Breaking News
Home / मनोरंजन / दोन मित्रांच्या डान्स मध्ये घडला अतरंगी प्रकार, शेवट पाहून तुम्हांलाही दया येईल

दोन मित्रांच्या डान्स मध्ये घडला अतरंगी प्रकार, शेवट पाहून तुम्हांलाही दया येईल

सध्या जमाना व्हायरल लोकांचा आहे. इथे जो व्हायरल होईल, तोच सेलिब्रिटी बनतो. मालिका, टीव्ही किंवा सिनेमात काम करणारे सेलेब्रिटी आता उरले नाहीत. जो व्हायरल होईल, आता तो सेलेब्रिटी असतोय. अगदी लग्नापासून तर रस्त्यावर असणाऱ्या सर्वसामान्य माणसापर्यंत सगळे व्हिडीओ व्हायरल होतात आणि मग लोक सेलेब्रिटी बनतात. पण सगळ्याच व्हायरल व्हिडीओच्या बाबतीत लोक सेलेब्रिटी होतीलच असं नाही. काही व्हिडीओ हे पद्धतशीर चव घालणारे असतात. म्हणजे उगाचच काढलेले, कुणाला तरी त्रास देणारे, काहीतरी बाष्कळ गडबड आणि बडबड करणारे व्हिडीओ पण व्हायरल होतात. ज्यांची लोक मजा घेतात आणि सोडून देतात. असे व्हायरल व्हिडीओ बहुतांश वेळा लग्नातील असतात. लग्न समारंभातील असे व्हिडीओ तुम्ही हसून हसून लोटपोट होत असाल. लग्नात सहभागी झालेल्या मित्रांच्या डान्सचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा डान्स कमी आणि हाणामारी जास्त आहे.

लग्न म्हटलं की डान्स आला. डान्स म्हटलं की नवरदेवाचे बे’वडे मित्र आले आणि बे’वडे मित्र आले म्हणजे त्यांचा धिंगाणा, मस्ती आणि त्यांनी घातलेला घोळ आला. ज्या माणसाच्या लग्नात बे’वडे मित्र असतात, तिथे भांडणे हमखास होतात. याचा अनुभव प्रत्येक लग्न झालेल्या मित्राला असेलच. कुठल्याही लग्नात नवरदेव-नवरीपेक्षा त्यांचे मित्र-मैत्रिणी सुपर एक्सायटेड असतात. या एक्साईटमेंटमध्ये नवरदेवाचे मित्र 2-3 पेग जास्त मारतात आणि मग ते काय करत असतात, त्याचीही जाणीव त्यांना होत नाही. एकदम हाय लेव्हलवर असणारी मित्रांची एक्साईटमेंट कधी कधी अति महागात पडते. अशीच एक ओव्हर एक्साईटमेंट असलेल्या मित्रांचा डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. या व्हायरल झालेल्या व्हिडीओत नवरदेवाच्या मित्रांनी असा काही गोंधळ घातलेला आहे, जे पाहून लग्न नाही मोडलं तरी एखाद्याचं कंबरडे नक्कीच मोडले असेल. अवघ्या 17 सेकंदाच्या या व्हिडीओत 2 मित्र नाचत आहेत. या व्हिडीओला पाहून तुम्ही सुरुवातीला पोटभर हसता. पण काहीवेळाने तुम्हाला दुसऱ्या मित्राचे अचानक वाईट वाटू लागते. पण त्या दोघांना पण देशीची न’शा अनावर झाल्याने आपण काय करत आहोत, याचा अजिबात गंध नाही. एवढी धरपकड होऊनही दोघे पुन्हा उठून उठून नाचत आहेत.

या व्हायरल व्हिडीओत एक मित्र दुसऱ्या मित्राला उचलून खांद्यावर घेतो. आणि पुढे जे काही होतं ते पाहून अंगावर शहारा येतो. सुरुवातीला आपण हे हसण्यावारी घेतो पण नंतर मात्र गंभीर होतो. त्यामुळे पिऊन कुठेही मजा करा पण प्रमाणात. दुसऱ्याला त्रास होईल असं वागू नका रे… हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा. तसेच मराठी गप्पा टीम ह्या व्हिडीओमधील घडलेल्या प्रकारचे कुठेही समर्थन करत नाही किंवा असे करण्यास प्रवृत्त करत नाही आहे. ह्याउलट असे प्रकार करू नका, हेच सांगत आहे. कोणत्याही गोष्टीला मर्यादा असते, त्या मर्यादेचे भान ठेवून सर्वांनी वागावे, हीच आमची अपेक्षा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *