Breaking News
Home / मनोरंजन / दोन तरुणींना बाईकवर बसवून सर्वांसमोर स्टंट करणं ह्या तरुणाला पडलं महागात, बघा व्हिडीओ

दोन तरुणींना बाईकवर बसवून सर्वांसमोर स्टंट करणं ह्या तरुणाला पडलं महागात, बघा व्हिडीओ

बाईकवर स्टंट करणे हे काही खायचे काम नसते भाऊ… हात सोडून 10 सेकंद गाडी चालवत शायनिंग मारणे, म्हणजे स्टंट करणे नाही. व्यवस्थित प्रशिक्षण घेऊन, स्टंटसाठी अपेक्षित असणारी महागडी स्पोर्ट बाईक, सोबत हेल्मेट आणि इतर सुरक्षेसाठीचे साहित्य घेऊन स्टंट केला जातो. मात्र भारतात सगळं याच्याविरुद्ध असतं. सेफ्टी नाही, काळजी नाही, प्रशिक्षण नाही आणि तरीही स्टंट केले जातात. मग याचा परिणाम कधी कधी इतका वाईट असतो की, एखाद्याला जीवही गमवावा लागतो. हे सगळं कशामुळे होतं तर शायनिंग मारायच्या नादात… शायनिंग मारायच्या नादात अनेकांनी स्वतःला कायमचं अधू करून घेतलेलं आहे. तर असाच एक स्टंट आणि शायनिंग मारायच्या नादात तोंडावर पडलेल्या एका पोराचा व्हिडीओ आमच्या टीमच्या हाती लागलेला आहे. स्टंटच्या नादात अवघ्या 3 सेकंदात त्याने स्वतःचा गेम करून घेतला आहे. बरं पडला तर पडला एकटा नाही पडला 2 पोरींना बोकांडी घेऊन पडला ह्यो गडी…

मी म्हणतो, कशाला एवढा कंड असावा. स्टंट करायचा तर एकट्याने करायचा ना… त्या 2 बिचाऱ्या नाजूक तुपातल्या साजूक पोरींना खरचटलं तरी आख्ख्या गावाला माहिती होतं… भावा तू तर यांना गाडी उडवून जोरात आपटलंय… बरं.. या भावाने 2 पोरींना गाडी बसवून स्टंट करायचं ठरवलं तर कमीत कमी नीट तरी बसावावं ना… एकीला पुढं बसवलं तेही स्वतःकडे तोंड करून… बहुतेक भावाची ती गर्लफ्रेंड असावी. आणि दुसरीला मागे बसवलं.
पोरींना पण या भावावर लै विश्वास… बिनधास्त बसल्या गाडीवर… हेल्मेट नाय काय नाय… मग भाऊने अशी ही रेस करून गाडी उडवली… पोरी पूर्व दिशेला… गाडी पश्चिम दिशेला आणि भाऊ थेट हॉस्पिटलच्या दिशेला… बर आजूबाजूला लोकं होती. सतराशे साठ गाड्या लावलेल्या होत्या. ते काय स्टंट करायचं ठिकाण हाय व्हय… चांगलं मोकळ्या मैदानात जावं. तिकडं आला स्टंट करण्याचा कंड जिरवावा. तिथं आपली काशी करावी. पण नाही… शायनिंग कुठं मारावी, हे ज्याला कळलं ना त्याने जग जिंकला शेठ…

तर असो खटक्यावर बोट, जाग्यावर पलटी असणारा हा व्हायरल व्हिडीओ तुम्ही नक्की बघा. असले स्टंट केले तर डोक्याला टेंगुळ आल्याशिवाय राहणार नाही. योग्य ठिकाणी कंड दाखवा, योग्य ठिकाणी शायनिंग हाना अनहीतर तुमचीही अवस्था या भावासारखी होऊ शकते. आता 2 मिनिट शायनिंग मारायच्या नादात याने स्वतःला लागून घेतलं. त्या 2 पोरींना पण लागलं असणार आणि स्वतःच्या गाडीचं पण नुकसान झालं असणार. वरून ज्या गाड्यांला जाऊन भाऊंची गाडी धडकली. त्यांचीही नुकसान भरपाई द्यावी लागणार… 2 मिनिटांची शायनिंग बघा किती महागात पडली… नशीब एखाद्याचा जीव नाही गेला… हा व्हिडीओ बघून विचार करा. काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.