महाराष्ट्रातील सोलापूर येथील जुळ्या बहिणींनी एकाच व्यक्तीसोबत लग्न केलेला व्हिडीओ खूप वायरल झाला आहे. हा एक प्रेम विवाह आहे. वधू आणि वर पक्ष दोन्हीसुद्धा ह्या लग्नामुळे खूप आनंदी आहेत. तरीसुद्ध पोलिसांनी नवरदेवाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांचे म्हणणे आहे कि, व्हिडीओ समोर आल्यानंतर ह्या घटनेसंबंधी कारवाई केली जात आहे. नवरदेवाविरुद्ध पोलिसांनी कलम ४९४ अंतर्गत तक्रार दाखल केली आहे. ह्या कलम अंतर्गत कोणीही पुरुष किंवा स्त्री आपल्या पहिल्या साथीदाराला घटस्फो’ट दिल्याशिवाय अथवा ती व्यक्ती जीवित असेपर्यंत दुसरा विवाह करू शकत नाही. ह्या कलम अंतर्गत कायद्यात ७ वर्षाची शिक्षेची तरतूद केली आहे.
शुक्रवारी सोलापूर मधील झालेल्या ह्या आगळ्यावेगळ्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप वायरल झाला होता. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले कि, तरुणाने ३६ वर्षीय जुळ्या बहिणींसोबत लग्न केले, ज्या आयटी इंजिनिअर्स आहेत. तर दुसरीकडे वधू आणि वराच्या कुटुंबातील लोकांना ह्या लग्नापासून कोणतीच हरकत नाही आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल झाल्यानतंर अनेकांनी विचारले कि हे लग्न वैध आहे का ? सांगितले जात आहे कि अतुल माळशिरस नावाचा तरुण मुंबईत ट्रॅव्हल एजंसी चालवतो. काही दिवसांपूर्वीच तरुणींच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे दोन्ही बहिणी आपल्या आईसोबत माळशिरस तालुक्यात येऊन राहू लागल्या.
तरुणाने केली होती मदत, तेव्हा पासून सुरु झाले प्रेमप्रकरण :
एकदा जेव्हा रिंकी आणि पिंकी ह्यांची आई आजारी होती तेव्हा अतुलने आपल्या गाडीने त्यांना हॉस्पिटलमध्ये वेळेवर पोहोचवले होते. ह्याच दरम्यान अतुल हा दोन्ही जुळ्या बहिणींच्या जवळ आला होता. त्यानंतर काही काळानंतर दोघीनींही अतुलसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी अतुलने दोन्ही बहिणींसोबत लग्न केले, त्यानंतर ह्या लग्नाचा एक व्हिडीओ वायरल झाला. स्थानिक पोलीस ह्या घटनेची चौकशी करत होते. तपास केल्यानंतर पोलिसांनी नवरदेवाविरुद्ध तक्रार दाखल केली. सध्या पुढची कारवाई चालू आहे.
बघा वायरल झालेला व्हिडीओ :