Breaking News
Home / बॉलीवुड / दोन्ही चित्रपटात एकसारखे कपडे घातल्यामुळे युजर्सने केले अक्षयला ट्रॉल, म्हणाले ‘काय करणार एवढ्या

दोन्ही चित्रपटात एकसारखे कपडे घातल्यामुळे युजर्सने केले अक्षयला ट्रॉल, म्हणाले ‘काय करणार एवढ्या

अभिनेता अक्षय कुमार अशा कलाकारांपैकी आहे, जो वर्षभरात जास्तीत जास्त चित्रपट देण्याचा प्रयत्न करतो. मागील चित्रपट ‘हाऊसफुल 4’ च्या वेळी प्रेक्षकांची सारखीच प्रतिक्रिया बघायला मिळाली होती. ह्या महिन्यात २७ डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘गुड न्यूज’ चित्रपटामध्ये तो दिसेल. अशातच या दोन्ही चित्रपटात एकसारखा पेहराव केल्यामुळे सोशल मीडियावर त्याच्या वर निशाणा साधला आहे.खरंच, या दिवसात सोशल मीडियावर हाऊसफुल 4 आणि गुड न्यूज या दोन्ही चित्रपटातील एक फोटो समोर आला आहे. या फोटो मधे अक्षय कुमारने जो टीशर्ट हाऊसफुल 4 मधे घातलाय, तोच टीशर्ट गुड न्यूज मधे घातला आहे.अक्षयच्या या फोटोला एका चाहत्यांने ‘अक्षय दि शायनिंग स्टार’ असे इंस्टाग्राम वर पोस्ट केले तर काहींनी ह्या फोटोची मजा सुद्धा घेतली.

Vibhav mishra 045 नावाच्या युजरने कमेंट लिहिली, ‘काय करणार येवढ्या पैशाचे.’ Prince sk. एकाने कमेंट मधे लिहिले ‘एका दिवसात दोन शूटिंग .’ Shreevardhan 007 ने लिहिले ‘वेळेचा पुरेपूर वापर करणे कोणी अक्षय सर कडून शिका.’ त्याशिवाय आणखी काही युजर्सने अक्षय कुमारच्या या ड्रेस वर कमेंट केले आहेत. आपल्या माहितीसाठी सांगतो अक्षय कुमार त्याच्या चित्रपटात सतत व्यस्त आहे. हाऊसफुल 4 प्रदर्शित झाल्या नंतर तो आता त्याचा येणारा चित्रपट गुड न्यूज च्या प्रमोशन मधे व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्या बरोबर दिलजीत दोसांझ, करीना कपूर खान आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहेत. तसेच हाऊसफुल 4 मधे अक्षय बरोबर कलाकार रितेश देशमुख, बॉबी देओल, कृती सेनन, कृति खरबंदा आणि पूजा हेगडे ह्यासारखे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या व्यतिरिक्त अक्षय आपला ‘सूर्यवंशी’, ‘बेल बॉटम’, ‘लक्ष्मी बॉम्ब’ आणि ‘पृथ्वीराज’ या येणाऱ्या चित्रपटांसाठी चर्चेत आहे. त्यातच त्याचा ‘बेल बॉटम’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकलाय. खरंतर अक्षयच्या बेल बॉटम चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर येताच चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला. याचे खरे कारण आहे या वर्षी याच नावाचा कन्नड चित्रपट प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांना वाटत होते की अक्षयचा हा चित्रपट कन्नड चित्रपटाचा रीमेक आहे. अक्षयने या गोष्टीला नकार दिला, या चित्रपटाचे रीमेक राईट्स कन्नड दिग्दर्शक आणि स्टंट कोरिओग्राफर रवी वर्मा जवळ आहे. रवी वर्मा या राईट्स मुळे अक्षय कुमार वर चित्रपटाच्या अनाऊन्समेंट मुळे रागात आहेत. ते या गोष्टीची कायदेशीर रित्या ऍक्शन घेण्याचा विचार करत आहेत.

ईटाइम्स सोबत चर्चा करताना रवी वर्मा म्हणाले, ‘आम्ही अजून कोणालाही कायदेशीर नोटीस पाठवली नाही. परंतू कन्नड आणि हिंदी चित्रपट बेल बॉटम मधे कोणतीही समानता असू नये. बेल बॉटम चित्रपटाचे अधिकार प्राप्त झाल्यानंतर मी मुंबईतील बऱ्याच प्रोडक्शन हाऊसला हा चित्रपट दिला होता. बेल बॉटम चे राईट्स मिळाल्या नंतर मी मुंबईतील काही प्रोडक्शन हाऊसला या चित्रपटाचे रीमेक राईट्स दिले होते. निखिल अडवाणी यापैकी एक आहे. मला वाटतोय की त्याने कन्नड चित्रपट बेल बॉटम मधूनच स्टोरी आणि स्टाईल कॉपी केली आहे. ‘रवी म्हणाला, की चित्रपटाचे नाव आणि अक्षय कुमारची भूमिका हुबेहूब तशीच आहे. मी या विषयी हिंदी चित्रपटाच्या टीमला माहिती दिली आणि त्यांनी सांगितले अक्षय कुमार याविषयी माझ्या जवळ बोलतील. रवी म्हणाला नावा सोबतच चित्रपटाचा पोस्टर सुद्धा जवळ जवळ कन्नड चित्रपटासारखाच आहे. मी हिंदी टीमला या विषयी सांगितले आणि त्यांनी सांगितले की, अक्षय कुमार या विषयावर चर्चा करेल. त्यांनी सांगितले त्यांच्या टीम मधीलच कोणी तरी हे नाव बुक केले होते. म्हणूनच कंफ्युज आहेत अक्षयच्या फिल्म मेकर्सना हे नाव कुठून मिळाले. त्यावर टीमने सांगितले कि चित्रपट बेल बॉटम मधे अक्षय कुमार जासूस ची भूमिका करताना दिसतील. या चित्रपटाचे दिग्दर्शन रंजित एम तिवारी करतील. आता चित्रपटाची स्र्किप्टिंग चालू आहे. शूटिंग 2019 च्या शेवटी सुरु होईल. हा चित्रपट 2021 ला प्रदर्शित होईल.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.