही, हे कृपया लक्षात घ्यावे. आपले वाचक सुज्ञ आहेत, तेव्हा बहुत सांगणे न लगे. असो. आपल्याला हा लेख आवडला असेल तर काय करायचं आपल्याला माहिती आहे ना? होय, तेच. नेहमीप्रमाणे आपला हा लेख शेअर करायचा. कारण आपण जेव्हा जेव्हा लेख शेअर करता, तेव्हा तेव्हा आम्हाला प्रोत्साहन मिळत असतं. त्यातून आपल्यासाठी नवनवीन विषयांवर लेख लिहिण्याचा हुरूप येतो. तेव्हा आपला लोभ आमच्यावर कायम असू द्या ही विनंती. धन्यवाद !!

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.