८४ वर्षाच्या धर्मेंद्रला चित्रपटसृष्टीत जवळजवळ ६० वर्षांपेक्षा सुद्धा जास्त कालावधी झाला आहे. धर्मेंद्रने १९६० मध्ये रिलीज झालेल्या ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ ह्या चित्रपटापासून सुरुवात केली होती. तेव्हापासून आतापर्यंत त्याच्या तीन पिढ्या चित्रपटांत आल्या आहेत. जरी धर्मेंद्रचे दोन मुले सनी आणि बॉबी देओलला सर्व ओळखत असले तरी त्याच्या दोन मुली अजिता आणि विजेता ह्यांच्याबद्दल खूपच कमी जणांना माहिती आहे. काही दिवसांपूर्वीच बॉबी देओलने आपली मोठी बहीण अजिता देओल सोबत एक फोटो शेअर केला होता, ज्यात भाऊ बहिणीची खूप सुंदर बॉण्डिंग दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच बॉबी देओल अमेरिकेला गेला होता, जिथे तो आपल्या बहिणीला भेटला.
धर्मेंद्रच्या मुली अजिता आणि विजेता नेहमी लाइमलाईट पासून दूर राहिल्या. इतकंच काय तर दोघींना कधी कोणत्या फॅमिली फंक्शन मध्ये पाहिले गेले नाही. मीडिया रिपोर्ट्सच्या म्हणण्यानुसार आता दोन्ही बहिणी अमेरिकेतील कॅलिफोर्निया शहरात राहतात. अजिताचे टोपणनाव लल्ली आहे. मीडियाच्या माहितीनुसार, अजिताचे लग्न किरण चौधरी ह्याच्याशी झाले असून किरण ‘1000 Decorative Designs from India’ नावाच्या पुस्तकाचा लेखक आहे. अजिता पतीसोबत कॅलिफोर्निया मध्ये राहते. तर धर्मेंद्रने आपली दुसरी मुलगी विजेता हिच्या नावाने प्रोडक्शन हाऊस उघडले आहे. धर्मेंद्रच्या कंपनीचे नाव ‘विजेता प्रोडक्शन प्राइवेट लिमिटेड’ आहे. विजेताच्या लग्नाबद्दल अजून कोणाला काही माहिती नाही आहे. तरी ती सुद्धा आपली बहीण अजिता सोबत अमेरिकेला स्थायिक झालेली आहे.
लाइमलाईटपासून दूर राहते अजिता :
धर्मेंद्रने २ लग्न केले आहेत. त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव प्रकाश कौर असून दुसऱ्या पत्नीचे नाव हेमा मालिनीआहे . दोन्ही पत्नींकडून धर्मेंद्रला ४ मुली आहेत. हेमा मालिनीच्या मुलींची नवे इशा आणि अहाना आहेत ज्या नेहमी प्रकाशझोतात असतात. परंतु पहिल्या पत्नीच्या मुली अजिता आणि विजेता है कधीच मीडियासमोर आल्या नाहीत.
धर्मेंद्रच्या पहिल्या पत्नीचे नाव प्रकाश कौर असून दोघांचे लग्न १९५४ मध्ये झाले होते. दोघांना चार मुले असून सनी, बॉबी, विजेता आणि अजिता अशी चौघांची नवे आहेत. ह्यानंतर धर्मेंद्र ह्यांनी २ मे १९८० मध्ये हेमा मालिनी सोबत धर्म बदलून दुसरे लग्न केले. हेमा आणि धर्मेंद्र ह्यांना दोन मुली आहेत, ज्यांची ईशा आणि अहाना हि नावे आहेत. धर्मेंद्रला चार नातू असून करण, राजवीर, आर्यमन आणि धरम अशी त्यांची नवे आहेत. देओल कुटुंबाला चित्रपटसृष्टीत राहून जवळजवळ ६० वर्षे झाले आहेत. धर्मेंद्र ह्यांनी १९६० मध्ये आपल्या चित्रपट करियरची सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांचा मुलगा सनी देओलने चित्रपटसृष्टीत खूप नाव कमावले. त्यानंतर बॉबी देओलने सुद्धा चित्रपटांत काम केले. परंतु बॉबी देओल काही खास कमाल नाही दाखवू शकला. आता सनी देओलचा मुलगा करण देओल ह्याने चित्रपटसृष्टीत पर्दापण केले आहे. अजिता आणि विजेता कुटुंबासोबत फक्त लहानपणीच दिसल्या होत्या. इतकंच क्या तर हेमा मालिनी च्या मुली ईशा आणि अहाना देओल ह्यांच्या लग्नात मध्ये सुद्धा दोघी दिसल्या नाहीत.