तुम्हाला मकरंद अनासपुरेचा सिनेमा आठवतो का? ज्यात मकरंद अनासपुरे देवाला म्हणतो… मी जर जिंकलो तर तुला सोन्याची टोपी घालीन. प्रत्यक्षात मकरंद अनासपुरे जिंकतो तेव्हा मात्र तो देवाला टोपी घालतो पण ती सोन्या नावाच्या पोराची. एकूणच काय तर मकरंद सिनेमात जनतेसह देवाला पण टोपी टाकतो. गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा असं त्या सिनेमाचं नाव होतं. आताची परिस्थिती लक्षात घेता गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत सगळीकडे देवाच्या नावाच्या बाजार मांडलेला आहे. खरे श्रद्धाळू राहतात बाजूला, नको तेच लोक बाजार मांडून बसतात. हे सगळं बघून देवाला खूप चीड येत असेल. तोही आपल्या या ढोंगीपणाला वैतागला असेल. पण या सगळ्यातही देवाला आवडेल असा एकमेव प्रकार पृथ्वीवर आहे, ती म्हणजे कोवळ्या, निरागस मनाची प्रेमळ मुले. अये येड्यावाणी करू नको, नाहीतर देव कान कापतो हा… अशी भीती आपल्याला लहानपणी कायमच घातली जाते. गणपती बाप्पा तर आपला फेव्हरेट देव असतो, कारण तो प्रत्येक लहान मुलांचा दोस्त असतो.
लहानपणी देवाच्या आपण एकदमच प्रेमात असतो. देवासोबत खेळणे, देवाची पूजा करणे, देवासोबत गप्पा मारणे, असे प्रकार आपल्याला अनेक अतरंगी पोरं करताना दिसतात. आपल्या सभोवताली देवाचा लोकांनी बाजार मांडला असताना ही निरागस श्रद्धा आणि प्रेम हे देवाला फक्त लहान मुलांकडूनच मिळत असेल, यात काही शंकाच नाही. लहान मुले ही देवाघरची फुले असतात, पण काही काही लहान मुले ईतकी जबरदस्त असतात की, त्यांचे भयंकर चाळे बघून देव पण पृथ्वी तलावर येईल आणि त्यांची इच्छा पूर्ण करेल. आज असाच एक व्हायरल झालेला व्हिडीओ आमच्या टीमकडे आला. अतरंगी लोक आणि लहान मुलांचा व्हायरल व्हिडीओ आम्ही कायमच पूर्ण बघतो. हाही व्हिडीओ आम्ही पूर्ण बघितला आणि चाट पडलो.
एक लहान मूल किती निरागस असतं, हे पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो. आपण जेव्हा जेव्हा देवाकडे जातो, तेव्हा कायमच काहीतरी मागणी करतो. पण लहान मुले अगदी आपल्या स्वभावाच्या विरुद्ध असतात. आजचा हा व्हायरल झालेला व्हिडीओ लाखो लोकांनी बघितलेला आहे. या व्हिडीओत एक मुलगी देवाला जेवण भरवत आहे. विशेष बाब म्हणजे जेवण भरवण्याचं काम ती खूप सिरीयसली करत आहे.
तू जर जेवला नाहीस तर तु छोटा राहशील, तू छोटा राहिला तर मग तू कुणालाच हानू-मारू शकणार नाहीस आणि मग तू छोटाच राहशील, असा संवाद या व्हिडीओतील चिमुकली आपल्या देवाशी करत आहे. सतत ती हात पुढे करून देवाला जेवून घे, असं सांगत आहे. अजून एक भारी गोष्ट म्हणजे या मुलीच्या आईने हा व्हिडीओ रेकॉर्ड करत असताना मुलीला म्हटले की, देवाला दही आवडते, ते खाऊ घाल. पण ही छोटीशी पोरगी लै पुढची निघाली. ती म्हटली की, देवाने मला सांगितलं आहे, मला पुरी आवडते, मला पुरीच खाऊ घाल.
अशी असतात लहान मुले आणि त्यांची निरागसता. खरा देव तर आम्हाला या लहान मुलीत दिसला जी तिच्या देवाला अन्न भरवत आहे. सलाम या लहान मुलीला. तिची ही निरागसता आयुष्यभर अशीच राहो, हीच देवाकडे प्रार्थना. हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.
बघा व्हिडीओ :