Breaking News
Home / जरा हटके / धारावीतल्या घरात घुसला होता ६ फुटी अ’जगर, बघा मुंबई पोलिसांनी अ’जगराला क’श्याप्रकारे बाहेर काढले ते

धारावीतल्या घरात घुसला होता ६ फुटी अ’जगर, बघा मुंबई पोलिसांनी अ’जगराला क’श्याप्रकारे बाहेर काढले ते

वायरल व्हिडियो आणि मराठी गप्पा यांचं अतूट असं नातं तयार झाल्याचं आपण सगळेच जणं अनुभवत आहोत. या नात्यातून अनेक उत्तमोत्तम लेख आमच्या टीमला आजतागायत लिहिता आले आहेत आणि यापुढे ही लिहिण्याची संधी मिळेलंच. यानिमित्त आमच्या टीमलाही अनेक व्यक्तींची ओळख करून घेता आली आहे, जे खऱ्या आयुष्यात आपले नायक नायिका असतात. आता एका वायरल व्हिडियो चं घ्या ना. या व्हिडियोत एक पो’लीस अधिकारी धारावी भागातील एका घरातून अ’जगराला बाहेर काढत असताना दिसतं. त्यात सहज जाणवतं की त्या भागात जिथे व्यवस्थित स्वतःला उभही राहता येत नाही तिथे एका अ’जगराशी सामना म्हणजे एक चूक आणि आपल्या जीवाला धो’का. पण त्या प्रतिकूल परिस्थितीतही हे अधिकारी प्राणाची बाजी लावून आपलं काम करतात.

अ’जगराने चावू नये म्हणून एका हातात त्या अजगराचं तोंड असतं. तर दुसऱ्या हाताने त्या अ’जगराची घरातल्या छताला लागलेली मिठी सोडवण्यासाठी प्रयत्न चालू असतात. बरं हे करताना आजूबाजूला लोकांचा खूप आवाज होत असतो. त्यामुळे लक्ष केंद्रित करणं अजून कठीण. पण हे धाडसी अधिकारी त्या अजगराची मिठी सोडवण्यात यशस्वी होतात. त्यांना यश आलंय कळल्याबरोबर एकच जल्लोष होतो. मुंबई पो’लिसांच्या नावाचा जयजयकार होतो. हातात हा घातक असा हा सर्प घेऊन हे अधिकारी आणि त्यांचे सहकारी माळा उतरून खाली येतात. बाहेर बहुसंख्य लोक जमलेले असतात. प्रत्येक जण मुंबई पो’लिसांच्या नावाने जयजयकार करत असतात. या पो’लीस अधिकाऱ्याच्या आजूबाजूला गर्दी जमा होणार तेवढ्यात एक स’र्पमित्र समोर येतो. मग तो आणि आपले पो’लीस अधिकारी आपल्या हातातील पिशवीत सर्प अलगद ठेवतात आणि त्याला गर्दीपासून दूर नेतात. एव्हाना अनेकांनी या अधिकाऱ्याभोवती गराडा टाकलेला असतो आणि त्यांचं नाव जाणून घेत असताना हा व्हिडीओ संपतो. या वायरल व्हिडियो मुळे आपल्या पो’लीस दलाविषयी असलेला आदर अजून वाढतो.

पण केवळ एवढ्यावरच थांबणं पटत नाही आणि आपण गुगल सर्च करतो. योगायोगाने या पो’लीस अधिकाऱ्याने केलेल्या या कामाची दखल अनेक वृत्तसंस्थानी बातम्यांतुन घेतलेली दिसून येते. यातून कळतं या पो’लिस अधिकाऱ्याचं नाव आहे मुरलीधर जाधव. मूळचे जळगाववासी असणारे मुरलीधर गेली कित्येक वर्षे पो’लीस दलात कार्यरत असल्याचे कळते. तसेच काही बाबीही लक्षात येतात. एक म्हणजे काही काळापूर्वी अपघा’त झाल्यामुळे मुरलीधर यांच्या पायाला दु’खापत झालेली होती. असं असतानाही त्यांच्या कडून आपलं कर्तव्य करताना या ठिकाणी कसूर केलेली अजिबात दिसत नाही, तसेच त्याचे कुठे भांडवल केलेले दिसत नाही. तसेच अजून एक गोष्ट कळते. अगदी लहानपणी मुरलीधर यांना एका स’र्पाने दंश केल्यामुळे त्यांना वि’षबा’धा झाली होती. अगदी ऐन क्षणी डॉक्टरांनी उ’पचार केल्यामुळे त्यांचे प्रा’ण वाचले. याच्यातूनच प्रेरणा घेऊन इतरांना स’र्प दंश होऊ नये आणि वि’षबा’धेचे विपरीत परिणाम होऊन माणसं द’गावू नयेत म्हणून त्यांनी स’र्पमित्र म्हणून अगदी उमेदीच्या वर्षांत काम करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून आज गेली काही दशके ते हे काम अगदी अविरतपणे करत आहेत.

त्यांच्या या कामासाठी त्यांना अनेक प्रथितयश पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. यात ‘खान्देश रत्न’ हा पुरस्कारही त्यांना २०१९ साली जाहीर झाला होता. तसेच वर धारावीत घडलेल्या घटनेचं कौतुक महाराष्ट्राचे गृहमंत्री माननीय श्री. अनिल देशमुख साहेब यांनीही केलं होतं. तसेच अनेक प्रथितयश वृत्तपत्रांतून आणि वृत्तवाहिन्यांनीही त्यांच्या या कार्याचा गौरव केलेला आहे. मराठी गप्पाच्या टीमलाही मुरलीधर यांनी प्राणीमित्र म्हणून केलेल्या कामाचं कौतुक आहे. त्यांनी यापुढेही असं उत्तम काम करतच राहावं पण सोबतच स्वतःच्या सुरक्षेची काळजी घ्यावी हीच मराठी गप्पाच्या संपूर्ण टीमची सदभावना. यानिमित्ताने मुरलीधर यांच्या सारख्या एका उत्तम व्यक्तिमत्वा विषयी जाणून घेता आलं, याचा आम्हाला आनंद आहे.आपल्या हा लेख आवडला असल्यास आमच्या वे’बसाई’टवर असलेल्या स’र्च ऑप्श’नचा वापर करा. त्यात जाऊन वायरल असं लिहून सर्च करा आणि आपल्याला विविध वायरल व्हिडियोज वरील लेख वाचावयास मिळतील. त्यात काही लेख हे आपल्या पो’लीस बांधवांच्या कामाचे आणि काही त्यांच्यातील कलाकाराचे दर्शन घडवणारे आहेत. या लेखांचा आनंद जरूर घ्या. धन्यवाद !

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *